वर्गाचे तास संपल्यावर पूर्वा लगेच घरी निघून येते. आल्यावर पटकन त्या जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसर अर्ज आणि शुक्ल भरून टाकते.
अर्ज भरून झाल्यावर तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता." अर्ज भरून झालं आहे. आता २०० रू कसही करून बाबांना द्यावं लागेल. बाबांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खात्यातून पैसे भरले आहेत तर खूप ओरडतील. तरी गप्पपणे ओरडा खाऊन घेऊ. नंतर नंबर लागल्यावर ते खुश होतील." ती मनातच बोलून तयारीला निघून जाते.
पूर्वा एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर होती. ती जेव्हा ग्राफिक्स डिझाइन करायला लागायची तर त्यात पूर्ण मग्न होऊन जायची. जणू ते तिच जीव की प्राण झालेल. तिचं स्वप्न होत की एका मोठ्या स्पर्धेत भाग घ्यावा ज्यात तिला खूप फायदा होईल. आणि योगायोगाने तिला एक जाहिरात दिसली ज्यात जिंकणाऱ्याला मोठं मोठे बक्षीस जाहीर केलेले. पण त्यात शुक्ल असल्याने ती आधी नाराज झालेली. नंतर तिने विचार केला की आपण जमा केलेले पैसे देऊ. तिचं बँकेत खात नव्हत त्यामुळे तिला बाबांच्या बँक खात्यातून शुक्ल जमा करावे लागणार होते. तिच्या वडिलांच्या बँक खात्यात तिचा मोबाईल नंबर वैगरे होता. मग तिने शक्कल लढवली की आधी बाबांच्या खात्यातून पैसे भरू मग नंतर त्यांना आपल्याकडचे पैसे देऊ. तिने वेळ न घालवता बाबांच्या खात्यातून शुक्ल भरून टाकले. पण तिने खूप मोठी चूक केलेली. तिच्या बाबांना आताच्या फसवणुकीमुळे ऑनलाईन पैसे भरणे आवडत नव्हते. जेव्हा पण काही घ्यायचं वैगरे असेल तर ते कॅशच द्यायचे.
वेळ रात्री...
पूर्वाच घर...
जेवून झाल्यावर पूर्वाच कुटुंब गप्पा मारत बसलं होतं. हीच वेळ आहे बोलायची समजून पूर्वा तिच्या वडिलांच्या शेजारी येऊन बसते.
पूर्वा हळू आवाजात " बाबा."
पूर्वाच्या आवाजाने सगळे शांत होतात.
पूर्वाच्या आवाजाने सगळे शांत होतात.
सगळ्यांना शांत झालेल बघून पूर्वा " बाबा. एक जाहिरात बघितली त्यात ग्राफिक्स डिझाइन मोठी स्पर्धा आयोजित केलेली. त्यात दोनशे रुपये शुल्क होते. आणि ते ऑनलाइनच भरायचे होते. तर मी तुमच्या खात्यातून ऑनलाईन पैसे भरले आहे. ( आपल्या हातात असलेले पैसे त्यांच्या समोर पकडत ) हे दोनशे रुपये तुमच्या खात्यातून भरलेले. काळजी नका करू पैसे वाया नाही जाणार. या स्पर्धेत मी नक्की जिंकणार आणि मला मोठं बक्षीस भेटणार. म्हणजे आपला फायदाच आहे. "
पूर्वा आता जे काही बोलली ते ऐकून बाबांचा रागाचा पारा चढला. त्यांनी पूर्वाने समोर पकडलेले पैसे धुडकावून दिले. त्यामुळे ते दोनशे रुपये हवेत तरंगत जमिनीवर पडले.
पूर्वाचे बाबा जागेवर उठून तिच्याकडे रागात बघत ," तुझ डोकं ठिकाणावर आहे ना ? तुला माहिती आहे तू काय केलं आहेस. तुला हेही माहिती होत की मला ऑनलाइनमध्ये पैसे दिलेले नाही आवडत. तुला मोबाईल देऊन खूप मोठी चूक केलीय. ( टेबलावर ठेवलेला तिचा मोबाईल घेत ) आता यापुढे हा मोबाईल माझ्याकडे राहील फक्त. कधीच भेटणार नाही आणि हातही नाही लावायचा. तुझ्या हातात मोबाईल दिसला तर बघ. "
एवढ बोलून ते आपल्या खोलीत जाणार तर पूर्वा त्यांच्या हाताला पकडून त्यांना अडवत " बाबा.. बाबा.. अस नका करू. मी या संधीची खूप वाट बघितली. कृपा करून अस नका करू बाबा. मी जर या स्पर्धेत भाग नाही घेतला तर माझी स्वप्न धुळीस जाणार."
बाबा तिचे हात झटकून " हे सर्व करण्याआधी विचार करायचा होतास. " एवढ बोलून ते तिच पुढच काही न ऐकता खोलीत निघून जातात.
बाबांना गेलेले बघून पूर्वा कळकळीने " बाबा.." आवाज देते. पण तिचे बाबा तिचं ऐकायला होते कुठे ? ते कधीच खोलीत निघून गेलेले.
क्रमशः
©भाग्यश्री परब
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा