जलदलेखन
विषय -जाणीव
शीर्षक - जाणीव 'स्व'त्वाची
भाग-२
विषय -जाणीव
शीर्षक - जाणीव 'स्व'त्वाची
भाग-२
मंगला, कां गं एवढी निराश झाल्यासारखी बोलत आहेस. माझ्याकडे बघ जरा. आपण दोघीही वयाने सारख्याच.फक्त दोन वर्षाचा फरक.पण चेहऱ्यावरचे तेज हरवल्यासारखं दिसतं तुझ्या.
बरं ते जाऊ दे.सुषमा मला सांग आणखी कोणकोणते छंद जोपासतेस तू.मंगला म्हणाली.
मंगला, मला फुलझाडांची खूप आवड आहे. माझ्या अंगणात मी एक छोटी छोटीशी परसबाग तयार केली आहे. सकाळी उठून त्या फुलझाडांकडे पाहताच वेगळाच आनंद मिळतो मला. असं वाटतं जणू ती झाडं आपल्याशी बोलत आहेत.
शिवाय माझ्या मैत्रिणींचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे मी. त्याविषयी तुला मी सविस्तर सांगेलच. तसेच सकाळी आम्ही आमच्या कॉलनीतल्या सर्व मैत्रिणी मिळून फिरायला जातो. तिथे बागेमध्ये छान गप्पा मारतो. एकमेकींच्या गोष्टींची तिथे आदानप्रदान होते. त्यामुळे संपूर्ण दिवस अगदी आनंदात निघून जातो.
मग फावल्या वेळात थोडे वाचन, लिखाण. एकंदरीत मी असे स्वतःला गुंतवून ठेवले आहे. त्यामुळे बरं वाटतं.
आणि मंगला काय गं ,फोनवर मंदारराव काय बोलले. तू सारखी मुलांची काळजी करत असतेस म्हणे. मला एक सांग मंगला तुझ्या काळजीने काय फरक पडणार आहे. उलट तू त्यामुळे तुझी तब्येत बिघडवून घेशील.
आपण इकडे चांगले राहिलो तर मुलांनाही काळजी वाटणार नाही. आज प्रत्येकाचाच हा प्रश्न आहे. मुलं नोकरीवर असतात. कोणी परदेशात, कोणी परराज्यात, मोठ्या शहरात त्यांची इच्छाही असते आपण सुद्धा त्यांच्याजवळ राहावं. पण आपल्याला तिकडे करमत नाही. म्हणून आपण इथे राहतो.म्हणूनच आपण इकडे स्वतःला विविध कामांमध्ये गुंतवून घ्यायचं आणि मजेत राहायचं.
अरे हे तर छानचं. कां गं सुषमा तू म्हणत होतीस नां तुझ्या मैत्रिणींच्या व्हाट्सअप ग्रुप विषयी. मलाही घेशील कां त्या ग्रुपमध्ये.
हो मंगला. कां नाही. या व्हाट्सअप ग्रुप वर दोन महत्त्वाचे दिवस ठरवून घेतले आम्ही. एक दिवस एका विषयावर चर्चा आणि दुसरा दिवस विश्रांती. या वयात तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करायचा याचं हे एक स्तुत्य उदाहरण. त्यामुळे या आठवड्याचा विषय काय असेल याबद्दल उत्सुकता असते आणि त्याचबरोबर एखाद्या विषयाकडे बघण्याचे अनेक पैलू समोर येतात.
या आठवड्याचा विषय होता, सध्याची सामाजिक, कौटुंबिक परिस्थिती बिघडत चालली आहे. वेगळे वळण घेत आहे. अशावेळी आई-बाबांनी, आजी-आजोबांनी मुलांवर कोणते संस्कार करावेत. मग आपण आपलं मत व्यक्त करायचं. बघ छान आहे नां आयडिया. त्यामुळे आपण साहजिकच आपलं मत व्यक्त करतोच. आणि पुढचा विषय काय असेल याची देखील वाट बघतो.
हो गं सुषमा फारच छान.
पुढे काय हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग अवश्य वाचा.