जाऊन घे तू स्वतःला...भाग 12 अंतिम
पुढल्या दोन तासात त्यांच्या घरी फोन आला की आम्हाला हे लग्न करायचं नाहीये एवढे बोलून समोरच्याने फोन ठेवून दिला.
पूजाला आणि तिच्या आईला धक्का बसला,
पण या मागचं कारण त्यांना माहीत नव्हतं.
पण या मागचं कारण त्यांना माहीत नव्हतं.
विक्रांत आणि सायलीने पूजा आणि आईला सगळं समजावून सांगितलं.
लग्न का जुडवू दिलं नाही आणि सायलीचा त्या सगळ्यांशी काय संबंध होता हे सगळं विक्रांतने त्याच्या आईला सांगितले.
हे सगळं ऐकून त्यांना धक्काच बसला, पण पूजाचं आयुष्य खराब झालं नाही यात त्यांना समाधान मिळालं.
सायलीने सगळं समजावून सांगितलं, सगळ्यांना तिचं म्हणणं पटलं आणि लग्नाचा विषय त्यांनी सोडून दिला.
"विक्रांत आपण माझ्या आईला घरी आणायचं का?"
"पण आई?"
"मी समजावते त्यांना, आपण आधी घरी घेऊन येऊया."
सायलीला तिच्या आईला घरी घेऊन यायचं होतं, तिला तिच्या आईला त्या नर्कातून बाहेर काढायचं होतं, त्यासाठी सायलीने बरेच प्रयत्न केले.
विक्रांतच्या आईला समजवण्यात बरेच दिवस गेले. शेवटी त्या तयार झाल्या आणि विक्रांत, सायली तिच्या आईला घरी घेऊन आलेत.
ती आता त्यांच्यासोबतच राहू लागली.
ती आता त्यांच्यासोबतच राहू लागली.
काही महिन्यांनी पूजासाठी चांगलं स्थळ आल, मुलगा विदेशात नोकरीला होता. त्यांचं लग्न पक्क झालं, त्याला परत जायचं होतं म्हणून महिन्याभरातच लग्न झालं, पूजा तिच्या सासरी गेली.
काही महिन्यानंतर तो तिला स्वतःसोबत घेऊन गेला.
सायलीच्या डोळ्याच्या ऑपरेशन मध्ये काही कॉम्प्लिकेशन होते.
विक्रांतने विदेशात जाऊन तिच्या डोळ्याची ट्रीटमेंट केली.
ऑपरेशन सक्सेसफुल झालं.
ऑपरेशन सक्सेसफुल झालं.
डॉक्टरांनी तिला विचारलं की तुला सर्वात आधी कुणाचा चेहरा बघायचा आहे तर तिने समोर असलेल्या विक्रांतकडे बोट दाखवलं.
डॉक्टरने आश्चर्याने विचारले,
"तुम्हाला कसं कळलं की ते समोर उभे आहेत."
"मला चाहूल आहे त्यांची, ते कितीही दूर अंतरावर उभे राहिले ना तरी मला कळतं की तिथे उभे आहेत."
"मिस्टर विक्रांत यु आर लकी तुम्ही न दिसताही त्यांच्या जवळ असता."
डॉक्टरने डोळ्यावरची पट्टी काढली.
सायलीने हळूच डोळे उघडले.
तिला सगळ्यात पहिला चेहरा दिसला तो विक्रांतचा.
ती त्याच्याकडे बघतच राहिली, विक्रांत तिच्या समोर आला.
"बघ असा आहे तुझा विक्रांत. आवडला का तुला?"
तिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली, ते घळाघळा गालावरून ओघळले.
तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गालाला लावले. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली.
"ज्याचं मन इतकं सुंदर असेल तो व्यक्ती सुंदरच असणार ना आणि का आवडणार नाहीत तुम्ही मला, तुम्ही तर माझं जग आहात, माझं सर्वस्व आहात."
दोघांनी एकमेकांना घट्ट मिठीत घेतलं. सायली ढसाढसा रडायला लागली.
त्याने त्याची मिठी घट्ट केली.
सायलीला डिस्चार्ज मिळाल्यानंतर सायली आणि विक्रांतने काही दिवस एकमेकांसोबत वेळ घालवला. फिरले, मोजमस्ती केली, एन्जॉय केलं.
दोघेही परत आले.
घरी आले, आईने दारातच उभं ठेवलं.
त्याच्या आईने दोघांच औक्षण केलं, दोघेही त्याच्या आईच्या आणि तिच्या आईच्या पाया पडले, आशीर्वाद घेतला आणि आता खऱ्या अर्थाने त्यांचा सुखी संसार सुरू झाला. आता सगळीकडे आनंदी आनंदच होता.
दोघे एकमेकांवर नितांत प्रेम करायचे.
हळूहळू दिवस सरत गेले.
"सायली मला असं वाटतं की तू तुझं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करावं, तू शिकावं आणि काहीतरी करून स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी माझी इच्छा आहे. तू सांग तुझी इच्छा आहे का शिक्षण घेण्याची.
सायलीने होकारार्थी मान हलवली. तिला आतून वाटत होतं की आपण काहीतरी करावं, पण समाजाच्या भीती पोटी ती गप्प होती. लोक काय म्हणतील आता या वयात शिक्षण घेत आहे कारण ती दहावी झालेली नव्हती.
विक्रांतने तिला सपोर्ट केला.
तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं, पण हे सगळं सोपं नव्हतं. घरातील सगळी कामे करून अभ्यास करणे म्हणजे सायलीला तारेवरची कसरत व्हायची.
पण ती हरली नाही, हिंमतीने सगळ्या गोष्टीला तोंड देत राहिली.
अनेक उतार चढाव आले पण विक्रांतने तिची साथ सोडली नाही.
दोघांच्या प्रेमाच्या वेलीवर एक फुल बहरलं. सायली आणि विक्रांतच्या आयुष्यात लक्ष्मी आली.
आता मात्र सायलीचा पूर्ण वेळ हा तिच्यातच जायचा. सकाळी विक्रांतचा डब्बा, चहा, नाश्ता करून त्यानंतरचा पूर्ण वेळ ती लक्ष्मीला द्यायची. घरी सासूबाई होत्या आणि आई होती पण तरीही तिला तिचं सगळं करायला खूप आवडायचं. कधी वेळ मिळाला तर ह्या दोघी तिला खेळवायच्या.
दिवस आनंदाने जात होते, घरात तीन पेढ्या आनंदाने नांदत होत्या. आजी, मुलगी,नात छान सूर जुळून आले होते.
प्रेमाचे बंध जुळले होते.
विक्रांत संध्याकाळी घरी आला की लक्ष्मीचा हसरा, प्रसन्न चेहरा बघून त्यालाही खूप छान वाटायचं. तोही त्याचा दिवसभराचा थकवा विसरून जायचा.
हळूहळू लक्ष्मी मोठी व्हायला लागली, लक्ष्मी तीन वर्षाची झाली आणि सायलीने तिची शाळेत ऍडमिशन केली.
इवल्याश्या पावलांनी लक्ष्मी शाळेत जायला लागली.
ती शाळेत गेली की थोडा वेळ का होईना सायलीला निवांत वेळ मिळत होता.
ती शाळेत गेली की थोडा वेळ का होईना सायलीला निवांत वेळ मिळत होता.
सायलीने त्यातच गुंतून न राहता स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी विक्रांची इच्छा होती.
"सायली आता लक्ष्मी शाळेत जायला लागली, तुलाही थोडा वेळ असतो. तू काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे. हे बघ नुसतं घर आणि चुलमुल करू नको. तू स्वतःच्या पायावर उभी रहा, स्वतःची नवीन ओळख निर्माण कर. त्या फेज मधून बाहेर काढ स्वतःला, ओळख स्वतःच्या गुणांना. नुसतं घरी राहून चुलमुलं करून काही अर्थ नाही आहे ग, तुझी इच्छा असेल तर मी तुझ्यासाठी प्रयत्न करतो."
विक्रांतने तिला आत्मविश्वास दिला.
"सायली तू काहीतरी करू शकते, स्वतःला ओळखू शकते. स्वतःच्या गुणांना ओळख आणि यातून बाहेर पड." असे म्हणून ते त्याने तिला खूप सपोर्ट केला.
सायलीचे नोकरीसाठी प्रयत्न सुरू झाले. बऱ्याच प्रयत्नानंतर तिला एका कंपनीत नोकरी मिळाली.
सायली खुप आनंदात होती.
'एक व्यक्ती आपल्या आयुष्यात यावा आणि आपलं अख्ख आयुष्य बदलवून टाकावं असं फक्त पिक्चर मध्ये होतं असेल, पण विक्रांत माझ्या आयुष्यात आले आणि माझं अख्ख जगच बदललं. मी नेहमी त्यांची ऋणी असेल.' सायली एकटीच पुटपुटत होती.
सायलीच्या आयुष्यात हे जे काही बदल झाले त्याला सर्वभूत कारणीभूत विक्रांत होता. विक्रांतने तिचं आयुष्य सावरलं यासाठी ती नेहमी त्याला थँक्यू म्हणायची.
समाप्त:
********************
ज्याप्रमाणे विक्रांत सायलीच्या मागे ठामपणे उभा राहिला त्याच प्रकारे प्रत्येक नवऱ्याने जर त्याच्या बायकोच्या मागे ठामपणे उभे राहिला आज एकही स्त्री फक्त गृहिणी न राहता स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. गृहिणीपद सगळ्यात मोठे पद आहे पण त्याबरोबर जर ती स्वतःसाठी आर्थिकरीत्या भक्कम राहिली तर अजून तिच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण होईल. प्रत्येक मुलीचं तेच तर स्वप्न असतं.
प्रत्येक स्त्री मध्ये काही ना काही गुण असतात, त्या सुप्त गुणांना बाहेर काढण्याची गरज आहे. कधी कधी असं होतं की कोणीतरी पुश करायला हवं असतं, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यातही काही चांगले सुप्त गुण आहेत.
विक्रांतने सायलीच्या आयुष्यात तेच केलं, सायलीला एका सपोर्टची गरज होती. तो सपोर्ट सिस्टम विक्रांत बनला आणि सायलीचं आयुष्य उजाळलं.
तिची आणि विक्रांतची जर गाठभेट झाली नसती तर आज सायली कदाचित वेश्या व्यवसायात असती. काही कारणाने का होईना आईने चुकीचं पाऊल उचललं. आणि त्यात सायली भरडणार होती, पण विक्रांतमुळे तिचं आयुष्य सावरलं. ती तिच्या आयुष्यात पुढे गेली.
"आयुष्य खूप सुंदर आहे
जगता येणे महत्वाचे आहे
अडचणी सर्वांनाच आहेत
मात करणं महत्वाचे आहे...."
जगता येणे महत्वाचे आहे
अडचणी सर्वांनाच आहेत
मात करणं महत्वाचे आहे...."
ऋतुजा वैरागडकर
