प्रकाशराव व वंदनाताई दोघेही शांत,साध्या व सरळ स्वभावाचे! प्रत्येक नातं आपुलकीने जपणारे! पैशाने जास्त श्रीमंत नसलेले;पण मनाने खूप मोठे ! प्रत्येकाला शक्य होईल तितकी मदत करणारे! प्रकाशराव एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. पगार जास्त नव्हता;पण तरीही वंदनाताई आपला संसार नीटनेटका करत होत्या.पुढे काही वर्षानी कंपनी बंद पडली; मग तेव्हा प्रकाशरावांनी एक छोटेसे स्टेशनरी दुकान सुरू केले.आता मोठा मुलगा गणेश व दुसरा राजेश या दोन्ही भावांनी दुकान चांगले मोठे केले.स्टेशनरी सोबत झेरॉक्सचेही सुरु केले. दुकान चांगले चालू लागले होते. प्रकाशरावही मुलांना मदत करत होते.लहान मुलगा प्रसाद इंजिनिअर होऊन एका चांगल्या मोठ्या कंपनीत नोकरी करत होता.
प्रकाशराव व वंदनाताई पैशांअभावी मुलांचे लाड करण्यात थोडे कमी पडले;पण संस्कार करण्यात कुठेही कमी पडले नाही. तिन्ही मुलांनीही आईवडिलांचे गुण व संस्कार घेतले होते. पैशाअभावी हौसमौज होत नव्हती;पण छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेत समाधानाने जगत होते.
गणेश व राजेश काॅलेजचे शिक्षण करता करता वडिलांना दुकानात मदत करत होते आणि पुढे मग त्यांनीच दुकानाची चांगली प्रगती केली. गणेशचे व दोन वर्षांनी राजेशचे लग्न झाले. सविता गणेशची व मनिषा राजेशची अर्धांगिनी होऊन देसाई कुटुंबात आल्या.
सविताचा ब्युटीपार्लरचा कोर्स झालेला होता व मनिषाने मॉन्टेसरीचा कोर्स केलेला होता. प्रकाशराव व वंदनाताईंनी आपल्या सुनांना, त्यांच्या शिक्षणाचा उपयोग करण्याची संधी दिली.
सविता घरातील जबाबदारी पूर्ण करुन पार्लरचे काम करु लागली. तिला ते छान जमू लागले. मनिषाही एका शाळेत टीचर म्हणून जाॅब करू लागली. घरातील कामांना सासूबाईंचा हातभार मिळत होता आणि दोन्ही जावांचे एकमेकांशी चांगले पटत असल्याने,संसार व करिअर सांभाळणे दोघींना सोपे जात होते. घरात आनंद, समाधान सर्वकाही छान होते. आता सर्वांना प्रसादच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. घरात आईबाबांनी एकदोन मुलींचा विषयही काढला.प्रसाद सोडून सर्वांनी इंटरेस्ट दाखवला. सर्वांना वाटले,अजून त्याला लग्न करायचे नसेल किंवा मुलगी आवडली नसेल वगैरे...म्हणून त्यांनी त्याला जास्त आग्रह केला नाही.

एके दिवशी प्रसादनेच स्वतःहून सर्वांना सांगितले की, ऑफिसात त्याच्या सोबत काम करणाऱ्या सायलीवर त्याचे प्रेम आहे व तिचेही याच्यावर प्रेम आहे.
मुलांच्या सुखात आपले सुख मानणारे प्रकाशराव व वंदनाताई यांनी सायलीला सून म्हणून स्वीकारले. प्रसादचे लग्न खूप थाटामाटात झाले. सर्वांनी खूप मजा केली आणि देसाई कुटुंबाची लहान सून म्हणून सायलीचा गृहप्रवेश झाला.
क्रमश:
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा