Login

जाने अंजाने में भाग 3

फॅमिली ड्रामा
जाने अंजाने में भाग 3

दीर्घकथा लेखन स्पर्धा,  डिसेंबर जानेवारी 25-26

कौटुंबिक कथा

" ओह्ह बॉयफ्रेंड आहे तर तुम्हाला... पण मग असं एकटेच बसला आहात तुम्ही.. मला वाटले... " तो आता थोडे  गंभीर होतं...


" तुम्ही जाताय की मी जाऊ  ?? " ती जरा आता रागातच बोलते...पण तो मात्र काहीच उत्तर देत नाही पाहून तीच उठून जायला लागते की,


" ओ थांबा थांबा मॅडम, मी एक प्रॅन्क स्टार आहे.. आणि तुमच्यावर प्रॅन्क करत होतो..." तस त्याने तिच्या हाताला मागून पकडत म्हटले.. पण दोघांना तो स्पर्श खूप ओळखीचा वाटला... जणू जन्मोजन्मी च त्यांचं नाते असावे... दोघांनी त्याच क्षणी आधी हाताकडे आणि मग एकमेकांच्या नजरेत पाहीले... आणि चेहऱ्यावर नकळतं त्यांच्या एक हलकी आणि गोड स्माईल आली...


" ए डी यार, और थोडा कर लेता ना भाई... मजा आ रहा था... " तोच हातात कॅमेरा घेऊन, एक त्याच्या च वयाचा मुलगा येत तिथे बोलतो...


" ए डी, प्रॅन्क स्टार... " त्या मुलाने मारलेली हाक आणि त्याच्या हातातील कॅमेरा पाहून, ती मुलगी भांबाऊन जात बोलते, " ओह माय गॉड, दिल्ली चा मराठी सुपर प्रॅन्क स्टार, आदिल देशमुख... तुम्हीच तर नाही ना..?? " ती मुलगी आता तोंडावर हात ठेऊन हसत बोलते... त्याच्याबद्दल असलेला राग अचानक तिचा दूर होतो...


" हा ए वही है मॅडम जी.. आदिल देशमुख... अँड आज आप उनके बकरो में से एक बकरा बन गये हॊ... " त्या मुलाने हसत म्हटले...


" ओह्ह... मैं बहोत बडी फॅन हू उनकी... " तिने हसत म्हटले.. " मी तुमची खूप मोठी फॅन आहे...मी एकूण एक विडिओ पाहीले आहेत तुमचे... माझं नाव सना... सना खान... " तिने त्याच्यासमोर हात करत म्हटलं..


" हा अच्छा किया है हा भाई तुने रेकॉर्डिंग... चलो अब हम चलते है..हा... " पण ह्याने मात्र तिला आता सपशेल इग्नोर केल आणि त्या मुलाच्या हातातील कॅमेरा घेऊन, तो पाहतं बोलला...


चला, फायनली आज आपल्या हिरो हिरोईन ची नावे तरी कळाली...हिरो, आदिल देशमुख, तर हिरोईन सना खान...आदिल आहे प्रॅन्कस्टार, एक युट्युबर... तर हिरोईन अजून कॉलेज मध्ये शिकत आहे..बी. कॉम लास्ट इयर...ही एक साधी, हळू हळू फुलणारी प्रेमकहाणी.. पण जरा हटके असेल, नवीन पिढीची, नवीन युगाची... पाहू आता आदिल ने तिला असं इग्नोर का केल?? आणि त्यावर आता ती काय करेल... पुढच्या भागात...

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

0

🎭 Series Post

View all