Login

जन्मोजन्मी तुच हवा (भाग - 3)

ईश्वरीच्या आयुष्यात एक वेगळ वळण येऊ घातलय काय होईल त्याचा परिणाम
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर - जानेवारी 2025

जन्मोजन्मी तुच हवा भाग - 3

"बर आता आजीला ही भेटून येते मी हं चल परत भेटूत आपण बाय." ईराचा निरोप घेत ईश्वरी म्हणाली

"ठिक आहे पण मी जे सांगितलं ते लक्षात ठेव हं विसरू नकोस काय काळजी घे बाय." ईरा म्हणाली

आणि लगेच ईश्वरी रूम मधून बाहेर पडली

काही क्षणा नंतर...

ईश्वरी ईराच्या आजीची खोली शोधू लागली तोच विद्याने तीला आवाज दिला

"इशू जरा इकडे ये कुठे फिरतीयेस हं एका ठिकाणी राहायचं ते दिल सोडून भेटलीस का ईरा ला." रागाने विद्याने विचारलं

"हो अग आले भेटून खुप गोड दिसत होती ती बर आजी कुठे आहे मला भेटायचं होत त्यांना." ईश्वरीने विचारलं

"बर सोड ते आता नंतर भेट नाही तरी काय करणार आहेस तु त्यांना भेटून तुला बघितल की लगेच लग्नाचा विषय काढतील ते बस आता इथेच आता विधी सुरु होतील." विद्या जरास चिडून बोलली.

तीच बोलण ऐकून ईश्वरीला वाईट वाटलं आणि ती लगेच शांत झाली.

पण आता तिच्या मनात काही वेगळेच विचार सुरु झाले आणि ती विचार करू लागली

"आपल कुठे चुकत आहे का सगळे मला अस तुसड्या सारख वागवतात घरातली काम इतकी महत्वाची असतात का? का बर या कामांना इतकं महत्व दिल जात जाऊ दे नकोच इतका विचार करायला त्यापेक्षा आपण स्वतः थोड थोड करून बघितल तर आपण नकारात्मक बनायचं नाही तर पॉझिटिव्ह राहून आई बाबांना आनंद देऊन बघूच ठरल आता सगळ्यांचे टोमणे सहन करायचे नाही तर लोकांना आनंद द्यायचा." ईश्वरी मनाशी पक्क करते आणि डोळे पुसते

तोच विद्या च तिच्या कडे लक्ष जात आणि ती प्रेमाने समजावते.

"तुला माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं का बाळा अग तुच विचार कर न खरच सांग कधी तरी तु एखादी गोष्ट करून बघितलीस का स्वतःहुन साधा चहा अजुन तुला नीट जमत नाही मग त्यामुळे मी कुणालाच तुझ्या बद्दल काहीच सांगू शकत नाही ग हेच जर का तु स्वतः हुन थोड थोड शिकायला सुरवात केली असतीस तर आज आम्हाला सुद्धा ताठ मानेने सांगता आलं असत न बेटा अजुन ही वेळ गेली नाहीये तु खुप काही करू शकतेस बस थोडासा प्रयत्न करून बघ जमेल तुला सगळ." विद्या समजावते

"ठिक आहे आई तु काळजी करू नकोस मी आता इथून पुढे हार मानणार नाही करेन स्वतःमध्ये बद्दल बघच तु." ईश्वरी म्हणाली

"खरच देवच पावला बाई हे बघ अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी जरी सुरवात केलीस न तरी जमेल बघ सगळ तुला बस हिम्मत ठेव हं." डोक्यावरन हात फिरवत विद्या म्हणाली

तोच विधी सुरु झाले आणि ईराला गौरीहार पुजायला बोलावण्यात आलं.

काही वेळा नंतर...

एका खोलीत गौरीहार पूजेची तयारी केलेली होती आणि गुरुजी ईराची वाट बघतच होते तोच ईरा आपल्या खोलीतुन बाहेर आली तिला आलेलं बघून सगळ्यांची नजर तिच्यावरच खिळली जो तो तिच्या कडे बघतच राहिला ती पहिले आपल्या आजीच्या खोलीकडे गेली आणि तीने खोलीच्या दारावर नॉक केल

"आजी आजोबा आत येऊ का?" नॉक करत ईराने विचारलं

"अरे बाळा ये आत ये बघू तरी माझी छकुली कशी दिसत आहे." शारदा ताई म्हणाल्या

"काय ग आजी बघ कशी दिसत आहे मी." दोघांच्या पाया पडत ईरा म्हणाली

"खुप गोड दिसतय ग माझ पिल्लू थांब तुझी नजर काढते." नजर काढत शारदा ताई म्हणाल्या

तोच ईरा लाजली आणि म्हणाली.

"बर तुम्ही सकाळच्या गोळ्या घेतल्या का? गोळ्या चुकवायच्या नाहीत बर का माझ सासरी गेल्यावर सुद्धा लक्ष असेल तुमच्यकडे." ईरा म्हणाली

तोच दोघ हसू लागले.

ईराने दोघांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाली

"बर गुरुजींनी बोलावलं आहे मी येते आता हं." ईरा म्हणाली

आणि गुरुजींनी मांडलेल्या पूजेच्या खोली कडे निघून गेली.

काही क्षणा नंतर...

ईरा खोलीत आली आणि पाटा वर बसली तोच पूजा सुरु झाली ईरा जस जस गुरुजी सांगत होते तस तस ती करत होती.

काही वेळा नंतर...

गुरुजी तीला पूजा सांगून निघून गेले ती मात्र तिथेच पूजा करत बसली परत बोलावणं येई पर्यंत.

क्रमशः...

काय आता ईश्वरीने देखील काम करून बघण्याचा निर्णय घेतला मग हा कुठला युनिव्हर्स चा खेळ तर नाही.
काय होणार पुढे ईराच लग्न झाल्यावर ईश्वरीच्या मनात सुद्धा लग्नाचे विचार घोळायला लागतील का?
तिच ही मन लग्नाच्या विचारात अडकेल का?
काय असतील आता तिच्या स्टेप्स बघुत पुढील भागात.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all