जन्म बाईचा भाग २४
मालतीच्या आईपणाचा प्रवास सुरू झाला. बाळाचे नाव किशोर ठेवले.
किशोरच्या बाळलीला पाहण्यात ती गुंग झाली.
सगळ्या दुःखाचा विसर पडला.
सगळ्या दुःखाचा विसर पडला.
किशोरचं हसणं, रडणं सर्वच गोष्टीचं कौतुक वाटू लागलं.
तिचा दिवस किशोरमध्ये कधी निघून जात कळतही नव्हतं.
तशी श्रीकांतची साथ होतीच.
तिचा दिवस किशोरमध्ये कधी निघून जात कळतही नव्हतं.
तशी श्रीकांतची साथ होतीच.
किशोरला सगळेच जीव लावायचे.
श्रीपंतराव आणि सुमन दोघेही किशोरला बघायला यायचे.
श्रीपंतराव आणि सुमन दोघेही किशोरला बघायला यायचे.
प्रिया देखील आई झाली आणि तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. ती देखील तिचा आईपणाचा प्रवास अनुभवू लागली
किशोर आजी आजोबांकडे गेला की, खूप खुश व्हायचा,त्यालाही माणसं हवीशी होती.
किशोर देखील श्रीपंतराव असतील तिथेच जायचा. आजोबा नातूचे बंध मजबूत होते.
ते त्याला जराही नजरेआड होऊ देत नसत.
कांता देखील नातवाला कुठे ठेवू आणि काय करू असे करत. किशोरला दोन्ही मावश्याचे प्रेम मिळत होतं. मालती किशोरसाठी खूप खुश होती.
किशोर एक वर्षाचा झाला, त्याचा वाढदिवस होता. श्रीकांतने किशोरला छान कोट पॅन्ट घेतली होती, गोड दिसत होता. जवळच्या माणसांना बोलावलं होतं. लक्ष्मी आजी, नारायण आजोबा,प्रिया,प्रतीक. मालतीच्या माहेरचे देखील होते. श्रीपंतराव,सुमन,नयन,निशा,निलेश. खूप छान वाढदिवस साजरा झाला. श्रीपंतराव तर किशोरला घेऊन नाचत होते. मालती हे सोनेरी क्षण डोळ्यात साठवत होती. आनंदाचे वातावरण होते.
मालतीला आता कसल्याच गोष्टीची कमी नव्हती; पण आयुष्य हे काही एक सारखे राहत नाही. काही ना काही घडतं. असंच काहीसं मालती आणि श्रीकांतच्या आयुष्यात घडलं.
एक दिवस श्रीकांत रडतच घरी आला आणि त्याने सांगितले श्रीपंतरावांचा मृत्यू झाला.
मालतीला ते ऐकून धक्का बसला.
वडिलांप्रमाणे जीव लावणारे सासरेबुवा असे सोडून जातील वाटलं देखील नव्हतं.
सुमनची अवस्था फारच वाईट होती.
तिला बघून श्रीकांतच्या पोटात खड्डा पडला.
तिला बघून श्रीकांतच्या पोटात खड्डा पडला.
विचारही नव्हता केला असे काही घडेल.
मृत्यूनंतरही त्यांचा चेहरा किती प्रसन्न दिसत होता. असं वाटतच नव्हतं की त्यांचा मृत्यू झाला आहे. हेच सत्य होतं.
कार्य उरकलं आणि मालती, श्रीकांत घरी परतले.
बाबांच्या जाण्याने तो तुटून गेला होता.
अनेक आठवणी त्रास देत होत्या. नेहमीच पाठीशी उभे राहणारे, मार्गदर्शन करणारे बाबा असं जातील वाटलं देखील नव्हतं. घराचं छप्पर उडून गेल्यागत झालं होतं.
अनेक आठवणी त्रास देत होत्या. नेहमीच पाठीशी उभे राहणारे, मार्गदर्शन करणारे बाबा असं जातील वाटलं देखील नव्हतं. घराचं छप्पर उडून गेल्यागत झालं होतं.
"मालती, फार त्रास होतोय." श्रीकांत.
"मलाही खूप आठवण येतेय मामाजीची."
दोघांच्या डोळ्यातील अश्रू पाहून किशोर जवळ आला आणि त्याने आई बाबांचे डोळे पुसले.
मालतीला सगळं आठवत होतं.
श्रीकांतसाठी त्यांनीच पसंत केलं होतं मालतीला.
त्यांची सगळी वाक्य आठवत होती.
फक्त मुलगी आणि नारळ द्या बाकी काही नको.
मालती आधी भेळ खाऊन घे मग काही कामं करायची ती कर.
मालती तुला पैठणी नेसायला आवडेल ना?
मालतीला माहेरी घेऊन जा श्रीकांत.
सुखी रहा मालती. एकमेकांची काळजी घ्या.
सर्वच आठवत होतं.
किशोरला बघून तर किती खुश झाले होते.
माणूस गेला की , त्याच्या अनेक गोष्टी प्रकर्षाने आठवतात.
किशोरच्या वाढदिवसाला किती खुश होते आणि असं झालं.
तिला आठवत होतं.
गेल्यावेळेस जेव्हा आले तेव्हा जिन्यावरून खाली उतरले आणि पुन्हा माघारी आले किशोरच्या हातात पैसे ठेवले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला
त्यांचा पाय निघत नव्हता.
त्यांना जाणीव झाली होती का?
सतत त्यांचा चेहरा नजरेसमोर येत होता.
प्रियाला माहीत होतं मालतीसाठी ते अगदी वडिलांप्रमाणे होते. ती तिचं मन रमवायचा प्रयत्न करायची.
ह्यातून सावरायला वेळ लागणार होता.
वेळ हेच सर्वोत्तम औषध असतं.
आता तीचं आयुष्य किशोरभोवती फिरू लागलं.
निशा थोडी मोठी झाली. नयन नोकरीला जाऊ लागली.
सुमनचा दिवस निशाला संभाळण्यात जायचा.
श्रीकांत आणि मालती अधूनमधून सर्वांना भेटायला जायचे.
श्रीपंतराव गेल्यापासून मालतीलाही तिथे जायची ईच्छा नव्हती. जीव लावणारं माणूस नाही तिथे कसली ओढ असणार?
तिथे गेलं की, आठवणीने मन कमजोर व्ह्यायचे.
सुमनचा कल अजूनही नयनकडे होता.
किशोर शाळेत जाऊ लागला.
आता किशोरला सुट्टी असेल तेव्हाच जाणं होतं.
मालतीच त्याला शिकवायची.
मालती अभ्यासात हुशार होती. किशोरचा पहिला नंबर यायचा.
एक दिवस तिच्या मैत्रिणीने किशोर कोणत्या क्लासला जातो विचारले असता मालतीने त्याला मीच शिकवते सांगितले.
त्यावर ती म्हणाली,
"माझ्याही मुलीचा क्लास तू घे."
मालतीला हे अनपेक्षित होतं.
श्रीकांतसोबत ह्या विषयावर बोलली.
"मालती, तू लहान मुलांचे क्लास उत्तम घेऊ शकशील. घे तू क्लास. खूप छान शिकवते."
मालती पाचवीपर्यंतचे क्लास घेऊ लागली. मन लावून ती मुलांना शिकवत.
जसं किशोरला शिकवायची अगदी तसंच.
माऊथ तू माऊथ पब्लिसिटी झाली आणि बघता बघता वर्षभरात तिच्याकडे वीस मुलं येऊ लागली.
तिला वाटलं देखील नव्हतं की इतकी मुलं क्लासला येतील.
मुलांमध्ये तिचं मन रमायला लागलं.
खूप प्रसन्न राहू लागली.
दोन पैसे येऊ लागल्यामुळे आत्मविश्वास मिळाला.
पूर्वीची मालती आणि आताची मालती खूप बदल झाला होता.
श्रीकांत देखील मालतीमध्ये झालेला बदल पाहून सुखावला.
बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या.
तिच्या आयुष्यात स्थिरता आली होती. चूल आणि मूल ह्यापलीकडे जेव्हा स्वतःचं वेगळं अस्तित्व शोधलं तेव्हा तिला तिच्यातील ताकद कळली.
हे सगळं करतांना ती किशोरकडे अजिबात दुर्लक्ष होऊ देत नव्हती.
किशोरला चांगले संस्कार देण्यात कसलीच कसर सोडली नाही.
तिचे क्लासेस छान चालू होते.
किशोरने शाळेत कधीच पहिलं नंबर सोडला नाही.
किशोरच्या मॅडम,सर त्याचे खूप कौतुक करायच्या.
तो सारं श्रेय द्यायचा त्याच्या आईला, मालतीला.
त्याच्यासाठी त्याची आई खूप प्रिय होती. आईविषयी मनात आदर होता.
त्याच्यासाठी त्याची आई खूप प्रिय होती. आईविषयी मनात आदर होता.
तो जसजसा मोठा होऊ लागला तसं त्यालाही एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आजी आईशी नीट वागत नाही.
त्याला फार वाईट वाटायचे.
त्याच्या लक्षात यायचं काकीला वेगळी वागणूक आणि माझ्या आईला वेगळी वागणूक.
मालतीने त्याला समजावले होते कोणी आपल्याशी कसे वागावे हे आपल्या हातात नाही, आपण आपली प्रगती करत राहायची.
तिने किती जरी समजावलं तरी त्याचं मातृप्रेम त्याला आतून स्वस्थ बसू देत नव्हतं.
क्रमशः
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
सदर कथेचे लिखाण सुरु आहे. कथेचे भाग पेजवर येत जातील, पेजला जरूर फॉलो करा.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
कथेचा वापर यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी कायद्याने गुन्हा आहे.
अष्टपैलु स्पर्धा २०२५
दीर्घकथा लेखन
दीर्घकथा लेखन