प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक:- जन्मभूमी भाग-३(अंतिम)
" तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यावरती तुम्हाला आपल्या गावामध्ये सोयी सुविधा उपलब्ध नाहीयेत तर तुम्हाला स्वतःच्या खर्चातून त्यासाठी काम करावे लागेल." पवन म्हणाला.
"पण पप्पा, त्या गावामध्ये काय राहिले आता? तिथे जायला अजून सुद्धा एकही एसटी नाही." दुसरा मुलगा आपले मत मांडत म्हणाला.
"त्या गावामध्येच माझा जन्म झालेला होता आणि तिथे सुधारणा होण्यासाठी मी इथे आलो. त्यामुळे त्या माझ्या गावाचे काहीतरी देणं मी लागतो. आज जो आपल्याकडे पैसा आहे आणि जे काही सर्व आहे. तिथे जर बिकट परिस्थिती नसती तर मला इथे कशाला यावे लागले असते. त्यामुळे तुम्हाला भविष्यात तुमच्या पगारातले ठराविक पैसे बाजूला काढून तुम्हाला ते द्यावे लागतील आणि हे तुम्हाला आयुष्यभर करावे लागणार आहे. कारण शिक्षण किती महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला आता समजतच असेल." असे पवन आपल्या मुलांना उद्देशून म्हणाला.
त्याच्या मुलांनी होकार दर्शवला.
पवनने आपले शिक्षण पूर्ण करून तो शहरामध्ये गेलेला होता आणि तिथे सरकारी नोकरी लागल्यानंतर त्याने सर्वात आधी गावामध्ये एक मुक्त सार्वजनिक वाचनालय बांधून परिस्थिती बदलण्यास सुरुवात केली होती. तसेच ज्या मुलांची घरची परिस्थिती हालाखीची आहे आणि त्यामुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही, त्यांना शाळेला लागणाऱ्या उपयोगी वस्तू त्याने स्वखर्चातून देऊन त्या बदल्यात काहीही न घेता त्याने शिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत केलेली होती.
हाच वारसा आपल्या मुलांनी पुढे चालवावा असे पवनला वाटत होते कारण त्याची कर्मभूमी जरी शहर होते तरीसुद्धा त्याची जन्मभूमी मात्र त्याचे गावचं होते.
एकदा पुस्तक देताना दिलेला नकार पवनला खूप काही शिकवून गेला होता. तसेच त्याने त्याच्या नातेवाईकांमध्येही ज्यांना कोणाला शिक्षणासाठी पैशाअभावी शिक्षण घेता येत नव्हते त्यांना सुद्धा त्याने मदत केलेली होती तेही परतफेड न करण्याची भावना मनात ठेवूनच!
गावातून बरेच लोक शेतीतील अस्थिरतेमुळे शहराकडे जातात आणि शहरांमध्येच आपले कायमचे बस्तान बसवतात पण पवनने आपली गावाशी असलेली नाळ कधी तोडलीच नव्हती. शहरामध्ये जाऊन पैसा कमावणे हे जरी महत्त्वाचे असले तरी उद्या आपली प्रगती झाल्यावर तेच कष्टाळू लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे, हे जाणून त्याने स्वतःपासूनच सुरुवात केली होती.
पवनच्या मुलांचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्यांनी सुद्धा वडिलांनी दिलेल्या अटी पाळून काही वर्षांनी तिथे शाळा आणि महाविद्यालये बांधण्याचे त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले होते. तसेच गावामध्ये महिला सबलीकरणासाठीही त्यांनी प्रयत्न केलेले होते. विविध सरकारी योजना यांची माहिती गावकऱ्यांना दिली होती. तसेच स्वतः लागेल तेव्हा श्रमदान करून प्रसंगी स्वखर्चाने गाव समृद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते.
पवन आपल्या जन्मभूमीचा विकास करण्यासाठी झपाटलेला होता. त्याने त्याचे बीज येणाऱ्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी घरातूनच प्रयत्न केलेले होते.
समाप्त.
© विद्या कुंभार
कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा.
(साहित्यचोरी करणे हा गुन्हा आहे. ह्या कथेचे अधिकार हे लेखिकेकडे आहेत.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा