जाणून घे तू स्वतःला...भाग 9
"मग तो तुला होकार का देतोय, ते लोक या लग्नासाठी घाई का करताय हे बघायला हवं ना? तू तुझ्या दादाला समजाव आणि नीट चौकशी करायला सांग. मी बोलले तरी ते माझं नाही ऐकणार."
"हो वहिनी मी बोलते दादाशी."
विचार करतच पूजा खोलीतून बाहेर गेली.
"अग पूजा.."
सायलीने आवाज दिला, पण पूजा निघून गेली.
सायली समोर जाऊन टेबलला धडकली. तिच्या डोक्याला टेबलचा टोक लागला. तिच्या डोक्यातून रक्त वाहायला लागलं.
सायली समोर जाऊन टेबलला धडकली. तिच्या डोक्याला टेबलचा टोक लागला. तिच्या डोक्यातून रक्त वाहायला लागलं.
तिच्या किंचाळण्याच्या आवाजाने पूजा धावत खोलीत आली.
"अग वहिनी कशी पडलीस तू? बापरे रक्त निघतंय."
"पुष्पाताई.. पुष्पाताई.."
पूजाने पुष्पाला आवाज दिला तशी ती धावत आली.
"पूजा ताई हे काय झालंय."
"बघ ना पुष्पाताई काय झालं मला काहीच कळत नाही आहे. हिच्या आवाजाने मी खोलीत आली आणि आता तर ही बेशुद्ध पण झाली."
"ताई तुम्ही दादांना फोन करा."
"नाही ग दादा ओरडेल माझ्यावर."
"ओरडले तर ओरडू देत पण त्यांना फोन करणे गरजेचे आहे." पुष्पा उठली.
तिने पाणी आणलं आणि सायलीच्या चेहऱ्यावर शिंपडू लागली पण काही उपयोग होत नव्हता.
पूजाने विक्रांतला फोन केला.
"हॅलो हॅलो दादा.."
"हा पूजा बोल."
"दादा तू लवकर घरी ये."
"काय झालं पूजा?"
"दादा सायली वहिनी." ती बोलता बोलता थांबली.
"सायली.. सायलीला काय झालं?" सायलीचे नाव ऐकून विक्रांत पॅनिक झाला."
"पूजा काय झालं सायलीला?"
पूजाने घडलेला सगळा प्रकार विक्रांतला सांगितला.
"शीट डॅमिड.." त्याने फोन कट केला आणि तसाच ऑफिसमधून निघाला.
गाडी काढली आणि तसाच तो सुसाट वेगाने निघाला.
घरी पोहोचला,
धावत खोलीत गेला.
धावत खोलीत गेला.
"सायली..सायली."
"दादा बघ ना काय झालं हे?"
"तुम्ही तिघी घरात असताना देखील हे कसं घडलं. पूजा मी तुला सांगून गेलो होतो ना. आई कुठे आहे?"
"दादा ती सुमन मावशीकडे गेली आहे."
"तिलाही आजच जायचं होतं."
"दादा मी ॲम्बुलन्स बोलावलीय." पूजा खाली मान टाकत बोलली.
काही क्षणात ॲम्बुलन्स आली, विक्रांत सायलीला घेऊन हॉस्पिटलला गेला.
सायलीच्या डोक्यातून बरच रक्त निघत होतं, काही वेळाने सगळे हॉस्पिटलला पोहोचले.
"डॉक्टर डॉक्टर प्लिज बघा ना, तिच्या डोक्याला मार लागलाय. प्लिज चेक हर डॉक्टर."
"हो हो तुम्ही शांत व्हा, मी बघतो."
सायलीला आत ट्रीटमेंट साठी घेऊन गेले.
काही वेळाने डॉक्टर बाहेर आले.
"डॉक्टर कशी आहे सायली? काही घाबरण्यासारखा आहे का?"
"हे बघा त्यांच रक्त खूप गेलेल आहे, आता काही सांगता येणार नाही. आम्ही ट्रीटमेंट केलीये बघू आता काय होईल. सध्या त्या बेशुद्ध आहेत त्यांच्या शुद्ध येण्यावर सगळ डिपेंड आहे. त्यांना शुद्ध आली तर धोका टळेल."
हे ऐकून विक्रांत थबकला, त्याला धक्काच बसला. त्याच्याकडे बघून पूजा त्याच्याजवळ आली.
"दादा दादा सावर स्वतःला, सांभाळ स्वतःला. तूच असा हरलास तर वहिनीला कोण सांभाळणार?"
तो बाकावर बसला.
पूजाही त्याच्या बाजूला बसली.
थोडया वेळाने विक्रांतची आई तिथे पोहोचली.
"विक्रांत अरे काय झालं हे?"
"आई कुठे होतीस तू?"
"अरे मावशीकडे गेले होते."
"तुलाही आताच जायचं होतं."
"अरे मावशीचा फोन आला, तिला मला भेटायचं होतं म्हणून मला जावं लागलं."
"अग मग तिला बोलून घ्यायचं होतं, तू का गेलीस?"
"अरे ठीक आहे ना मी आता आले ना इथे."
"काय उपयोग, तुम्हा सगळ्यांनाच सायलीची अवस्था माहिती आहे ना, मग मी घरात नसताना तुम्ही तिघी तिची काळजी का घेत नाही. पूजाला सांगून गेलेलो होतो की सायलीची काळजी घेशील. सायलीला स्वतःला सांगितलं होतं की तू खोलीच्या बाहेर निघू नकोस. तुम्ही कोणीच काही करत नाही. तिला जर शुद्ध आली नाही तर कंडिशन क्रिटिकल राहील. आता मी काय करू मलाच कळत नाहीये."
"हे बघ विक्रांत बाळा सगळ ठीक होईल, उगाच टेन्शन घेऊ नकोस."
"उगाच? हे सगळं उगाच वाटतय तुला? कस टेन्शन घ्यायचं नाही, आधी तिची मनस्थिती बरोबर नव्हती. आधीच्या आठवणीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतेय. या सगळ्यातून ती बाहेर पडतेय आणि आता लगेच हे सगळं घडलं."
विक्रांतला आता राग यायला लागला, त्याचा बोलण्याचा सूर वाढला.
"दादा अरे हळू बोल, हे हॉस्पिटल आहे."
"आई बघ कशी बोलतेय."
तो बाजूला जाऊन उभा राहिला.
पुन्हा त्या दोघींच्या जवळ आला.
"तुम्हाला ना सायली बद्दल काही वाटतच नाही. ती बिचारी पूजाचं काही वाईट हाऊ नये म्हणून धडपडत होती. पण त्याच तुम्हाला काहीच नाही. जाऊद्या मला बोलायचंच नाही आहे. तुम्ही दोघी जा घरी, मला कुणाचीही गरज नाही. मी माझं बघून घेईल."
तो ताडताड बाहेर निघून गेला.
पूजा आणि तिची आई घरी गेल्या.
"अरे पूजा ताई आलात तुम्ही? कशी आहे त्यांची तब्येत? बरी आहे ना."
"पाणी आण ग आधी." विक्रांतची आई तिच्यावर चिडली.
"आणते, तुम्ही बसा ना."
पुष्पा पाणी घेऊन आली.
"तुम्हाला आधी काय खायला आणू का?"
"नको थोड्यावेळाने बघू."
"तब्येत कशी आहे आता?"
"काय करायचं ग तुला तिच्या तब्येतीच. एवढाच पुडका आला तुला तर तूच जाऊन विचार ना कशी तब्येत आहे म्हणून, आम्हाला नको विचारू."
पुष्पा किचन मध्ये गेली, काही वेळाने पूजा किचनमध्ये गेली.
"पूजा ताई काय झालं त्यांची तब्येत कशी आहे?"
"सध्या शुद्धीवर यायची आहे ती, डॉक्टर बोलले जोवर शुद्धीवर येत नाही तोवर काही सांगता येणार नाही. तिच्या डोक्यातून खूप रक्त गेले ना म्हणून."
"पूजा ताई त्या बऱ्या होतील ना."
"हो ग, तू स्वयंपाक केलास का?"
"हो केलाय ना."
"डबा भर मी दादाचा रात्रीचा डबा घेऊन जाते, तो खाईल की नाही माहिती नाही पण मी घेऊन जाते. तू डब्याची तयारी कर मी आलेच फ्रेश होऊन."
"हो ताई भरते."
"आईसाहेब जेवायला वाढू."
"नको मला भूक नाही."
"असं काय करताय तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत ना, थोडं तरी खाऊन घ्या."
त्या नाही नाही म्हणता होत्या तरी पुष्पाने त्यांना वाढलं.
"पूजा ताई तुम्हाला वाढू?"
"नाही नको दादाचा डबा भरलास ना तू?"
"हो."
"मी आधी डबा पोहोचवते मग आल्यानंतर जेवते."
"आता तू का चाललीस हॉस्पिटलला?"
"अग दादाचा डबा घेऊन निघाले."
"तू गेलीस आणि तू तुझ्यावर चिडला तर?"
"आई नाही चिडणार तो, तू काळजी करू नकोस. मी जाऊन येते तू तोवर तुझ्या गोळ्या घे आणि झोप. माझी वाट बघत बसू नको."
पूजा हॉस्पिटलला गेली, विक्रम डोक्यावर हात ठेवून बसलेला होता. ती हळूच त्याच्या बाजूला बसली.
"दादा डबा आणलाय, थोडं खाऊन घे."
"नाही नको मला."
"दादा असं काय करतोयस, खाऊन घे ना."
"तू का उपाशी आहेस, जेव ना."
"तू जेवला नाहीस ना मग मला तरी कसं जेवण जाईल."
"हे बघ मला जेवायची अजिबात इच्छा नाही. जोवर सायलीला शुद्ध येत नाही तोवर मी काही खाणार नाही."
"दादा तुला इथे रात्रभर थांबायचं आहे म्हणजे तुला बर वाटायला हवं ना, काही खाल्लं नाही तर तुझी तब्येत खराब होईल. तुला स्वतःला स्ट्रॉंग ठेवावे लागेल ना. तेव्हा तू वाहिनीची काळजी घेऊ शकशील ना. खाऊन घे."
पूजाने त्याला जबरदस्तीने जेवण भरवलं,
दोघांनी जेवण केलं.
त्यानंतर पूजा घरी आली.
विक्रांत सायलीच्या जवळ जाऊन बसला.
"उठ ना ग, अजून किती वाट बघायला लावणार आहेस.
सायली तुझा आवाज ऐकायला माझे कान आतुर झालेत. तू एकदाची उठ आणि मला आवाज दे."
सायली तुझा आवाज ऐकायला माझे कान आतुर झालेत. तू एकदाची उठ आणि मला आवाज दे."
विक्रांत रात्रभर सायलीच्या उशाशी बसून होता.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा