Login

जाणीव सत्याची (भाग - ५) (अंतिम)

तिला खऱ्या गोष्टीची जाणीव होईल का ? की खोट्या गोष्टीत अडकून पडेल? जाणून घेण्यासाठी वाचा जाणीव सत्याची
तेवढ्यात त्यांच्या कानी दोन जणांचे आवाज येतात.
" आम्ही सांगतो की पूर्वाची अशी अवस्था कशी झाली? "

तस पूर्वा सोडून तिघांच लक्ष आवाजाच्या दिशेने जात. बघतात तर समोर रुपेश आणि वैष्णवी उभे होते. दोघांना ओळखत असल्याने कोणी काही बोललं नाही.

रुपेश आणि वैष्णवी सोफ्यावर येऊन बसतात.

वेळ न घालवता रुपेश " काका.. आम्ही दोघांनी पूर्वाला आधीच कल्पना दिलेली की अश्या जाहिरातीवर लगेच विश्वास ठेवू नको. तरी तिने आमचं काही ऐकलं नाही. "

पूर्वाची आई " मग हीची ही अवस्था ? "

पूर्वाच्या आईच प्रश्न ऐकून वैष्णवी " आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये पोहचलो तेव्हा पूर्वा वेड्यासारखी रडत होती. आम्ही तिला विचारल्यावर समजल की कोणीतरी काकांच्या खात्यातून पूर्ण पैसे काढून घेतले आहेत. हे बघून पूर्वा खूप घाबरलेली. आम्हाला समजत नव्हत की काय करावं. मग आम्ही  विचार करून तक्रार नोंदवण्यासाठी लगेच पोलीस चौकीत गेलो. तर तिथे तक्रार नोंदवत असताना समजल की आताच एका गुन्हेगाराला पकडण्यात आलं आहे. नंतर समजल की तो तोच गुन्हेगार होता जो खोट्या जाहिराती पसरवून लोकांचे मोबाईल हॅक करून त्यांच्या खात्यातून पैसे काढून घ्यायचा. आणि पूर्वा या खोट्या जाहिरातीला बळी पडली.

हेच नाहीतर असे अनेक मार्ग आहेत जे काही जण पैसे मिळवण्यासाठी लोकांना अश्या खोट्या जगात आणतात. आणि या खोट्या जगात अनेक लोक बळी पडतात. 

काका तुम्ही काही काळजी करू नका. पोलिसांच काम झालं की तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. "


वैष्णवीच बोलून झाल्यावर अचानक पूर्वा रडू लागली. ती रडतच " बाबा.. मला माफ करा. मी तुमचं काही ऐकलं नाही. तुम्ही जे बोलायचे ते खर होत. या जगात खोटे जग पण आहेत. जिथे लोकांची अशी फसवणूक होते. "

तिचे बाबा तिला जवळ " रडू नकोस. तुला आता समजल तरी की कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास नाही ठेवायचा. त्या गोष्टीची आधी खात्री करून घ्यायची की ती गोष्ट बरोबर आहे की नाही. मगच पुढे जायचं.

आता रडणं बंद कर बघू. माझी मुलगी खूप हुशार आहे मला माहितीय. फक्त स्वप्नांच्या मागे धावत असताना तिला सत्याची जाणीव नाही झाली. "


पूर्वा अश्रू पुसत हसतच " हो.. आता मला सगळ समजल आहे. मी आता खरे आणि खोटे जाणून घेतल्याशिवाय पुढे नाही जाणार. "


पूर्वाची आई  " हो.. माझी गुणाची मुलगी."


आईचं ऐकून तिचा मोठा भाऊ " आणि मी.."

पूर्वा पटकन " तू माकड. "

भाऊ " मग तू उंदीर. "


या दोघांची तू तू मे मे बघून हे तिघ गालातल्या गालात हसत होते.


काही महिन्यांनी..

पूर्वा आता सगळ्या गोष्टी निरखून आपल्या स्वप्नांना पूर्ण करत होती. तिला वेळेवर सत्याची जाणीव झाल्याने ती योग्य मार्गावर जाऊ शकली. नाहीतर तिने आतापर्यंत स्वतः वर असलेला आत्मविश्वास गमावला असता.