भाग तीन जाणीव नात्याची

शोभा घ्या जाण्याने नयना वर खुपच जवाबदारी आली होती
भाग तीन जाणीव नात्याची

सुलभा ताईंच्या मनात आल,खरं च तशा दोघीही लहानच आहेत शोभाच्या अचानक जाण्याने दोघींवर जबाबदारी आली. विशेष करून नयना वर जास्त.

चैत्राच्या हळदीकुंकवाला काॅलनीत जाणे झाले. वेळ काढून शोभा कडे गेले. घरी नयना होती तिने हसत स्वागत केले ,कशा आहात मावशी? किती तरी दिवसांनी आला म्हणाली.
मी घरात सगळीकडे नजर फिरवली घर खूप छान आणि स्वच्छ ठेवले होते.

वा खूपच छान घर ठेवल आहे ग ..

" प्राची कशी आहे दिसली नाही ती "

कॉलेजला गेली आहे.. येईलच.
शोभा अचानक गेल्याने तुझ्यावर खूपच जबाबदारी आली ग"
" हो काकू आई गेल्या त्यानंतरच मला आपल्या जबाबदारीची जाणीव झाली.
प्राची ला आईची कमतरता जाणवू न देण्याचा मी प्रयत्न करते.
पूर्वी आम्ही दोघीजणी आईं समोर खूप भांडत असू .आई अचानक गेल्याने प्राची चि मानसिक अवस्था खूप वाईट झाली होती. धक्का तर आम्हा सर्वांनाच बसला होता पण प्राची आईंची लाडू बाई तिला खूप संभाळावे लागत होते.
तिला मानसिक आधाराची गरज होती तिला संभाळता संभाळता मी जणू तिची आई च झाले, हळूहळू ती सावरली, तिच्या ही स्वभावात नरमाई येत गेली.. नयना च्या बोलण्याने माझ्या मनात ली काळजी कमी झाली.

नयना ला दिवस गेले होते.अश्या वेळी कौतुकाने हवं नको पहाणार कोणी नव्हते. आज जर शोभा असती तर किती कौतुकाने केलं असत,काय हवं नको ते. .

थोड्याच वेळात प्राची घरी आली मावशी म्हणून पाया पडली व वहिनीला हातातले पॅकेट देत म्हणाले वहिनी तुझ्या आवडीचे पाणीपुरी येता ना घेऊन आले.
माझ्याकडे पाहत म्हणाली वहिनीला डोहाळे लागले तिखट आंबट खूप आवडत म्हणून घेऊन आले.

नयना म्हणाली चहा घेणार? नको बस तू मी करते पण आधी खाऊन घे म्हणत तीन प्लेट मध्ये पाणीपुरी घेऊन आली,
मनसोक्त खा वहिनी , खाऊन होताच मस्त काॅफी ही आणली.
माझ्या हातावर मिठाई ठेवत नयना म्हणाली एक अजुन आनंदाची बातमी आहे मावशी.
प्राची चे पीएच.डी पूर्ण झाले,थिसीस सबमिट केले लवकरच आपल्या प्राची ला डॉ . ची पदवी मिळणार.
.
दोघींमध्ये हा झालेला बदल पाहून मला खूप आनंद झाला.
एक काळ होता जेव्हा दोघींमध्ये आडवा विस्तव होता त्या इतक्या समंजसपणे नी प्रेमाने वागत होत्या.
माझ्या डोळ्यासमोर शोभा उभी राहिली शोभा असताना किती भांडत असत आणि आता जणू शोभाच्या जाण्याने दोघींना नात्याची जाणीव झाली.
आईचे छत्र हरवलेल्या प्राचीला नयनाने जाणिवपूर्वक आईच्या मायेने वागवायला सुरुवात केली .तिच्या भावनांचा आदर करून प्राची ही तिची काळजी घेत होती.
दोघीजणी आता भुलाबाईंच्या गाण्यातील नणंद भावजय या ईमेज मधून बाहेर निघून प्रेमळ बहिणींसारख्या राहत होत्या.
शोभाच्याफोटोकडे पाहताना सुलभाला वाटले आपला शांतपणा लेकीला आणि समजूतदारपणा सुनेला देऊनच शोभा गेली

एक दिवस नयना आणि सुबोध प्राची च्या लग्नाची पत्रिका द्यायला आले.
सांगताना चेहर्यावर आनंद आणी डोळ्यात पाणी होते नयना च्या.
प्राची आणि नयना च्या नात्यात प्रेमाच्या विणलेल्या रेशीम धाग्यांनी नणंद भावजय या नात्याच्या भरजरी वस्राला आता जरतारी किनार लाभली …
-------------------------------------------लेखन.. सौ. प्रतिभा परांजपे