Login

जन्मोजन्मी तुच हवा (भाग - 2)

या भागात तुम्ही दोन खुप चांगल्या मैत्रिणींचा संवाद वाचाल ईश्वरी कथेची नायीका जीला काहीच जमत नाही तीचा इथून पुढे एक वेगळाच प्रवास सुरु होतो
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर - जानेवारी 2025

जन्मोजन्मी तुच हवा भाग - 2

आणि बडबड करतच दोघ ही हॉलवर पोहोचले. तोच हॉलचा चेहरा मोहरा पाहून दोघ ही थक्क झाले आणि पहिल्यांदा ईश्वरीच्या तोंडातून शब्द बाहेर पडले.

"लग्न म्हणलं की इतकी धामधूम असते का ग आई, मला करायचं आहे लग्न." हॉलकडे बघत ईश्वरी म्हणाली

तोच तीच बोलण ऐकून विद्याने कपाळावर हातच मारून घेतला.

"काय? तुला लग्न करायचय आधी सगळ शिक मग बघू लग्नाचं इरा 20 लोकांचा स्वयंपाक एकटी करू शकते त्यातून तिच्याकडे मास्टर्स डिग्री आहे दिसायला देखणी आहे तुझा काय पत्ता. बारावी सुद्धा थांबत थांबत पास झालात तुम्ही आणि म्हणे लग्न करायचय चला आता तरी भर भर." पायऱ्या चढत चढत विद्या म्हणाली

तोच वसुंधरा आणि योगेश स्वागताला हजर होतेच.

"या.. या हॉल शोधायला काही त्रास तर झाला नाही न आणि हे काय मी सगळ्यांना निमंत्रण दिल होत तुम्ही दोघीच आल्या आईंना का नाही आणलस ग." वसुंधरा ने विचारलं

"अग काय सांगू बाई एक आईंची गुढगे दुःखी त्यातून हिची एक म्हणून मदत होत नाही केलीच थोडीशी हलकी हलकी काम तर काय बिघडणार आहे हीच आता हीच ही लग्नाचं वय झालच आहे की पण काय उपयोग स्थळाला सांगायला आमच्याकडे एक गुण नाही कधी घर आवरून घेईल की कधी छोट्या छोट्या पोळ्या करून बघेल नाही आम्हाला मोबाईल शिवाय काही सुचेल तर न बर ते जाऊ दे लग्नाची सगळी तयारी झाली न व्यवस्थित." वैतागून विद्या म्हणाली

"ठिक आहे ग नको काळजी करुस करेल ती आता इथून पुढे बर जा आता इरा आणि सासूबाई कधी पासून विचारत आहेत भेटून घ्या." विद्याला समजावत वसुंधरा म्हणाली

"मावशी इराची रूम कुठे आहे मी भेटून येते तीला." ईश्वरीने विचारलं

"जा बेटा ये भेटून सरळ जा डाव्या साईडची पहिली रूम तिची आहे." वसुंधरा म्हणाली

वसुंधरा च बोलण ऐकताच ईश्वरी ईराला भेटायला निघून गेली. आणि विद्या ही लगेच हॉलमध्ये वसुंधरा च्या सासूबाईंना भेटायला निघून गेली.

काही वेळा नंतर...

ईराची रूम...

ईरा आज खुपच सुंदर दिसत होती लग्नाचा पेहराव तिच्यावर उठून दिसत होता ती इतकी सुंदर दिसत होती की, कुणीही तीला पाहिलं तर पहातच राहील ईरा लग्नाचं नटून थटून आपल्या जय ची स्वप्न बघत बसली होती तोच ईश्वरी रूम मध्ये आली.

"मी आत येऊ का ग?" ईश्वरीने विचारलं

"हो, ये की कशी आहेस." भानावर येत ईराने विचारलं

तोच ईश्वरी रूममध्ये आली.

"किती गोड दिसत आहेस ग तु लग्नाचा ग्लो दिसतोय चेहऱ्यावर." ईश्वरी म्हणाली

"इश्श, काही पण हं थँक्यु बैस न." ईरा म्हणाली

"मला सांग तु इथेच बसणार आहेस सगळे बाहेर पोहोचले आहेत तु एकटीच इथे बसणार." ईश्वरीने विचारलं

"मी एकटी कुठे आहे माझ्या मनात जय आहे न तो आहे माझ्या बरोबर. बर मला सांग व्हराड आलं का म्हणजे माझ्या सासरकडचे ही आले आहेत." ईराने विचारलं

"नाही ग ते नाही आले अजून पण बाकीचे सगळे आले आहेत म्हणून विचारलं मी." ईश्वरी म्हणाली

"अच्छा अस होय, मग मी बाहेर येऊन काय करू आणि अस न सांगता बाहेर यायचं नसतं जस जसे लग्नाचे विधी सुरु होतात मग स्वतः गुरुजीच बोलावतात मग बाहेर यायचं असत तु अशी ग कशी तुला काहीच कस माहित नाही." ईरा म्हणाली

तीच बोलण ऐकून ईश्वरी शांतच बसली.

काही क्षणा नंतर...

"खर आहे तुझ मला काहीच माहित नाही मी प्रयत्न करते ग समजून घ्यायचा पण नाही होत माझ्या कडुन काय करू मी." निराश होत ईश्वरी सांगते

"अग मी सहज विचारलं तुला अस निराश होऊ नकोस तु "माझ्या कडुन होत नाही" असा विचार नको करूस न तु हा विचार कर की चूक कुठे होत आहे हे बघ इशू आपण दोघी पण एकाच वयाचे आहोत मी ही घरात आई बाबांना मदत करतेच की आणि प्रत्येक मुलगा मुलगी सगळ्यांना घरात लक्ष द्यावाच लागत मी तर जय ला सुद्धा सांगत असते लग्ना नंतर रोज नाही पण दर रविवारी तरी ऍटलीस्ट तु आईंना आणि मला मदत करायची च का आम्हाला आरामाची गरज नसते त्याने तर प्रॅक्टिस करायला देखील सुरवात केली माहितीये. खुप नाही एकदम सगळं नाही पण निदान हलकी हलकी काम करता येणार नाहीत तुला. जस घरातला एखादा कोपरा आवरून घेणे, झाड झूड करणे किती सोप असत हे तेवढच विद्या मावशी ला आराम आणि दररोज थोड थोड केलस तर तुझ्यावरच बर्डन पडणार नाही हो की नाही." ईरा समजावत म्हणाली

"मला जमेल सगळ?" ईश्वरीने हळूच विचारलं

"का नाही जमणार सगळ जमेल एकदा मनापासून प्रयत्न करून बघितलास न की सगळ जमेल बघ मग विद्या मावशीला सुद्धा किती छान वाटेल तुझ्यातला बद्दल आजी देवपूजा करते हो की नाही मग छान फ्रेश होऊन सगळ्यांच्या आधी उठून देवा साठी फुल आणून ठेवलीस तर आजीला किती बर वाटेल, ठिक आहे तुझ शिक्षण कमी आहे पण रजत च्या अभ्यासात त्याला मदत केलीस तर त्याला किती छान वाटेल खुप नाही पण जितकं तुला येत तितकी तर मदत करूच शकतेस हो की नाही, बाबांना पेपर वाचून दाखवत जा आजीला देवांची पुस्तकं वाचून दाखवत जा त्यामुळे तुमच्यातल नात अधिक घट्ट होईल तुम्हाला एकत्र वेळ घालवता येईल तु आणि विद्या मावशी दोघी सकाळी फिरायला जात जा म्हणजे तुम्हाला दोघीना एकत्र गप्पा मारता येतील आणि सकाळची ताजी हवा घेतलीस न तर तुझाच सगळा दिवस खुप छान जाईल बघ आणि हे असच प्रत्येक गोष्ट तुलाच पुढाकार घेऊन कराव लागेल छोटी छोटी सुरवात केलीस न स्वतःहून तर जमेल तुला सगळ माझी खात्री आहे." ईराने पुन्हा समजावलं

"ठिक आहे बघीन मी करून." ईश्वरी म्हणाली

क्रमशः...

काय ईश्वरीला घरातली कुठलीच काम येत नाही पण मग तीच लग्न कस होणार?

ईश्वरीला घरातली काम जमतील का?
तीच लग्न होईल का?
कोण असेल तीचा जोडीदार?
पाहूत पुढील भागात.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

0

🎭 Series Post

View all