जाणून घे तू स्वतःला...भाग 4
"माझ्या भूतकाळाविषयी मी जे सांगेल ते तुम्ही ऐकू शकाल की नाही हे मला माहिती नाही. पण आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे." सायलीने त्याचा हात चाचपळत हातात घेतला.
विक्रांतने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
"बोल ग राणी, तुझ्या कुठल्याही गोष्टीने मला काहीच फरक पडणार नाही आहे."
"माझं खर नाव सायली नाही, त्यादिवशी तुम्ही मला विचारलं आणि मला जे सुचलं ते मी तुम्हाला सांगितलं, कारण मला माझी खरी ओळख तुम्हाला सांगायची नव्हती. त्यादिवशी मला तुमच्या मदतीची खरंच गरज होती. मला तुम्हाला फसवायचं नव्हतं. पण मला त्या खाईत जायचं नव्हतं."
ती उठली आणि बालकनीच्या दाराजवळ जाऊन उभी राहिली.
तो ही उठला, तिच्या जवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला.
"बोल सायली, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे."
"माझे खरे नाव सुकन्या, सगळे लाडाने सुकू म्हणायचे. मी, माझा भाऊ रोशन, आई बाबा असं आमचं हसत खेळत जगणारी फॅमिली होती.
बाबा कंपनीत जॉब करायचे, आई घरकाम करायची. आम्ही दोन्ही भावंड अभ्यासात खूप हुशार होतो.
सगळं छान चाललेलं होत.
सगळं छान चाललेलं होत.
आम्ही दहा बारा वर्षाचे होतो त्यावेळची ही घटना ज्याने आमचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं.
एक दिवस बाबांना सुट्टी आहे म्हणून आम्ही मेला बघायला जायचं म्हणून बाबांच्या मागे लागलो.
बाबाही तयार झाले.
संध्याकाळी आई, बाबा आणि आम्ही दोघे भावंड मेला बघायला गेलो. मोठे मोठे झुले बघून आम्हा भावंडाना खूप मजा यायची.
फिरलो, झुल्यावर झुललो, खूप मजा केली.
आणि परतत होतो की एक मोठा आकाशपाळणा तुटला. त्यातले काही झुले दूरवर जाऊन पडले. आणि दुर्दैवाने त्यातील एक झुला आमच्या अंगावर येऊन पडला.
आम्ही चौघेही त्यात डबले गेलो, त्यांनतर काय झालं मला माहित नाही, जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते, डोळ्यावर पट्टी बांधलेली होती.
मला नक्की काय झालं होतं कळेना.
मी हाक दयायला सुरुवात केली.
आणि परतत होतो की एक मोठा आकाशपाळणा तुटला. त्यातले काही झुले दूरवर जाऊन पडले. आणि दुर्दैवाने त्यातील एक झुला आमच्या अंगावर येऊन पडला.
आम्ही चौघेही त्यात डबले गेलो, त्यांनतर काय झालं मला माहित नाही, जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते, डोळ्यावर पट्टी बांधलेली होती.
मला नक्की काय झालं होतं कळेना.
मी हाक दयायला सुरुवात केली.
"कुणी आहे का? इकडे कुणी आहे का?"
तितक्यात तिथे कुणी आलं.
"काय झालंय कशाला ओरडते?"
"माझ्या डोळ्याला पट्टी का बांधली आहे."
"शांत रहा, थोडी इंजुरी झाली आहे, सगळं व्यवस्थित होईल."
"माझे आई, बाबा, भाऊ कुठे आहेत?"
"हे बघ तू उगाच स्ट्रेस घेऊ नको. ते ठीक आहेत." असं बोलून नर्स बाहेर गेली.
त्यानंतर मला कळलं की माझे बाबा आम्हाला सोडून गेले. आईला कमी लागलेलं होत, ती सुखरूप होती. मलाही फक्त डोळ्यापासून वर मार लागलेला होता. पण माझा भाऊ सिरियस होता.
दुसऱ्या दिवशी माझ्या डोळ्यावरून पट्टी काढण्यात आली.
त्यावेळी मला जाणवलं की माझी दृष्टी गेली आहे.
त्यावेळी मला जाणवलं की माझी दृष्टी गेली आहे.
मी ओरडले, दुःख व्यक्त केले, खूप रडले पण त्यावेळी मायेने डोक्यावरून हात फिरवून जवळ घेणार कुणी नव्हतं.
तशीच वॉर्डात पडून होते, आई शुद्धीवर आली.
तिने माझी चौकशी केली, त्यावेळी नर्स मला आईजवळ घेऊन गेली.
तिने माझी चौकशी केली, त्यावेळी नर्स मला आईजवळ घेऊन गेली.
आईला माझ्याबद्दल कळलं आणि तिने मला मिठीत घेतलं, ढसाढसा रडायला लागली.
आम्ही त्यांना बाबांविषयी विचारलं, तेव्हा आम्हाला कळलं की बाबा आम्हाला सोडून गेले.
आमच्या अंगावर दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं वाटलं, हातातून सगळं निसटून गेलं.
आम्ही दोघी वाचलो पण रोशन..."
सायली जोरजोरात रडायला लागली, विक्रांतने तिला मिठीत घेतलं.
"सायली शांत हो."
"हे इतकंच नाही, पुढे ऐका."
रोशनच्या ब्रेनला मार लागलेला होता, डॉक्टरांनी दोन लाख रुपये खर्च सांगितला.
थोडेफार पैसे भरल्यानंतरच आम्ही ऑपरेशन करू अस सांगितलेलं होतं.
आम्ही घरी गेलो,
आता काय करायचं या विचारात आईला रात्ररात्र झोप लागत नसे.
एकदा एक ओळखीचे काका आले, सांत्वन करायचे म्हणून आईची जवळीक साधली.
आता ते रोज यायला लागले,
एकदा आईला बोलले मी पैशाची व्यवस्था करून देऊ शकतो मग तुम्हालाही माझी इच्छा पूर्ण करावी लागेल. आईला वाटलं जेवणाबद्दल बोलत असतील कारण त्यांना आईच्या हातचं जेवण आवडायचं आई हो बोलली. त्यांनी पैशाची थोडी मदत केली, ते पैसे हॉस्पिटलमध्ये भरले आणि रोशनचं ऑपरेशन झालं.
त्यानंतर मात्र ते रोज घरी यायला लागले, आईशी जवळीक साधू लागले.
एक दिवस त्यांनी नको त्या ठिकाणी स्पर्श केला.
आईला ओक्वॉर्ड झालं. ती पटकन बाजूला झाली.
आईला ओक्वॉर्ड झालं. ती पटकन बाजूला झाली.
"भाऊजी अहो काय करताय?"
"काय करतोय? वहिनी तुम्ही विसरलात का मी बोललो होतो की मी जर तुमची मदत केली तर तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावी लागेल. आता तुम्ही मागे हटू शकत नाही."
"नाही हे शक्य नाही, तुम्हालाही माहीत आहे रोशनच्या वडिलांशिवाय मी दुसऱ्या कुणाचाही कधीही विचार केला नाही. तुम्ही असं कसं बोलू शकता. मला वाटलं तुम्हाला माझ्या हातचे बनवलेले पदार्थ आवडतात त्याबद्दल बोलत असाल. मी असा कधी विचारही केलेला नाही."
"न समजण्याइतक्या तुम्ही भोळ्या नाही आणि मीही खुळा नाही."
त्यांनी आईला खोलीत नेलं आणि आतून दाराची कडी लावून घेतली.
मी दरवाज्यातच बसून होते. आईचं किंचाळण माझ्या कानात गुंजत होतं.
काही वेळाने तो माणूस बाहेर आला.
त्यांनतर फक्त शांतता होती. आवाज येत नाही आहे म्हणून मी आत गेले तर आई हुंदके देत होती.
तिची अवस्था मी जरी डोळ्याने बघु शकले नव्हते पण तिच्या आतील दुःख मला कळत होतं.
त्यांनतर फक्त शांतता होती. आवाज येत नाही आहे म्हणून मी आत गेले तर आई हुंदके देत होती.
तिची अवस्था मी जरी डोळ्याने बघु शकले नव्हते पण तिच्या आतील दुःख मला कळत होतं.
तिने रडतच मला कवेत घेतलं आणि हुंदके देऊन रडायला लागली.
काही वेळाने तिने स्वतःला सावरलं.
"सुकू चल आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. रोशन आपली वाट बघत असेल."
"आई त्याला शुद्ध आली नाही आहे. ऑपरेशन झालं पण डॉक्टरांनी काय सांगितलं त्याला शुद्ध यायला वेळ लागू शकतो. आई त्याचे अजून एक दोन ऑपरेशन करावे लागणार आहे. आई इतके पैसे कुठून आणायचे."
आई मला बाजूला केलं, ती उठली..
साडीचा पदर खोचला.
साडीचा पदर खोचला.
"रोशनच ऑपरेशन ज्या पैशातून झालंय तिथूनच पैसा येणार."
"आई म्हणजे?"
"म्हणजे काही नाही बाळा, तू घरी रहा मी आलेच आणि हो मी आवाज दिल्याशिवाय दार उघडायचा नाही."
असं म्हणून आई निघून गेली, बराच वेळ झाला तरी आई आली नव्हती, मी आईची वाट बघत बसले होते. काही वेळाने दाराचा आवाज आला.
कोण आहे विचारलं तर आई बोलली,
"बाळा मी आहे दार उघड."
तस मी दार उघडला आणि आईला बिलगली.
तस मी दार उघडला आणि आईला बिलगली.
"सुकू आता काळजी करायची गरज नाहीये, आपल्याकडे आता पैसे आहेत. रोशनचं ऑपरेशन होईल, त्याचं ऑपरेशन नक्की होईल आणि त्यानंतर मी तुझ्या डोळ्याच ऑपरेशन करून देईल. आता आपल्याला पैशाची कमी नाही हे बघ मी खूप पैसे आणलेत."
"पण आई एवढ्या कमी वेळात इतके पैसे कसे आणलेस ग?"
"त्याकडे तू लक्ष देऊ नकोस बाळा, आता आपल्याला पैशाची गरज होती तीच पूर्ण करायच्या मागे लागले होते.
तुझे बाबा नाहीत, तुमच्या दोघांचं आयुष्य मला घडवायचं आहे पण त्यासाठी तुम्ही बरे व्हायला हवं. रोशनचं सगळं नीट झालं ना की आपण तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करून घेऊ मग तू ये सुंदर जग पुन्हा पाहू शकशील. पैशाची चिंता करू नकोस." असं म्हणून आई आत गेली.
ती आंघोळ करायला आत गेली आणि बराच वेळाने बाहेर आली. अंगावरचे कपडे तिने चक्क जाळून टाकले.
"आई आता आपल्याकडे पैसे आले म्हणून जुने कपडे घालायचे नाही का आपण? तू का जाळलेस ते कपडे."
"काही नाही बाळा ही सुरुवात आहे. सुरुवातीला त्रास होईल, ते अंगावरचे कपडे नकोसे वाटतील पण हळूहळू सवय होईल. तू लक्ष देऊ नकोस, चल बाळा तुला भूक लागली असेल ना काहीतरी बनवते मी तुझ्यासाठी. दोन घास खा आणि झोपून जा." असं म्हणतच ती किचन कडे गेली.
क्रमश:
