एक मुलगी आपला मोबाईल बाजूला बसलेल्या मुलीला दाखवत " वैष्णवी हे बघ ग्राफिक डिझाईन स्पर्धा.."
वैष्णवी तिच्या हातातल्या मोबाईलमध्ये बघते तर एक ग्राफिक डिझाईन स्पर्धेची जाहिरात होती.. पण स्पर्धेत एन्ट्री फी २०० रू भरावी लागणार होती..
वैष्णवी ती ॲड बघून " अग यात तर २०० रू शुल्क आहे.."
ती मुलगी " हो मग काय झाल बक्षीस बघ
पहिला क्रमांकाला आठ हजार ,दुसरा क्रमांकाला पाच हजार आणि तिसरा क्रमांकाला तीन हजार आहेत.. मी घेणार भाग..."
पहिला क्रमांकाला आठ हजार ,दुसरा क्रमांकाला पाच हजार आणि तिसरा क्रमांकाला तीन हजार आहेत.. मी घेणार भाग..."
वैष्णवी " अग पूर्वा पण.."
वैष्णवी पुढे काही बोलणार तर तिला मध्येच ठोकत पूर्वा" मी घेणार भाग.. माझ्याकडे सेविंग्ज आहेत. कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपल्या मर्जीने काम केलेल बर..."
वैष्णवी " अग पण..."
वैष्णवी तिला काही बोलणार होती पण ती तिच न ऐकताच तिथून निघून जाते...
ती गेल्यावर वैष्णवी मनात " या मुलीला का काही कळत नाही.. तिला स्वतःवर इतका विश्वास आहे की तिला वाटतय माझाच नंबर लागेल.. पण हे बरोबर नाही. जर तिचा यावेळी यात नंबर नाही लागला तर ती खचून जाईल. आणि ती जाहिरात खोटी पण असू शकते."
वैष्णवी बोलत असतानाच तिथे एक मुलगा येतो.. त्याच्या हाक मारण्याने ती भानावर येते..
वैष्णवी त्या मुलाकडे बघत " अरे रुपेश.. तू कधी आलास ? "
रुपेश " मी आताच आलोय.. काय झाल तू इतकी टेन्शनमध्ये का आहेस? "
वैष्णवी " अरे ती पूर्वा....................." रुपेशला आता जे काही घडल ते सगळ सविस्तर सांगते..
रुपेश सगळ ऐकून कपाळाला हात लावत " ही मुलगी कधी नाही सुधारणार.. ही जर अशीच करत राहिली तर एक दिवस डिप्रेशनमध्ये जाईल नाहीतर वेडी होईल... "
वैष्णवी " हे खर आहे.. पण तिला जर यातून बाहेर नाही काढल तर पुढे खूप अवघड होऊन बसेल... आणि ती जाहिरात खोटी पण असू शकते. काही जण पैसे कमविण्यासाठी अश्या खोट्या जाहिराती देतात. मग आपण त्यात शुल्क भरून भाग घेतो."
रुपेश " काहीतरी करावं लागेल आपल्याला. आजकाल अश्या खोट्या जाहिराती जास्त आल्या आहेत. मग आपला गोंधळ होतो. समजत नाही की कोणत्या जाहिराती खऱ्या आहेत."
वैष्णवी " मला पूर्वाची काळजी वाटतेय. तिला काही झालं तर ? "
रुपेश " काळजी नको करुस. तिला काही झालं तर आपण आहोत तिच्यासोबत. तिला काहीच होऊ नाही द्यायचं. आता चल लेक्चर सुरू होईल. "
वैष्णवी " हो चल."
बोलून झाल्यावर रुपेश आणि वैष्णवी आपल्या क्लासरूममध्ये निघून जातात. दोघं क्लासरूममध्ये येतात तर त्यांना पूर्वा खूप खुश दिसली. तिला अस बघून दोघांना खूप काळजी वाटत होती. पुढे जाऊन काही चुकीचं होऊ नये यासाठी दोघं पार्थना करत होते.
एके ठिकाणी एक व्यक्ती मोबाईलमध्ये काहीतरी करत होता. सोबत त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हसू क्षणाक्षणाला झळकत होत.
क्रमशः
©भाग्यश्री परब
सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.. हीचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा