जाणीव प्रेमाची भाग 1
©️®️शिल्पा सुतार
परेश सकाळी फिरून आला. तो घरात शिरला. त्याची आई पुढे बसली होती. " परेश हे काय सुरू आहे सकाळ पासून."
"काय झालं आई? "
"तुझी बायको अजून उठली नाही."
" आई, साक्षीला बर नाहिये. तुला माहिती आहे ना." त्याने सांगितलं. तस तो साक्षीच्या बाजूने नव्हता. पण सकाळी वाद नको म्हणून तो म्हणाला. आई सोबत तो ही साक्षीला त्रास देत होता.
" झाले ना आता दोन तीन दिवस. किती दिवस दुखणं धरून बसणार. घरात अस चालत का?" त्या म्हणाल्या.
परेश रागाने डायनिंग हॉल मधे आला. तिथेच ते दोघ झोपत असतं. त्यांना रूम नव्हती. थोडा टेबल बाजूला सरकवून गादी टाकून ते झोपत होते.
घरात तीन चार लोक कमवत होते. तरी मोठ्या घरात रहायला जात नव्हते. एक बेडरूम हॉल किचन एवढ घर होत. बेडरूम मधे मोठा भाऊ, वहिनी त्यांचे मुल होते. तस परेश, साक्षीच लग्न झाल्यावर सासुबाई म्हणाल्या होत्या त्याने बेडरूम मधे राहू दे. पण मोठ्या वहिनीने ते ऐकलं नाही.
हॉल मधे आई, बाबा, लहान भाऊ रहात होते.
परेश साक्षी जवळ आला. "किती वाजले. ही झोपायची पद्धत आहे? उठ चहा पाणी कर."
"मला चक्कर येत आहेत." ती क्षीण आवाजात म्हणाली.
सासुबाई येवून उभ्या राहिल्या. "खात पीत काय झालं हिला."
" अजूनही ब्लडींग होत आहे." ती कष्टाने म्हणाली. ती परेशकडे आशेने बघत होती. बाकीचे जावू दे. ज्याचा अंश माझ्या पोटात होता. त्याला ही माझी काही पडली नाही. तीच मिसकॅरेज झाल होत. खुप त्रास होत होता. ती परेश डॉक्टर कडे जावून आले होते. पण उठून काम करण्या इतका अंगात जोर नव्हता.
सासुबाई ओरडत होत्या. जाऊबाईच तोंड सुरू होत. परेश चिडला. "सगळे इतक बोलतात तरी तुला समजत नाही का. उठ ना."
"अहो मला नाही जमत." तिच्या डोळ्यात पाणी होतं.
"उठ तू काही मरणार नाही. जगात तू पहिली बाई नाही जिला अस झाल. जो आराम करायचा तो रात्री करत जा."
नवरा अस म्हणतो आहे. काही इलाज नव्हता. ती कशीतरी उठली. आंघोळ करून आली. थोडे पोहे केले.
परेश बाहेर आई जवळ बसला होता.
"हिला ना माहेरी जावू दे. दणका दिल्या शिवाय ते लोक ऐकणार नाहीत. तिला काही येत नाही. प्रेमाने वागत नाही. लग्नाला सहा महिने झाले तरी तीच आपल्यात मन काही लागल नाही. कोणाच काही ऐकत नाही. तू ऑफिसला गेल्यावर परत झोपून घेईल. तेव्हा तर ती आमच काही ऐकत नाही. तुझ्या वहिनी मागे मूल आहेत. मी अशी. माझे गुडघे दुखतात." आई सांगत होती.
"आज तिच्या घरी फोन करतो. थोडे दिवस माहेरी गेली म्हणजे समजेल कस वागायचं ते. "परेश म्हणाला.
" हो आणि सगळे काम शिकवून पाठवा म्हणा. नाहीतर तिला तिकडे ठेवून घ्या. वाटल नव्हत अशी निघेल. "
सासुबाईंनी परेशचे कान भरून भरून त्यांच्या संसाराच वाटोळ करून ठेवल. परेश ऑफिस मधे आला. डोक्यात राग भरलेला होता. त्याने साक्षीच्या घरी फोन केला.
रमेश रावांचा फोन वाजत होता. परेश नाव बघून त्यांनी फोन उचलला. "बोला जावई बापू."
"तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे या तुमच्या मुलीला घेवून जा." तो रागाने म्हणाला.
"काय झालं?" ते घाबरले.
"काय झालं, कस झाल मला काही विचारू नका. मी ऑफिस मधे आहे. तुमच्या मुलीने आम्हाला त्रासून सोडलं आहे. तिला चार गोष्टी शिकवा."
"अस कस? ती अतिशय हुशार, साधी, चांगली मुलगी आहे."
"ते तुमच्यासाठी, आमच्या साठी घमंडी, आकडू, उलट उत्तर देणारी मुलगी आहे. जी घरच्या मोठ्यांना कामाला लावते. दिवसभर झोपून असते. " परेश म्हणाला.
" अस नाहिये जावई बापू. मी तिला समजावतो. "
"नाही याची काही गरज नाही. तुम्ही या तिला घेवून जा. सहा तास वेळ देतो. नाहीतर मी ऑफिस हून घरी गेलो की तिला घराबाहेर काढेल. दिवस रात्र बघणार नाही. " परेश म्हणाला.
"समजुतीने घ्या. आता तर लग्न झाल. ती अल्लड आहे. मी बोलतो तिच्याशी. " रमेश राव म्हणाले.
" तिला घेवून जा. मला काम आहेत. रोज उठून भांडण सोडवायला वेळ नाही. सांगितल तेवढं करा." त्याने फोन ठेवला.
रमेश राव शर्ट घालत होते.
" कुठे निघाले कोणाचा फोन होता? " सरला ताई काळजीने विचारात होत्या.
"परेश रावांचा. "
" काय झाल? "
"म्हणता आहेत साक्षीला घेवून जा. काहीतरी भांडण झाल आहे." सरला ताई काळजीत होत्या. काय झालं असेल ती फोनवर काही बोलली नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा