Login

जाणीव प्रेमाची भाग 5 अंतिम

आपल्या माणसाच्या प्रेमाची थोडी जाणीव ठेवा नीट वागा
जाणीव प्रेमाची भाग 5 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

ती दुसर्‍या दिवशी दुकानात जात होती.

"साक्षी. " आवाज आला ती थांबली. परेशला बघून तिला आश्चर्य वाटल.

तो तिच्याकडे बघत होता. "थोड बोलायच होत."

"चला घरी." तो आला.

"काय झालं साक्षी परत का आलीस?" सरला ताई विचारत होत्या.

तिने बाहेर बघितल. परेश आत आला. आई बाबांची धावपळ झाली. बाबा खुर्ची घेवून आले. आई आत चहा टाकत होती. बाबा पटकन पिशवी घेऊन दूध घ्यायला गेले.

तो घराकडे बघत होता. गरिबीची परिस्थिती होती. तरी ते लोक त्याच्याशी नीट वागत होते. साक्षी शांत होती. हे का आले आहेत. मला मेडिकल मधे जायला उशीर होतो आहे.

चहा झाला. साक्षी चहा घेवून आली.

थँक्यू. तो चहा घेत होता.

साक्षी त्याच्याकडे बघत होती. आई, बाबा बाजूला उभे होते.

"मला तुझ्याशी बोलायच साक्षी. मला ही कोर्ट केस नको. तू म्हणशील तर आपण सोबत राहायच का?" त्याने विचारल.

तिला आश्चर्य वाटल. पण नको त्या घरी परत जाण. ते त्यांच्या घरचे विचित्र लोक आहेत. परत भांडण होईल. हे रागवतात. तोच मानसिक त्रास.

"मला जमणार नाही." तिने डायरेक्ट सांगितल.

तो आई, बाबांकडे बघत होता.

"मी निघू का? मला काम आहे वेळ झाला तर अर्धा दिवसाचे पैसे कापतात. "साक्षी म्हणाली.

" काय घाई आहे? थांब ना साक्षी मी बोलतो आहे ना." परेश म्हणाला.

"मला माझ बघावं लागेल ना. " ती निघाली.

परेश... रमेश राव, सरला ताई बसले होते.

" मामा मामी तुम्ही साक्षीला समजवा."

"तिने सगळया गोष्टीचा धसका घेतला आहे. तिला ह्या गोष्टीत खूप त्रास झाला आहे. आता साक्षी म्हणेल ते होईल. बळजबरी नको. "रमेश राव म्हणाले.

" आता मी आणि आई, बाबा सेपरेट रहातो. दोघ भाऊ वेगळे आहेत."

"ते घर तुमच्या बाबांच आहे ना? "

" हो. मी पण प्लॉट घेतला आहे. बंगला बांधतो आहे. काम होईलच. मला साक्षी सोबत रहायच आहे. मी वचन देतो. यापुढे साक्षी काही त्रास होणार नाही. "

"तुम्ही तुमच्या घरी आधी विचारा. मग हे ठरवा. तुमच्या आई... त्यांना साक्षी आवडत नाही. तुम्ही तिची बाजू घेवू शकाल का? साक्षी शांत आहे. घाबरते. मागचा अनुभव भयानक होता. तिला खूप त्रास झाला. कशी तरी ती सावरली आहे. आता परत त्रास झाला तर तिला सहन होणार नाही." रमेश राव म्हणाले.

" मी आहे ना . मला ही बर्‍याच गोष्टीचा उलगडा झाला आहे. माझी चूक झाली. तेव्हा समजल नाही. "परेश म्हणाला. तो थोड्या वेळाने घरी गेला.

त्याने रात्री तिला फोन केला. तिला आश्चर्य वाटलं. ती पण व्यवस्थित बोलत होती. त्याच्या घरच्यांची चौकशी केली. त्याने विचारलं." तुला इथे राहायला यायचं आहे की घटस्फोट हवा आहे?"

"मला तिकडे यायच नाही." तिने सांगितल.

"साक्षी ,मी आणि आई बाबा रहतो. नवीन बंगल्यात शिफ्ट होऊ. दोघ भाऊ सेपरेट आहेत. "

"माझ्या चुका होतात. मला सासुबाई म्हणतात तस काम येत नाही. परत तुम्ही चिडाल." ती म्हणाली.

तिच्यात अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. ती आता सासर म्हटलं तरी घाबरत होती.

"आता अस होणार नाही. माझी चुक झाली. तुला समजून घेतल नाही. प्लीज एक चान्स दे. आपण आता एकदम नीट राहू. घरकामाला बाई ठेवू. "

"तुमच्या समोर घरचे वेगळे वागतात. माझ्याशी वेगळे वागतात .खूप त्रास देतात. तुम्हाला सांगितल तर तुम्ही मारायला धावतात. मला तिकडे भीती वाटते. मला जमणार नाही. तुम्ही मला फोन करू नका. " तिने फोन ठेवून दिला.

मधे एक महिना गेला. परेश खूप प्रयत्न करत होता. साक्षी होकार देत नव्हती. तिची परीक्षा होती ती खूप अभ्यास करत होती.

परीक्षे साठी शहरात जायच होत. त्याने जबाबदारी घेतली. तो सोबत होता. सकाळी तो तिला घ्यायला आला. तिची रस्त्याने काळजी घेतली. दिवसभर तो शांत होता. व्यवस्थित वागत होता.

परीक्षा झाली. तिला पेपर चांगला गेला. सरकारी नोकरीची खात्री होती.

ते दोघ हॉटेल मधे आले. त्याने जेवणाची ऑर्डर दिली. तिची आवड निवड अजूनही त्याच्या लक्ष्यात होती. दोघांमधे बर्‍या पैकी बोलण झाल. तिला बर वाटत होत.

"माझ्या सोबत राहशील का साक्षी. नाहीतर मी तुझ्या आईकडे रहायला येईल."

तिला दिसत होत तो बदलला आहे. तिने होकार दिला.

"पण मला आई बाबांना सपोर्ट करावा लागेल. तुम्ही बघितली ना त्यांची परिस्थिती कशी आहे. अजून आपल्या लग्नाच कर्ज डोक्यावर आहे."

"किती आहे?"

"विशेष नाही दोन तीन लाख आहे. पण ते ही देण जमत नाही. नुसत व्याज देत आहेत."

"मी ते पैसे भरतो. जमीन सोडवून घे."

"तुमच जमेल? "

" हो इतके दिवस तू नव्हती. काही खर्च नव्हता पूर्ण पगार बाजूला पडत होता. "

परेशने कर्ज फेडलं. साक्षी खुश होती.

एक मीटिंग भरवली. त्यात आई, बाबांना सगळ्यांनी थोडे थोडे दिवस सांभाळायच अस ठरवल.

ती सासरी आली. घराकडे बघत होती. बापरे काय अवतार करून ठेवला आहे. एक बाई कामाला आली. तिच्या मदतीने तिने साफ साफसफाई केली. स्वयंपाक केला.

बर्‍याच दिवसांनी त्यांनी चांगल खाल्लं. तीच आवरलं. ती रूम मधे आली. तो वाट बघत होता. त्याने तिला मिठीत घेतल. दोघ रडत होते.

"मला मनापासून तुझी माफी मागायची आहे."

"जुना विषय सोडा. आता आपण आधी सारख वागणार नाही. त्याबद्दल बोलणार ही नाही."

तिला तिचा संसार नवरा परत मिळाल होता. ती त्याच्याजवळ खुश होती. तो ही तिला जपत होता.

सकाळी सहालाच ती उठली घर झाडलं. पाणी भरलं. लगेच चहा ठेवला. त्याचा डबा केला. पोहे केले . लगेच धुणं धुवायला घेतलं.

तो उठून आला. त्याची अंघोळ झाली. चहा नाष्टा दिला. डबा भरून दिला. सासूबाईंना चहा दिला. ती भराभर आवरत होती. सासुबाई गप्प होत्या. दुरून बघत होत्या. त्यांच्यात संवाद नव्हता. सासरे लक्ष देवून होते. सुखाचे दिवस जात होते.

ती पास झाली. तिला नोकरी लागली. इथून तिकडे जाण लांब पडत होती. ते दोघ बंगल्यावर शिफ्ट झाले. थोडे दिवस सासू सासरे लहान भावाकडे राहिले.

आज घराची पूजा होती. सगळे पाहुणे आले होते. परेश साक्षीच वैभव सगळे बघत होते. तिला मोठ्या पगाराची नोकरी लागली. दाग दागिने. बंगला वाह. त्यात परेश तिची काळजी घेतो. वहिनी, सासुबाई एकमेकींकडे बघून गप्प होत्या.

साक्षी, परेश खुश होते. त्यांच्यात काही प्रॉब्लेम नव्हता. तिची नोकरी नीट सुरू होती. ती आई बाबांची काळजी घेत होती. त्यांना दर महिन्याला पैसे पाठवत होती.

"साक्षी खूपच छान दिसते आहेस काही विशेष? " सरला ताई तिच्याकडे बघत होत्या.

" आई आनंदाची बातमी आहे अस वाटत आहे."

"आता काळजी घे."

परेश तिला फुलासारखं जपत होता.

तिचे दिवस भरत आले तिने सुट्टी घेतली. आई बाबा इकडे रहायला आले होते. तिला मुलगी झाली. परेश खूप खुश होता. सगळे भेटणारे येत होते.

बर झाल मी योग्य वेळी योग निर्णय घेतला. नाहीतर या सुखाला मी मुकलो असतो. आज माझ्या हातात माझ बाळ आहे.

तो साक्षीला भेटायला आत गेला. तिच्या कपाळावर ओठ टेकवले. दोघ प्रेमाने एकमेकांकडे बघत होते.

🎭 Series Post

View all