Login

जाणीव नात्याची

स्वयंपाक घरातून दोघींचे जोराजोरात बोलणं ऐकू येत होते

*जाणीव
*जाणीव नात्याची*भाग एक

मगच्याच वर्षी, शोभा च्या मुलांचे, सुबोध चे लग्न झाले ,.शोभा खूप आनंदात होती. सुबोध चीबायको नयना सावळी, सतेज, स्मार्ट पाहिल्या बरोबर आवडेल अशी खूप छान..
शोभा ला तिचे खूप कौतुक होत

नयना तिच्या माहेरी ही एकुलती एक, लाडाची लेक. इकडे एकुलती एक सून म्हणून इकडे ही लाडाची. शोभा ची मुलगी प्राची ,गोरी घारी, जरा बुटकी , अजून पीएच.डी पूर्ण व्हायचे होते अभ्यासात खूपच हुशार, प्राची ही घरातली लाडोबा .

सुबोध च्या लग्ना नंतर प्राची प्रत्येक गोष्टीत नैनाशी बरोबरी करायची मग नयनाचे नी तिचे सतत खटके उडत.
अगदी रंगरुपा वरुन ही
“काय पाहिलं माहिती नाही हिच्यात? आपल्या घरात सर्व गोरेपान अगदी सुबोध दादा ही,आणी ही अशी सावळी.

“सावळी नाही निमगोरी आहे मी. माझी त्वचा किती सतेज आहे तुझ्या सारखी पांढरी पाल नाही ये मी.” नयना ने प्रतिटोला दिला.

एकदा दुपारी शोभाताईंची पक्की मैत्रिण सुलभा आली होती .नयना ला कॉफी करायला सांगून शोभा सुलभा शी गप्पा मारत बसली.
स्वयंपाक घरातून नयना व प्राचीचे जोरजोरात बोलणे बाहेर ऐकू येत होते.

प्राची जोरात बोलली---
"तुला कॉफी ही धड करता येत नाही काळी ढुस्स करते अगदी तुझ्या सारखी म्हणून मला तुझ्या हातची कॉफी नकोय ,”

" असं काय? मग कर तुझी तूच तुझ्या सारखी पांढरी फटक मला मुळीच हौस नाही.” नयना तितक्यात जोरात बोलली"

आतले संवाद ऐकुन सुलभाने चमकून शोभा कडे पाहिलं . पण शोभा ने ऐकुनी न ऐकल्या सारखे करत म्हणाली
अगं" नणंदा भावजया दोघीजणी घरात नव्हतं तिसरं कोणी "
आठवतात का ग तुला लहानपणी ची भुलाबाईची गाणी".
' हो पण--
" अगं इथे तोच प्रकार आहे, दोघींचे मुळीच पटत नाही प्राचीला वाटते मी नयनाला डोक्यावर बसवते आहे.
आणि नयनाला वाटते ही फटकळ डोक्यावर बसलेली एकदा लग्न होईल तेव्हा कळेल.
खूप चढाओढ करतात ग दोघी. पण मी लक्ष देत नाही. कधी मधी मी बोलते, पण मला दोन्ही सारख्याच ग."आतले संवाद ऐकून सुलभा गार पडली,तिने आश्चर्याने शोभा कडे पाहिलं

मला आश्चर्य वाटतय शोभा तू कशी शांत राहू शकते ?आणि ह्या दोघी अशाच भांडत असतील तर घराचे कुरुक्षेत्र होत असेल .
.त्या दिवसभरात दोघींमध्ये बऱ्याच चकमकी झाल्या.
—-------------------------------------------------
क्रमशः
*भाग एक

मगच्याच वर्षी, शोभा च्या मुलांचे, सुबोध चे लग्न झाले ,.शोभा खूप आनंदात होती. सुबोध चीबायको नयना सावळी, सतेज, स्मार्ट पाहिल्या बरोबर आवडेल अशी खूप छान..
शोभा ला तिचे खूप कौतुक होत

नयना तिच्या माहेरी ही एकुलती एक, लाडाची लेक. इकडे एकुलती एक सून म्हणून इकडे ही लाडाची. शोभा ची मुलगी प्राची ,गोरी घारी, जरा बुटकी , अजून पीएच.डी पूर्ण व्हायचे होते अभ्यासात खूपच हुशार, प्राची ही घरातली लाडोबा .

सुबोध च्या लग्ना नंतर प्राची प्रत्येक गोष्टीत नयनाशी बरोबरी करायची मग नयनाचे नी तिचे सतत खटके उडत.
अगदी रंगरुपा वरुन ही
“काय पाहिलं माहिती नाही हिच्यात? आपल्या घरात सर्व गोरेपान अगदी सुबोध दादा ही,आणी ही अशी सावळी.

“सावळी नाही निमगोरी आहे मी. माझी त्वचा किती सतेज आहे तुझ्या सारखी पांढरी पाल नाही ये मी.” नयना ने प्रतिटोला दिला.

एकदा दुपारी शोभाताईंची पक्की मैत्रिण सुलभा आली होती .नयना ला कॉफी करायला सांगून शोभा सुलभा शी गप्पा मारत बसली.
स्वयंपाक घरातून नयना व प्राचीचे जोरजोरात बोलणे बाहेर ऐकू येत होते.

प्राची जोरात बोलली---
"तुला कॉफी ही धड करता येत नाही काळी ढुस्स करते अगदी तुझ्या सारखी म्हणून मला तुझ्या हातची कॉफी नकोय ,”

" असं काय? मग कर तुझी तूच तुझ्या सारखी पांढरी फटक मला मुळीच हौस नाही.” नयना तितक्यात जोरात बोलली"

आतले संवाद ऐकुन सुलभाने चमकून शोभा कडे पाहिलं . पण शोभा ने ऐकुनी न ऐकल्या सारखे करत म्हणाली
अगं" नणंदा भावजया दोघीजणी घरात नव्हतं तिसरं कोणी "
आठवतात का ग तुला लहानपणी ची भुलाबाईची गाणी".
' हो पण--
" अगं इथे तोच प्रकार आहे, दोघींचे मुळीच पटत नाही प्राचीला वाटते मी नयनाला डोक्यावर बसवते आहे.
आणि नयनाला वाटते ही फटकळ डोक्यावर बसलेली एकदा लग्न होईल तेव्हा कळेल.
आतले संवाद ऐकून सुलभा गार पडली, तिने आश्चर्याने शोभा कडे पाहिल,.

“ खूप चढाओढ करतात ग दोघी. पण मी लक्ष देत नाही. कधी मधी मी बोलते, पण मला दोन्ही सारख्याच ग.