कथा-जाणीव भाग 3 अंतिम
एक दिवस सकाळीच तो ,अनवाणी पायाने, फाटक्या कपड्याने, वाट मिळेल तिकडे चालायला लागला. रस्त्यावर, गुराढोरांना खायला चारा नसल्यामुळे, गुराढोरांच्या शरीराचा सापळा झालेला होता. काही लोक कामाच्या शोधात बायका पोरांना घेऊन चालत होती .
चालताना, एखाद्या खेड्यातल्या वाड्यावर जाऊन, ओंजळीने दुरूनच पाणी प्यावे लागे.
चालताना, एखाद्या खेड्यातल्या वाड्यावर जाऊन, ओंजळीने दुरूनच पाणी प्यावे लागे.
भागी ने खंड्याला संपूर्ण वस्तीवर शोधले .परंतु सगळीकडून नकारच यायला लागला. 'कुठं गेला असन माह्यं पोरगं'? त्याच्या काळजीने भागी ला व त्याच्या बा ला झोप येईना.
चालता चालता अचानक खंड्या ची नजर एका म्हाताऱ्या वर पडली. म्हातारा एका लिंबाच्या झाडाखाली अस्ताव्यस्त पहूडलेला होता. त्याच्या अंगावरील पांढरे कपडे नुकतेच मळल्या सारखे वाटत होते. असे वाटत होते, जणू आत्ताच कुणाशी तरी झटापट झालेली असेल... त्याने म्हाताऱ्याला उठविले. त्यांचे कपडे व्यवस्थित केले. शेतातून एका मडक्यात पाणी आणून त्यांना पाजले. म्हातार्या ला बरे वाटले. म्हातारा मुलीकडे थोडा ऐवज घेऊन दुष्काळात मुलीला मदत करण्यासाठी निघाला असताना, वाटेत त्याला दरोडेखोरांनी लुटले होते . होती नव्हती सर्व पूंजी लुटल्या गेलेली पाहून म्हातारा अस्वस्थ झाला. खंड्या ने त्यांना धीर दिला. 'दादा! काळजी करू नका तुम्ही'! 'सही सलामत आहात ना'
'झालं तर मग'! म्हाताऱ्याने खंड्या ची चौकशी केली. दादा शिकलेले होते. त्यांच्या घरी खंड्याला त्यांनी नेले .तेव्हा त्यांच्याकडची पुस्तके पाहून खंड्या भारावून गेला. त्याने शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचा शिक्षणात रस असल्याचे पाहून दादांनी त्याला मनापासून शिकविण्यास सुरुवात केली. त्यांच्या वाड्यात राहून खंडू ला प्रसन्न वाटायला लागले .दादांनी त्याला लिहायला वाचायला शिकविल्या मुळे तो त्यांची सगळी पुस्तके वाचून काढू लागला.

त्याच्या मनात वरच्या स्तरातील लोकांविषयी राग होताच... आपला समाज उपेक्षित जीवन जगतो याविषयीची चीड त्याच्या मनात होतीच.
चार बुकं वाचनात आल्याने आता त्याला त्याची प्रकर्षाने जाणीव झाली.
चार बुकं वाचनात आल्याने आता त्याला त्याची प्रकर्षाने जाणीव झाली.
आधीच कामाने, हाडांना बळकटी आल्यामुळे तो तरणाबांड तरुण" खंडेराव" झाला होता. दादा कडची सुधारणावादी पुस्तके वाचल्याने त्याचे मन विद्रोहाने पेटून उठले. आपल्या समाजा सारखाच इतरही समाज, या सडक्या मनोवृत्तीच्या लोकांच्या पायाखाली दबला जात आहे, याची त्याला घ्रुणा वाटायला लागली .तो परत वस्तीवर आला.
आता दुष्काळ उतरायला लागला होता .आकाशात मेघांची दाटी व्हायला लागली होती. यावर्षी पाऊस चांगला पडेल, या आशेने शेतकऱ्यांनी नांगर हाती घेतले.
त्याला आपल्या समाजातील अशिक्षितपणा संपवायचा होता.
सर्व लहान थोरांना शिक्षित करण्याचा त्याने विडा उचलला. त्यासाठी त्याला समाजाला जागृत करायचे होते.
त्याला आपल्या समाजातील अशिक्षितपणा संपवायचा होता.
सर्व लहान थोरांना शिक्षित करण्याचा त्याने विडा उचलला. त्यासाठी त्याला समाजाला जागृत करायचे होते.
हे पाहून भागी व त्याच्या बा चे मन भरून आले. आपल्या 'खंडेराव' कडे भागी वात्सल्याने बघतच राहिली....
छाया राऊत अमरावती 8390086917
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा