Login

जाणीव 'स्व'त्वाची भाग -४

जाणीव 'स्व'त्वाची भाग -४
जलदलेखन
विषय-जाणीव
शीर्षक -जाणीव 'स्व'त्वाची
भाग ४


अनेकांची मुलं परदेशात शिकायला गेली नंतर तिकडे स्थायिक झाली तिकडेच लग्न. असेही पालक आहे त्यांच्या वयस्कर आई-वडिलांजवळ पैसा आहे, घर आहे पण त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.


आपल्या हक्काचं कोणीतरी असावं, त्यांच्याशी बोलावं किमान नातवंडांशी खेळावं यासाठी त्यांचा जीव अक्षरशः आसुसलेला असतो. मग काय असेच रडत रखडत जगायचे कां? नाही. त्यावर प्रत्येक आई-वडिलांनी स्वतःचा मार्ग नक्कीच स्वतः शोधायचा.


आपण सुशिक्षित आहोत. शिवाय गाठीला पैसा आहे. मग नुसतं रडत बसायचं नाही. आपण स्वतःला गुंतवून ठेवलं, सतत उत्साही राहिलो तर आपलं वय जरी जास्त असलं तरी आपल्याला कोणी "म्हाताऱ्या बाया"किंवा "म्हातारा बाप्या" म्हणू शकणार नाही.


वाढते वय आपल्यासोबत अनेक समस्या व आजारपण आणत असतं. बी.पी., शुगर, कंपवात, विस्मरण या शारीरिक आजारासोबत भयगंड, असुरक्षितता, एकाकीपण या मानसिक समस्या सुद्धा बळावतात. याची थोडी तरी जाणीव ठेवावी लागते.


अगं मंगला, नोकरीच्या काळात सकाळी घड्याळाचा गजर लावून, अपुऱ्या झोपेत उठून चहाचं ठेवण्यापासून ते रात्री सगळे झोपल्यानंतर किचन ओटा आवरून दुसऱ्या दिवसासाठी कडधान्य किंवा साबुदाणा भिजवून ठेवायचा. हे सर्व करायचो ना आपण.या चक्रातचं आतापर्यंतचं आयुष्य गोल गोल फिरत राहिलं आपलं.


आता कुठे निवांतपणा मिळाला.अगं प्रत्येकाकडे एक असामान्य व्यक्तिमत्व असतं. मात्र ते अनेक कारणांनी झाकोळल जातं. म्हणून तू तुझ्या आतल्या 'स्व' ला आवाज दे. जरा आपल्या अंतर्मनाचा शोध घे. बघ तुझ्या सर्व समस्या आपोआप दूर होतील.


मी तुला सांगितले नां, आमचा व्हाट्सअप ग्रुप आहे. त्या मैत्रिणी तुला चांगल्या प्रकारे मदत करतील. नवनवीन तंत्रज्ञान शिकून घे. नाही झालं तर कागद पेन घे व रोजचे मनातले विचार लिहून काढत जा.


मी तुला ईरा ॲप डाऊनलोड करून देते. मग हळूहळू हे सर्व त्यावर लिहायला सुरुवात कर. सण समारंभ, थोर पुरुषांचे कार्य हे सर्व लिहून काढायचं. बघ तुला सर्व जमेल. अगं आपल्याजवळ आज अनुभवाचा खजिना आहे. त्याचाही आपल्याला उपयोग होतो.


असं म्हणतात, की "कविता वेदनेतून जन्माला येते."मन अस्वस्थ असेल तर कवितेच्या रूपाने चार ओळी लिहून काढत जा. तेवढेच मनाला हलके वाटेल. म्हणजेच या नां त्या गोष्टीत आपले मन रमवायचे बस. आणि आणखी एक गोष्ट सांगते. ईरा ब्लॉगिंग वर तुला ईरा क्रीएटर्स बघायला मिळेल. अगं त्यावर इतके सुंदर सुंदर रिल्स बसवले आहे लेखक लेखिकांनी, की हसून हसून पोट दुखेल बघ तुझं. शिवाय नाटिका तर एक से बढकर एक. खूप छान संदेश आहे त्यात. ते बघ. तुझं मन अगदी ताजतवानं होऊन जाईल.


अगं काही वेळा मनाने नाही तर विचाराने माणूस म्हातारा होतो. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात "मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण." शिवाय मी आहेच तुला मदत करायला. मला फोन कर. फोनवर माझ्याशी गप्पा मारत जा किंवा आज जसं मला बोलावून घेतलं तसेही करू शकतेस. तुझी ही मैत्रीण तुझ्यासाठी केव्हाही हजर असेल.


चल, बराच वेळ झाला आता. तेवढ्यात मंदाररावांनी आवाज दिला.

"झाल्या कां गं तुमच्या गोष्टी."

हो हो भाऊजी. या नां तुम्हीही थोडा वेळ आमच्या गोष्टीत सामील व्हायला. मंदारराव ही मग थोडा वेळ त्यांच्या गोष्टीत सामील झाले. तेवढ्यात मंदाररावांचे लक्ष मंगलाकडे जाताचं ते उद्गारले. अरे व्वा !!! आज मला तुझ्या चेहऱ्यावर वेगळंच तेज दिसत आहे.त्यावर जरा लाजतचं मंगला म्हणाली. "आज माझ्या मैत्रिणीकडून ज्या टिप्स मिळाल्या नां त्यामुळे मी खूप खुश आहे."


अगं मंगला आपण नोकरदार महिलांनी अशाप्रकारे निवृत्तीनंतर स्वतःला गुंतवून घेणं याची ही प्रतीकात्मक उदाहरणं. पण ज्या स्त्रिया उत्तम प्रकारे घर सांभाळतात, अशा गृहिणी सुद्धा नोकरी करणाऱ्या स्त्रियांपेक्षा काही कमी नसतात. त्यांचं होम मॅनेजमेंट उत्तम असतं. अशा स्त्रियांनी सुद्धा मुला मुलींची लग्न झाल्यावर, घरच्या जबाबदारीतून बाहेर पडल्यावर स्वतःतील "ती" ला शोधलं पाहिजे.


छान.मंगला खरंच आपण या वयात नक्कीच खुश राहायला हवं. परिस्थितीशी समझोता करायला हवा. बरं झालं सुषमा तू आलीस. मंगलाला तुझी खूप गरज होती. मंदारराव थोडे भावनिक होऊन म्हणाले.चला मग आता जेवण करू आणि झोपूया. सुषमाने विषय बदलविला. चला खरंच खूप भूक लागली आहे. म्हणत सर्वजण जेवायला बसले.