Login

कथा -जाणीव भाग २

Story About Backward Boy
कथा -जाणीव भाग २


कसे तरी चार घास पोटात ढकलण्या पुरती रोजची बिदागी सुद्धा या लोकांच्या नशिबात नव्हती.
माय! 'उद्या मी जाणार नाही, दगड फोडाले'... ' हात लय दुखते'... मायनं त्याला जवळ घेतले. त्याच्या अंगावरून हात फिरविला. 'खंड्या, माया पोरा ''मले आज काम मिळते, उद्या नाही'.' तू जर गेला नाही, तर या तुझ्या बापाले कसं खाऊ घालायचं बरं'! 'थांब मी उद्या पाह्यतो'.

वस्तीवर सगळीकडे रात्री चुली पेटल्या. पण भागी ची चूल मात्र पेटली नाही. आजची रात्र तशीच पाणी पिऊन काढावी लागणार... खंड्या च्या छोट्या निरागस पोटाला सुद्धा तशी सवय झाली होती. त्या रात्री खेळता खेळता शेजारची लहान तान्ही आली .'का रे खंड्या'! 'काय खाल्लं आज'? खंड्याचा चेहरा भुकेने व्याकूळ झाला होताच. त्याने 'काही हाय काय तुह्या पालावर खायला?' 'मी देतो. म्हणून तान्ही त्याला घेऊन गेली. तान्हीच्या मायनं ज्वारीच्या कण्या शिजवायला टाकल्या होत्या. तिने त्याला त्या कण्या खायला दिल्या. भुके मुळे त्या कण्या त्याला जणू अमृत वाटायला लागल्या. व त्या खाऊन, कामाने थकल्यामुळे तेथेच त्याने झोपे ने मान टाकली.

भागी त्याला शोधत शोधत तान्हीच्या घरी आली. 'माह्या खंड्या आला काय तान्हे तुया घरी'?' हो जी बाई!'
खंड्या ले लय भूक लागली होती .म्हणून मी त्याला खायला रांधलेल्या कण्या खायला दिल्या.
'अवं तान्ही ची माय, बरं झालं !तू माह्या पोराले खाऊ घातलं.' 'तुये लय उपकार झाले'...

उद्या धाडतो, त्या शेवंता दादीच्या घरी. काही काम असन तर....
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही मायलेक शेवंता दादीच्या वाड्यात गेले. तिथं दुरूनच पाया पडले दोघेजण.'काय म्हणते भागी'? शेवंताने दोघांनाही प्यायला पाणी दिले .दुरूनच हाताची ओंजळ करून दोघेही पाणी प्यायले .शेवंताच्या वाड्यात कामाची गरज होतीच. तीने त्याला ठेवून घेतले.

खंड्या तिथे पडेल ते काम करू लागला . दूरच्या विहिरीवरून पाणी आणणे, झाड पुस करणे, गोठा स्वच्छ करणे, आणि दुरूनच ओंजळीने पाणी पिणे ...
त्याकाळी 'अस्पृश्यता' वरच्या थरातील लोकांच्या मनात' मनु स्मृती ने' ठासून भरलेली होती.
खंड्याच्या मनाला वाटे, ही माणसं आपल्याला दूर लोटतात .आपला साधा स्पर्शही त्यांना चालत नाही. जसा जसा तो मोठा होऊ लागला, त्याच्या मनाचा संताप होत होता. हे तो त्याच्या आई आणि बाबाला बोलून दाखवायचा. अधू झालेल्या बापाला त्याची वेदना कळत होती. पण तो काहीही करू शकत नव्हता. भेटलेलं शिळं अन्न खाऊन त्याला कंटाळा यायला लागला.


खंडाच्या मनाचा उद्रेक होतो का पाहूया पुढच्या भागात, भाग ३ मध्ये

छाया राऊत अमरावती 8390086917