दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर - जानेवारी 2025
डिसेंबर - जानेवारी 2025
जन्मोजन्मी तुच हवा - भाग 1
ईश्वरी
अस म्हणतात, "जोडया आधीच ठरलेल्या असतात. कोण कुणाच्या आयुष्यात जाईल हे आधीच ठरलेलं असत." मग तुम्ही आम्ही जोडया जुळवणारे कोण माझ्यासाठी आधीच जर कुणी देवाने योजून ठेवला असेल तर तो माझ्या आयुष्यात नक्की येईल हा मला ठाम विश्वास आहे. थांबा थांबा माझ्याबद्दल सगळं जाणून घेण्या आधी मी माझी आणि माझ्या कुटुंबाची ओळख तर करून देते.
हा माझ्या मागे फोटो दिसतोय ही आहे माझी फॅमिली माझी आई सौ, विद्या राजेश माने वय 50 अतिशय काळजीत राहणारी साहजिक आहे ज्या आईला एकुलती एक मुलगी असेल तीच काय होऊ शकत हे तुम्हाला चांगलच माहित असणार तर हे आहेत माझे बाबा राजेश प्रकाश माने वय फक्त 55 स्वभावाने कठोर जरी असले तरी प्रेमळ पण यांची सुई सुद्धा माझ्यावरच येऊन थांबते मला तर आता सवय झाली आहे याची असो, हे आमचं शेंडेफळ म्हणजेच माझा लहान भाऊ रजत केवळ 15 वर्षाचा आहे पण अतिशय खोडकर माझ्या खोड्या काढल्याशिवाय याचा दिवसच पूर्ण होत नाही पण काय करणार शेवटी लहान भाऊच न आता येउत त्या व्यक्ती वर. ती व्यक्ती म्हणजे माझी आज्जी दुर्गा बाई माने आज्जी आजोबा हे अस नात असत ज्यांमुळे आपलं कुटुंब अधुरं आहे तसच माझ कुटुंब देखील अधुरं आहे माझी आज्जी वय वर्ष 75 पण तरीही काटक दररोज अंगणातल्या फुल झाडांची फुल आणणार स्वतः सर्व देवांची पूजा करणार आपली काम स्वतः आपण करणार थोडीशी कठोर आहे पण आमची लाडकी आज्जी आहे. तर ही आहे माझी फॅमिली. काय विचारता मी कोण? अहो मी तीच व्यक्ती आहे जिच्या बद्दल तुम्हाला जाणून घ्यायला कमालीची उत्सुकता असणार आहे आणि पुढचे काही दिवस आपण एकत्रच असणार आहोत काय सांगता अजून ही ओळखलं नाहीत मी आहे ईश्वरी राजेश माने आणि ही माझी कथा आहे.
दुर्गा निवास...
वेळ सकाळची 9 वाजताची...
वेळ सकाळची 9 वाजताची...
"इशू झाल का बाई आवरून तुझ? अग लग्न तुझ नाहीये इराच आहे काय हे किती हळू पणा हा अं.. उद्या दुसऱ्याच्या घरी गेलीस तर नाक कापशील आमचं आत्ताच लोक शेण घालताएत आमच्या तोंडात कुठून जन्माला घातली हिला अस म्हणत आहेत. अग कुठल्या तरी एका गोष्टीत चुणूक दाखव आपली. झाल की नाही तुझ." हॉलमध्ये ईश्वरीची वाट बघत विद्या म्हणाली
"झाली हिची कटकट सुरु परत (मनात पुटपुटत ). हो आई आलेच आवरत होते माझ तुच म्हणतेस न नेहमी मुलीच्या जातीने कस नीटनेटक राहील पाहिजे. बर चल आता" खोलीतून बाहेर येत ईश्वरी म्हणाली
"हं... माझच बोलण मलाच ऐकव बर जाऊदे तस छान दिसत आहेस रहात जा नेहमी अशीच चल आता अजून उशीर नको. (आईंना ). आई आम्ही दोघी जाऊन येतो हो तुमच आणि रजत च जेवण बनवून ठेवलं आहे आम्हाला यायला जरा उशीर होईल." विद्या म्हणाली.
आणि दोघी ही लग्नाच्या हॉल कडे रवाना झाले.
काही वेळा नंतर...
ध्रुवी मंगल कार्यालय...
आज ध्रुवी मंगल कार्यालय जरा जास्तच सजल होत. लग्नाचा खर्च ही तसाच झाला होता. प्रवेश द्वारा समोरची रांगोळी आणि त्या रांगोळीत इरा वेड्स जय नावे अगदीच शोभून दिसत होत कार्यालयाच प्रवेश द्वार विविध फुलांनी सुंदर पद्धतीने सजवलेलं होत त्यात सुंदर नक्षीकाम देखील केलेलं होत कार्यालयात प्रवेश करताच कार्यालयाचे मुलं अक्षतांची टोपली घेऊन सगळ्यांचं स्वागत करण्यात मग्न होती तसेच संपूर्ण हॉल गाद्या खुरच्यांनी सजलेला होता.
इरा कर्णिक. विद्याच्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीची मुलगी गडगंज श्रीमंत त्यातून इरा त्यांची एकुलती एक मुलगी म्हणूनच की काय या लग्नात इराच्या आई वडिलांनी कुठलीच कसर ठेवली नव्हती.
काही वेळातच पाहुण्यांची गर्दी सुरु झाली तस वसुंधरा आणि योगेश दोघ ही स्वागताला सज्ज झाले सोबत काही जवळचे नातेवाईक देखील होते.
तोच ऑटोमधून विद्या आणि ईश्वरी खाली उतरले आणि हॉल कडे निघाले वाटेत विद्याची बडबड पुन्हा सुरु झाली.
"बघितलस म्हणून सांगत असते जरा लवकर लवकर आवरत जा झाला न आपल्याला उशीर नेहमी आपल वराती मागून घोड असत. माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचं मुलीचं लग्न म्हणलं लवकर जाऊन थोडी मदत करता येईल तर कसल काय मला न इशू तुझ्या मुळे उशीर होतो चल आता तरी लवकर..." विद्या चिडून बडबड करू लागली
आणि बडबड करतच दोघ ही हॉलवर पोहोचले.
क्रमशः...
तर ही आहे ईश्वरीची एक आगळी वेगळी संघर्षाची आणि मेनीफेस्टेशन च्या प्रवासाची कथा आता पाहू या कथेत आजून काय काय होईल
ईश्वरीला तिच्या मनासारखा मुलगा मिळेल का?
ती आपल्या जोडीदाराला आकर्षित करू शकेल का?
त्या साठी तिच्या कुठल्या स्टेप्स असतील?
याची उत्तर लवकरच मिळतील.
ईश्वरीला तिच्या मनासारखा मुलगा मिळेल का?
ती आपल्या जोडीदाराला आकर्षित करू शकेल का?
त्या साठी तिच्या कुठल्या स्टेप्स असतील?
याची उत्तर लवकरच मिळतील.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा