दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर - जानेवारी 2025
डिसेंबर - जानेवारी 2025
जन्मोजन्मी तुच हवा भाग - 4
गुरुजी पुन्हा स्टेजवर आले आणि बाकीच्या विधिंची तयारी करू लागले.
काही वेळा नंतर...
मुला कडची मंडळी आली आणि पुढचे विधी सुरु झाले.
एक एक करत विधी सुरु झाले मग ईराला बोलावण्यात आलं.
एक एक करत विधी सुरु झाले मग ईराला बोलावण्यात आलं.
त्यावेळी जय आणि ईरा तर दोघ ही खुपच गोड दिसत होते जो तो त्यांचीच चर्चा करत होते गुण गाणं करत होते ईश्वरी मात्र आपल्याच विचारात होती ईराच कौतुक ऐकून आता तीला तिचाच राग येत होता आणि त्याच रागात ती विचार करू लागली.
"खरच आहे आपल्याकडे अस काहीच नाही ज्यामुळे आई बाबा किंवा लोक आपल कौतुक करतील लग्न तर खुप बघितली मी पण या लग्नाने मला खरच बदलून टाकलं आहे पण आता सुरवात कुठून करू मी कस करू सगळं कोण सांगेल मला हम्म युट्यूब. यस मला आता युट्युबच मदत करेल." युट्यूब चेक करता करता ईश्वरी मनात म्हणाली.
तोच तिच्या डोक्यावर अक्षता पडल्याच तीला जाणवलं आणि लगेच मंगलाष्टक सुरु झाली.
आणि ईरा व जय च लग्न थाटामाटात संपन्न झाल प्रत्येकजण दोघांबरोबर फोटो काढु लागले.
काही वेळा नंतर...
ईश्वरी आणि विद्या ही स्टेजवर गेले आणि उभयांतांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊ लागले तोच ईरा म्हणाली.
"इशू कसला ग विचार करत आहेस? मी बोलल्याच वाईट वाटलं का?" ईराने विचारलं
"नाही ग तुझा कसला राग मानू मी तु तर माझे डोळे उघडलेस पण आता मी सुरवात कशी करू याचा विचार करत आहे. बाकी तुम्ही दोघ खुप गोड दिसत आहात हं खुप खुप अभिनंदन तुमच." ईश्वरी म्हणाली
"काळजी करू नकोस ग होईल सगळ ठिक आणि तुला सांगू का एक काही अवघड नसतं बघ "मला सगळ येत" बस हा एकच मुलमंत्र मनात पक्का करून ठेव मी तर म्हणते मनातल्या मनात जपच करत जा बघ आपोआप तुला खरच सगळ जमायला लागेल माझी गॅरंटी आहे." ईराने समजावलं
तोच ईश्वरीने स्मित हास्य केल. हे सगळ बघताच विद्या बोलू लागली.
"बर ते सोड तुझ खुप खुप अभिनंदन जोडी अगदी शोभून दिसत आहे नशीब काढलं दोघांनी." विद्या म्हणाली
"खुप खुप थँक्यु तुम्हाला दोघींना आणि विद्या मावशी तु सुद्धा थोडस तीला समजून घे ग प्रत्येकजण एक सारख नसतं न करेल ती हळू हळू सगळ बर चला फोटो काढूत आणि जेवण सुद्धा करून जायचं हं." चेहऱ्यावर स्माईल ठेऊन ईरा म्हणाली.
आणि लगेच सगळ्यांनी फोटो काढले.
काही वेळा नंतर...
सगळे जेवणाच्या हॉलकडे गेले आणि जेवण करून घराकडे रवाना झाले.
दीड तासा नंतर..
दुर्गा निवास...
जेवण करून सगळ्यांना भेटून दोघी घरी परतल्या.
"बघितलस इशू सगळे ईराच कौतुक करत होते प्रत्येकाच्या तोंडात ईराच नाव होत म्हणत होते जय नी नशीब काढलं जे अशी मुलगी भेटली त्याला हे अस बोलण ऐकून वसुला किती अभिमान वाटत असेल बर आपल्या पोरीचा आम्हाला ही असच अभिमानाने मिरवायचं आहे ग म्हणून सांगत असतो आम्ही थोडासा स्वतः मध्ये बद्दल कर. आई अहो कसली धामदूम होती लग्नात आणि प्रत्येक जण तुमच्याबद्दल विचारत होत हं हॉलवर पोहोचताच वसुनी तुमच्याबद्दल विचारलं तुम्हाला नेलं असत तर बर झाल असत पण तुमच्या गुढग्याच दुखणं त्यामुळे नाही तर खरच खुप छान वाटलं असत तुम्हाला.." आपल आवरता आवरता विद्या म्हणाली
तर दोघांच बोलण सुरु असतानाच ईश्वरी मात्र तिथून निघून गेली. आज तीने मनातून ठरवलच होत काही ही झाल तरी आयुष्याची नवी सुरवात करायचीच आजपर्यंत आपण काहीच सुख देऊ शकलो नाही सगळ्यांना पण आता करून दाखवायचंच.
हाच विचार तिच्या मनात होता आणि त्याच विचारात ती आपल आवरू लागली.
काही वेळा नंतर...
"इशू अग आवरलस का तुझ आत्ता रजत येईल बघ शाळेतून (मनाशी पुटपुटत) याला ही का एवढा उशीर झाला कोण जाणे खेळत असेल मित्रांबरोबर अजुन काय. अग आवरलस का." विद्या ने आवाज दिला
"हो आई आलेच सांग काय मदत करू तुला" खोलीतून बाहेर येत ईश्वरी म्हणाली
"काय चक्क हे तु विचारत आहेस झालय काय तुला." आश्चर्याने विद्याने विचारलं
"बघ मी स्वतः हुन म्हणाले तर आश्चर्य वाटत तुला आणि नाही विचारलं तर म्हणतेस मी तुला विचारतच नाही जाऊ पण आता प्रयत्न करणार आहे मी बोल काय म्हणत होतीस." ईश्वरीने आत्मविश्वासाने विचारलं.
विद्या तीच बोलण ऐकून शांतच बसली तिच्या डोळ्यात फक्त अश्रू होते तिला तीच बोलण ऐकून मनापासून छान वाटलं आणि ती त्याच आनंदात म्हणाली.
"बेटा आज पहिल्यांदा तु स्वतः हुन विचारत आहेस छान वाटलं ऐकून जा पोहे संपले आहेत तर घेऊन ये चिवडा बनवते रजत घरी येईल आत्ता सगळ्यांनाच खायला होईल." विद्या शांतपणे म्हणाली
"इतकच न आई मी घेऊन येते काळजी करू नकोस आता थोडासा बद्दल करण्याचा प्रयत्न करणार आहे मी स्वतःमध्ये बघुत होईल का बर मी पोहे घेऊन येते." ईश्वरी म्हणाली
आणि लगेच पोहे आणायला गेली.
क्रमशः...
तर आता ईश्वरीने स्वतः मध्ये बद्दल करायचं ठरवलं आहे पण यात तीला यश मिळेल का बघू पुढील भागात.
ईश्वरीला बद्दल घडवण्यात यश मिळेल का?
कसा असेल तीचा हा प्रवास?
काय करेल पुढे ईश्वरी?
याची उत्तर मिळतील पुढील भागात
ईश्वरीला बद्दल घडवण्यात यश मिळेल का?
कसा असेल तीचा हा प्रवास?
काय करेल पुढे ईश्वरी?
याची उत्तर मिळतील पुढील भागात
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
