जाणून घे तू स्वतःला...भाग 2
सायली अडखळून खाली पडली. तिच्या आवाजाने विक्रांतला जाग आली. त्याला सायली खाली पडलेली दिसली तसा तो ताडकन उठला आणि तिच्याजवळ गेला.
"अगं सायली आरामात चालायचं ना, मला आवाज का दिला नाहीस? मी उठलो असतो."
"तुम्ही गाठ झोपेत होतात."
"चल उठ बस इथे."
त्याच्या डोळ्यातली काळजी तिच्या हृदयाचा ठाव घेत होती.
"का करताय? का करताय हे सगळं? त्रास होतो मला, अशी सवय नाही हो मला." पाणावलेले डोळे त्याला जाब विचारत होते.
"होईल, ही सवय पण होईल." त्याच बोलणं ऐकून ती दचकली.
"दचकू नकोस, तुझ्या डोळ्यांची भाषा कळते मला, तुझ्या डोळ्यातलं वाचलं मी."
ती उठली आणि लगबगीने बालकनीत गेली. तिच्या डोळ्यात साठलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
विक्रांत तिला दुरून बघत होता.
"सायली रड ग, सगळं दुःख बाहेर निघेस्तोवर रड. आज मी अडवणार नाही, मनसोक्त रड." विक्रांत स्वतःशीच पुटपुटला.
विक्रांत फ्रेश होऊन लॅपटॉपवर त्याच काम करत बसला होता.
सायली आत आली.
"किती दिवस असा त्रास करून घेणार आहेस, सायली बाहेर पड यातून. सावर स्वतःला, हे सुंदर जग तुझी वाट बघतंय. लोकांचं सोड ग, चांगलं घडलं तरी ते बोलतात वाईट घडलं तरीही बोलतात. तुला स्वतःला सिद्ध करायचं आहे. तू ही नाही आहेस, तुझ्या आतील शक्तीला शोध. स्वतःच शोध घे. मी तुझ्या पाठीशी आहे." विक्रांतचं बोलणं ऐकून ती शांतपणे निघून गेली.
किचनमध्ये गेली.
"सायलीताई अहो तुम्ही कशाला आलात मी चहा घेऊन आले असते ना." काम करणाऱ्या पुष्पाने तिला डायनींग वर बसवलं.
"मी विक्रांतसाठी चहा घेऊन जाते."
"ठीक आहे, तुम्ही घ्याल ना इथेच."
"नको दोघांचाही रुममध्येच घेऊन जाते."
पुष्पाने सायलीच्या हातात ट्रे दिला.
"पुष्पाताई बाकीचे सगळे कुठे आहेत? त्यांचा चहा झालाय का?"
"हो सगळे त्यांच्या खोलीत आहेत. तुम्ही काळजी करू नका तुम्ही चहा घेऊन जा, थंड होईल."
सायली खोलीत चहा घेऊन गेली,
"विक्रांत चहा आणलाय तुमच्यासाठी."
"अग तू का घेऊन आलीस? पुष्पा आली असती ना."
"हो त्या आल्या असत्या, पण कधीतरी मला काही करू देत जा ना तुमच्यासाठी. मी काहीच करत नाही दिवसभर नुसती रिकामी बसलेली असते. एखादं काम केलं तर काय फरक पडतो आणि मी गॅस जवळ गेलेही नाही आणि चहा ही केला नाही.
चहा पुष्पाताईंनीच केला मी फक्त घेऊन आले. आता न रागावता प्लिज घ्या ना की असे नेहमी नेहमी मला रागवत राहणार अस असेल तर मी निघून जाईल."
चहा पुष्पाताईंनीच केला मी फक्त घेऊन आले. आता न रागावता प्लिज घ्या ना की असे नेहमी नेहमी मला रागवत राहणार अस असेल तर मी निघून जाईल."
निघण्याची भाषा तोंडून निघताच त्याने तिच्या तोंडावर बोट ठेवला.
"आता बोललीस ते ठीक आहे पण यानंतर निघण्याची भाषा करायची नाहीये. चल बस इथे बस आपण दोघे चहा घेऊया."
दोघांनी चहा घेतला.
काही वेळाने विक्रांतच्या मोबाईलवर एक फोन आला. तो फोनवर बोलला आणि लगबगीने आत आला.
"सायली मला ऑफिसला जावं लागेल, काही डॉक्युमेंट सबमिट करायचे तेवढं काम केलं की मी घरी येईल. तोवर तू रूममधून बाहेर जायचं नाहीस ओके. मी तसं पुष्पाला सांगून जातो ती घेईल तुझी काळजी. पण तरीही सांगून जातोय काहीही करायला जायचं नाहीस."
"विक्रांत किती काळजी कराल तुम्ही. अहो खरच मी नाही कुठे जाणार, तुम्ही जा आरामात आणि तुमचं काम करून या. उगाच माझी काळजी करत बसू नका."
"ओके."
विक्रांत तयार झाला, जाताना सायलीला बाय केलं. तिच्या जवळ आला तिच्या गालावरून हात फिरवला आणि नंतरच गेला.
सायली बाल्कनीत जाऊन बसली आणि जुन्या आठवणीत रमली.
तिला तो दिवस आठवला ज्या दिवशी तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली, तिचं आयुष्य नव्याने सुरू झालं.
त्याची आणि तिची पहिली भेट.
ती धावत पळत सुटली होती रस्त्यावर. आदळत होती, पळत होती. धावत रस्ता शोधत होती, जिकडे वाट मिळेल तिकडे पळत सुटली होती.
काही अंतरावर ती त्याला धडकली.
त्याचा स्पर्श होताच त्याच्या छातीला कवटाळली.
"मला वाचवा प्लिज मला वाचवा, मला त्यांच्यासोबत नाही जायचंय. मला वाचवा मी त्यांच्या हाताला लागले ना तर ते माझं आयुष्य संपवतील. नाही मला त्यांच्यासोबत जायचं नाहीये. प्लिज मला वाचवा." ती त्याला विनवण्या करू लागली.
त्याचं लक्ष द्या धावत येणाऱ्या माणसांकडे गेलं, तसा तो तिला घेऊन झाडाच्या मागे लपला. ती माणस आली त्यांनी आजूबाजूला सगळीकडे बघितलं कुणी दिसले नाही असं समजून ते समोर पळत सुटले.
निरव शांतता पसरली होती, रस्ता ही निर्जन झालेला होता.
काही वेळ तिथे थांबून तो तिला आपल्या सोबत घेऊन गेला. त्याने एका हाताने तिचा हात पकडला होता आणि दुसरा हात तिच्या खांद्यावर होता. दोघेही पायवाटेने निघाले रस्त्यात एक टपरी दिसली. दोघे तिथे बसले.
त्याने दोघांसाठी चहा मागवला.
"हे घे, चहा घे."
त्याने तिच्या समोर चहाचा ग्लास धरला, पण तो चहाचा ग्लास तिला दिसेना.
"अगं घे ना चहा, नाही घ्यायचा का तुला?"
"घ्यायचा आहे."
"मग हातात ग्लास का घेत नाहीयेस?"
"कसा घेणार?" ती चेहऱ्यावर स्माईल देत बोलली, कंठ दाटलेला होता. तो मात्र भांबावला त्याला कळून चुकलं आणि त्याने तो ग्लास तिच्या हातात दिला.
ती चहा प्यायली, तो मात्र तिच्याकडे बघतच होता. त्याच्या हातातला ग्लास हातातच राहिला, चहा थंड होऊन गेला.
"तुम्ही कोण आहात मला माहित नाही पण तुम्ही माझी आज मदत केली नसती तर आज मी.." ती बोलता बोलता थांबली आणि रडायला लागली.
"प्लिज तू रडू नको, तुला कुठे पोहोचवायचे आहे का?मी तुला सोडू का? मी असं एकेरी बोललं तर चालेल ना.?"
तिने होकारार्थी मान हलवली.
"मी तुला सोडू का कुठे."
"कुठे जाणार? माझं तर इथे कुणीच नाही."
"मी एकटी आहे."
'माफ करा मी तुम्हाला काहीही सांगू शकणार नाही, खरं सांगितलं तर तुमच्याकडून मिळणारी मदत कदाचित मिळणार नाही. मला आता शांत राहावं लागेल, वेळ पडल्यास मी त्यांना सगळं सत्य सांगेल.' ती मनातल्या मनात बोलली.
"तू गप्प का झालीस? तू चल माझ्या सोबत. तुला मी अस एकटीला टाकून जाऊ शकत नाही."
"नाही साहेब मी तर तुम्हाला ओळखत देखील नाही."
"ओळख होईल ग, तू चल माझ्यासोबत."
त्याने तिचा हात पकडला आणि दोन पाऊल पुढे टाकत नाही तोच काही माणसे त्यांच्या पुढे आली.
"ये हात छोड उसका, वो हमारा माल है."
"माल? माल काय माल मुलीशी कसं बोलावं याचं भान नाही तुम्हाला.
"ये तू कौन है, और इसकी वकालत क्यू कर रहा है, ये हमारा माल है, हमने पैसे दिये है इसके."
"ही कुठेही येणार नाही. हिला हात लावण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी माझ्यापेक्षा वाईट कुणी नाही."
"तू इसको क्यू बचा रहा है, तू ने भी पैसे दिये है क्या, तो चल साथ मे तू भी ऐश करले."
विक्रांतला त्याच्या बोलण्याचा खूप राग येत होता.
त्याने त्याची मुठी आवळली, आणि त्या माणसाच्या मुस्काटात मारली.
तसे मागचे दोन माणसं धावून आले.
पण पोलिस गाडीचा सायरनच्या आवाजाने ते थांबले. त्यांना कळून चुकलं पोलिसांची गाडी जवळपास आहे, त्यांनी तिथून पळ काढला.
ती त्याच्या मागे लपून होती, तिने त्याच्या बाहुला घट्ट धरून ठेवलेलं होतं.
काही सेकंदात पुन्हा शांतता पसरली.
त्याने तिला त्याच्या पुढ्यात उभं केलं.
"कोण होती ती माणसे.?"
त्याच्या प्रश्नाने तिला रडू आवरलं नाही आणि
ती रडायला लागली.
ती रडायला लागली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा