जाणीव नात्याची भाग दोन

घरी कसं काय सुलभा ने विचारले
भाग दोन*जाणीव नात्याची*
सकाळी सकाळीच ह्यां चा फोन --सुलभाताई ना आश्चर्य वाटले?
"गुड मॉर्निंग-- , आज सकाळी सकाळी ?
"हो- तसेच कारण आहे."

' काय झाले?'
अगं साने काकू गेल्या."
'कोण साने ?'
'शोभा तुझी मैत्रीण,
'गेल्या म्हणजे ?'
' डेथ झाली त्यांची .वाट्स एप वर मैसेज होता.

"काय? कसे शक्य आहे?" म्हणेपर्यंत फोन बंद झाला.
सुलभाताई हातातल्या फोनकडे पाहतच राहील्या. मजकूर डोक्याचे शिरतच नव्हता.

"कोणाचा फोनहोता आई?"
साक्षीचा आवाज ऐकून त्या भानावर आल्या.
अगं ह्यांचा, शोभा गेली ग--- म्हणत त्या रडू लागल्या.
साक्षीने आई, आई काय झालं नीट सांग बरं"

"अगं शोभा साने माझे मैत्रीण गेली गं आज तिला देवाज्ञा झाली म्हणत होते."

साक्षीने आईला जवळ घेत तिचे सांत्वन करु लागली.

थोड्याच वेळात छकुलीचा रडण्याचा आवाज आला "उठली वाटतं भूक लागली असेल "--म्हणत साक्षी आत गेली.

सुलभा ताईअजून त्याच विचारात होत्या.काय झाले असेल शोभाला? सगळं तर छान होतं.

साक्षीच्या बाळंतपणासाठी म्हणून पुण्याला आली होती सुलभा ,इतक्यात परत जाणे शक्य नव्हते.

मागच्याच वर्षी सुबोध चे लग्न झाले ,.शोभा खूप आनंदात होती. सुबोध चीबायको नयना सावळी, सतेज, स्मार्ट पाहिल्या बरोबर आवडेल अशी खूप छान..
शोभा ला तिचे खूप कौतुक होत

नयना तिच्या माहेरी एकुलती एक लाडाची लेक, इकडे एकुलती एक सून म्हणून इकडे ही लाडाची. शोभा ची मुलगी प्राची ,गोरी घारी, जरा बुटकी , अजून पीएच.डी पूर्ण व्हायचे होते अभ्यासात खूपच हुशार, प्राची घरातला लाडोबा .

हे सर्व आठवून सुलभाला आता या दोघी नणंद भावजय एकत्र कशा राहतिल हा विचार मनात आला.

पुढे सव्वा महिना झाल्यावर सुलभा इंदौरला परतली तेव्हा दुसरे दिवशी शोभा च्या घरी भेटायला गेली.

नयना बाहेर गेली होती. प्राचीला पाहून सुलभाला भरून आले.खूप बदललेली वाटत होती.
आई विना पोरगी ,नयना चे आणि प्राची चे आता कसे होत असेल?
भाऊजीं शी बोलता बोलता सुलभाने विचारले "कसं काय भाऊजी प्राची आणि नयना या दोघींनाही आता तुम्हाला सांभाळावे लागत असेल ?

भाऊजी म्हणाले शोभा गेल्या पासुन हिचा अल्हड पणा बराच कमी झाला आहे तरी पण मधुन मधुन दोघीजणीं मध्ये वादविवाद होतात.


आम्ही सिव्हिल लाइन्स मध्ये नवीन फ्लॅट घेतला आता या कॉलनी त येणे सारखे जमत नव्हते.

एक दिवस नवीन घरात सत्यनारायण केला तेव्हा बोलावणे करायला म्हणून शोभाच्या घरी फोन केला..

प्रसाद घ्यायला सुबोध घरी आला होता बोलता बोलता सुलभाने विचारले" घरी कसे काय "?त्यावर सुबोध म्हणाला "ठीक आहे काकू आता मी नयना ला समजावले आई गेल्या पासून तिच्या ही स्वभावात एक समजूतदारपणा दिसायला लागला आहे .'

प्राची आणि नयना चे आता बरेच पटते,दोघीही एकमेकींना समजून ,सांभाळून घेतात.
—------------------------------------------------क्रमश: