Login

जाने अंजाने में भाग 2

A Youtubers Lovely लव्ह Story
जाने अंजाने में भाग 2

दीर्घकथा लेखन स्पर्धा,  डिसेंबर जानेवारी 25-26

" परत परत  तू तेच का बोलत आहेस, बेब..?? अर्थात तूच बेबी ना... इथे अजून कुणी आहे का तुझ्या आणि माझ्या शिवाय.. " तो अजून ही कूल होता, पण आवाज आता सिडक्टिव्ह वाटत होता...


" ओय, तुम्ही पहिले तर हे बेब, बेबी बोलणे बंद करा... " तिने रागातच त्याच्या त्या पकडलेल्या कॉलर ला झटका देऊन म्हंटले... " आणि  हा तुमचा हार घ्या   व चालत व्हा माझ्या नजरेसमोरून... सुंदर मुलगी दिसली नाही की येतात लगेच... " ती पूढे अजून बोलणार होती पण शांत झाली...


" सो सॉरी मॅम... मला तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा... " तिचे बोलणे ऐकून त्याने मात्र सपशेल माघार घेत म्हटले... " ऍकच्यूअली ते इथे माझी गर्लफ्रेंड येणार होती... " तो इकडे तिकडे बघत बोलला... मी तिच्याबरोबर करणार होतो लग्न पण..तुम्ही असं खाली मान घालून बसला होता... त्यामुळे.. " तो दिलगिरी व्यक्त करत म्हणतो...


" व्हॉट...?? " पण त्याच हे उत्तर तिच्यासाठी अनपेक्षित होते त्यामुळे ती चांगलीच चक्रवली, " तुम्हाला काय मी मूर्ख वाटते का?? की तुम्ही काही ही मला सांगाल  आणि त्यावर मी विश्वास ठेवेल...?? "


" खरंच मॅम, तिच्याकडे सेम हेच हूडी आहे... बस फक्त ती तुमच्या इतकी सुंदर नाही ओ... " तो मान खाली घालून बोलत होता... आवाज आता इतका नरम होता की तो नक्कीच खरं बोलत असावा इतका...


" रिअली...?? तुला मी डंब वाटले का रे... " ती आता डायरेक्ट हमरी तुमरी वर येत बोलते...


" तुम्हाला मी कस काय डंब समजेल...?? " त्याने मान वर करत म्हटले, " घुमा फिराके मुझे बोलना आता नहीं है, और सी पी में आपके अलावा कोई भाता नहीं है... " त्याने एक शायरी बोलली आणि ही एकदम एकाच जागी स्तब्ध झाली... 20-22 वर्षाची तर होती ती, आणि समोरून जर विरुद्ध जिन्स चे आपली तारीफ करत असेल, फ्लर्ट करत असेल तर आपल्या चेहऱ्यावर नकळतं स्माईल येतेच ना... तसंच आता गोड स्माईल आली तिच्या चेहऱ्यावर...


" हाय... मैं तो मर जावा... " तो आपल्या हृदयावर हात ठेवून, फिल्मी बोलला...तिला यावर कै रिऍक्ट करावे तेच कळेना... तिने परत आपली मान मोबाईल मध्ये घातली...


" तुम्ही खरंच खूप सुंदर आहात..." आणि तीच हसणे पाहून तो पूर्ण फ्लॅट.... " गर्लफ्रेंड बनाल माझी...??" त्याने आपला हात पुढे करत म्हटलं...


" थँक यू... बट सॉरी " तिने तशीच मान खाली घालून म्हटले...


" का...?? मी चांगला नाही का दिसायला...?? " त्याने आपल्या नुकत्याच केलेल्या शेविंग वर हात फिरवत म्हटले, " हॊ म्हणजे तुमच्या पुढे मी काहीच नाही, आय नो... पण तरी... " तो चांगलाच फ्लर्ट करत होता... पण ती मात्र आता खाली बसून, खाली मान घालून मोबाईल पाहत होती... अर्थात तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल होतीच..


" हे बघा... मी अनोळखी लोकांशी बोलत नाही... तुम्ही जर टाइम पास करत असाल तर माझ्याकडे तेव्हडा वेळ ही नाही... सो गेलात तर बरंच होईल... आणि माझा बॉयफ्रेंड येईल च आता..." तिने त्याला थोडे जरब शब्दावर आणत म्हटले...

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
0

🎭 Series Post

View all