जाणीव प्रेमाची भाग 2
©️®️शिल्पा सुतार
रमेश राव लेकीचा सासरी आले. साक्षी... त्यांनी आवाज दिला. ती येवून भेटली. चेहरा उतरलेला होता .
" बर वाटत नाही का बेटा? काय झालं? "
" हो बाबा. आई नाही आली? " तिला वाटल बाबा तिला भेटायला आले.
सासुबाई खूप बोलत होत्या. चहा पाणी ही विचारल नाही. "हिला घेवून जा."
साक्षीला काही समजत नव्हतं. तिने परेशला फोन केला. "अहो बाबा आले."
"हो मीच बोलवून घेतल. थोडे दिवस माहेरी जा. घरच्यांशी कस नीट वागायचं ते शिकली की परत ये. नाहीतर तिकडेच थांब."परेश म्हणाला.
" अहो अस नका करू .मला इथे रहायचं." साक्षी घाबरली.
"तू कोणाच ऐकते का."
" मला बर वाटत नाही. म्हणून झोपली होती. आपल बाळ गेलं. तुम्ही अस करु नका. मला तुमच्या आधाराची गरज आहे." ती समजावत होती.
" माझ्या समोर हे चालणार नाही. तुझ्या वडिलांसोबत घरी जा."
" तुम्ही घ्यायला याल का? "
"पुढच पुढे बघू."
सासुबाई रागाने बघत होत्या. त्यांनी काही ऐकलं नाही. बॅग घेवून साक्षी निघाली. घरी येवून ती खूप रडत होती. सरला ताई तिच्या आजुबाजूला होत्या.
"काय झालं बेटा ?"
" हे माझी बाजू घेत नाही. नुसत आई, वहिनी म्हणेल ते ऐकतात. माझ चुकलं नाही. तरी मला घरी पाठवून दिल. मला वाटत ते घ्यायला येणार नाही. आई आता कस होईल? मी तिकडे नीट वागते. ते सांगेल ते करते. मला बर नाही म्हणून झोपून होते. चक्कर येत होती."
तिला लगेच डॉक्टरकडे गेल." यांच मिसकाॅरेज झाल आहे. दोन महिने झाले होते. खूप वीकनेस आहे मी टॉनिक लिहून देते. आराम करायचा साक्षी. "
पोरगी पोटुशी होती. तीच बाळ गेल. सरला ताई रडत होत्या.
"काय लोक आहेत समजून ही घेत नाही .त्यात परेश राव असे करतात. त्यांना सांगितल होत का?"
" हो त्यांना सगळं माहिती आहे. आई माझ आयुष्य असच गेल." ती परत रडत होती.
माहेरची गरिबी होती. आई, बाबांना बर्याच वर्षानी झालेली साक्षी. तिघे घरी होते. छोटा जमिनीचा तुकडा होता. त्यावर साक्षीच्या लग्नासाठी कर्ज घेतल होत. बाबा शेतात काम करायचे. आई असच याच्या त्याच्या शेतावर मजुरी साठी जायची. काय कराव अस झाल होत. पोरगी सुखी राहील म्हणून जमत नव्हत तरी चांगल्या घरी तीच लग्न केल. ती सहा महिन्यात परत आली. आई बाबा दोघ रात्रीचे गुपचूप रडत होते.
साक्षी झोपलेली होती. तिला ताप भरला होता. ती झोपेत बडबड करत होती. माझ काही चुकलं नाही. मला सोडू नका मी हात जोडते. सरला ताई डोळे पुसत तिच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होत्या.
आठ दिवसांनी त्यांना मीटिंग साठी बोलावलं. साक्षी, रमेश राव, सरला ताई मध्यस्तीच्या घरी गेले. सासरचे लोक बसलेले होते. परेश, साक्षीकडे बघत होता. " मला फारकत हवी आहे. हिच्या सोबत मी राहू शकत नाही."
साक्षी डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे बघत होती. "अहो काय बोलताय? एवढ्याश्या गोष्टी वरून अस करतात का? मला तुमच्याशी बोलायच आहे."
"जे बोलायच इथे सगळ्यांसमोर बोल. " परेश तिथेच बसुन होता.
" अहो ऐका ना. तुम्ही म्हणाल तर मी सगळ्यांची माफी मागते. मला अस सोडू नका." तीच काही चालल नाही.
ती गयावया करत होती. त्याला काही फरक पडला नाही तो आईशी बोलत होता.
लग्न झालं तेव्हा किती प्रेम होत त्यांच्यात. काय करू काय नको अस परेश करत होता. साक्षी ही त्याची काळजी घ्यायची. पण अस काय झाल ते सहा महिन्यात ते आटलं. घरच्यांमूळे हे झाल.
मध्यस्ती बोलत होते. "बोला काय प्रॉब्लेम आहे?"
"तिला विचारा ना काय प्रोब्लेम आहे ते. काही करायला नको की लवकर उठून आवरायला नको. नुसत आपल हे होत ते होत. माझी आई, वहिनी कायम कामात होती. आता हीला काय लग्न करून असच आणलं होत का? त्यांनी काम करायच ही बसुन रहाते." परेश मोठ्याने बोलत होता.
ती नकार दर्शी मान हलवत होती.
"तू सांग साक्षी बेटा काय प्रॉब्लेम होता." मध्यस्ती काका विचारत होते.
"एवढ्या चांगल्या शब्दात सांगितलेलं तिला समजत नाही काका. बोलतांना अस अंगावर धावून जा. दोन शिव्या द्या तेव्हा ती ऐकते." परेश मधेच म्हणाला.
"परेश तू गप्प बस. काय झालं साक्षी?"
"मी मला जमेल तसं करत होती. पण या लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत. सदोदित कामात चूक काढायची. मला काहीही करायची भीती वाटायची. तरी मी सगळं करत होते. "
" सगळं केल असत तर ही वेळ आली असती का? किती वेळा सांगितल. माझ्या आई, वहिनी बद्दल काही बोलायचं नाही. तरी बघितल ही कस करते. " परेश ओरडला.
" तिला मोकळ बोलू दे परेश . "ते काका परत म्हणाले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा