जाणून घे तू स्वतःला...भाग 8
विक्रांत खोलीत गेला, सायली डोळे मिटून टेकून बसलेली होती. तो तिच्या समोर बसला, तिचा हात हातात घेतला.
"का त्रास करून घेतेस ग? नको इतका त्रास करून घेऊ सगळं ठीक होईल. मला माहित आहे तू पूजाच्या लग्नाचं टेन्शन घेतलं पण तू काळजी करू नकोस आपल्या पूजा सोबत काहीही वाईट होणार नाहीये."
तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले, डोळे उघडले आणि विक्रांतला बिलगली.
खूप ढसाढसा रडली.
"काय झालं का अशी रडतेस? तुझा असा चेहरा मला बघत नाहीये. मला तुला आनंदी बघायचंय, तू असं रडत बसणार आहेस का? का स्वतःला त्रास करतेस?"
"हे सगळं विसरण्याचा मी प्रयत्न करत होती, ज्यातून मी आत्ता कुठे बाहेर पडणार होते, ते सगळं माझ्या समोर येऊन उभा राहिलंय. असा भूतकाळ माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मला खूप भीती वाटते आहे. विक्रांत माझा भूतकाळ माझ्या वर्तमानात येऊन माझं आयुष्य उध्वस्त करेल काय?"
"सायली वाईट विचार करू नकोस असं काहीही घडणार नाहीये आणि आता तू माझ्या जवळ आहेस, माझी साथ आहे तुला. तुझं कोणी काही वाकड करणार नाही किंवा कोणी तुला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही.
तू फक्त हसत रहा अजून काही नको मला आणि पूजाचा विषय डोक्यातून काढ, आपण काही आत्ताच लग्न करून तिची पाठवणी करणार नाही आहोत. टेन्शन घेऊ नकोस."
तू फक्त हसत रहा अजून काही नको मला आणि पूजाचा विषय डोक्यातून काढ, आपण काही आत्ताच लग्न करून तिची पाठवणी करणार नाही आहोत. टेन्शन घेऊ नकोस."
सायलीने तिचे डोळे पुसले, अचानक तिला काही आठवलं.
"विक्रांत मला तुम्हाला काही विचारायचंय."
"विचार ना."
"त्यादिवशी आपण हॉस्पिटलला गेलो होतो ना माझे डोळे चेकअप करायला. डॉक्टर काय बोलले होते, तुम्ही काही सांगितलेच नाहीये. पूजा मला विचारत होती, आई पण विचारत होत्या. मी कुणालाच काही सांगू शकले नाही. काय म्हणाले डॉक्टर? माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन होणार आहे की नाही."
"होईल नक्की होईल."
"नाही तुम्ही खोटं बोलताय ना? सांगा ना नक्की काय म्हणाले डॉक्टर."
"काही नाही ग थोडे कॉम्प्लिकेशन्स आहेत पण होईल आणि इथे होणार नाही ना तर मी तुला विदेशात घेऊन जाईल. तिथे तुझे उपचार करेल पण तू काळजी करू नकोस. तुला हे सुंदर जग नक्की बघायला मिळेल."
"खरंच काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना?"
"नाही खरंच काही नाहीये, डॉक्टर बोलले कॉम्प्लिकेशन आहे. कदाचित ऑपरेशन सक्सेसफुल होणार नाही पण आपण प्रयत्न करूया. आपल्या हातात प्रयत्न करणे एवढंच आणि मी तुला बेस्ट डॉक्टर कडे घेऊन जाईल मोठ्या डॉक्टरकडे, तू कुठलीही काळजी करू नकोस."
पूजा सूप घेऊन आली, विक्रांतने सायलीला सूप पाजून द्यायला चमच तिच्या तोंडासमोर धरला.
तो सूप पाजत होता आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू निघत होते. सूप पाजून झाल्यानंतर त्याने तीच तोंड पुसलं.
पूजा खोलीतून निघून गेली.
"का करताय तुम्ही इतकं सगळं माझ्यासाठी? का करताय?"
"कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून."
"कधीतरी कुणीतरी माझ्यावर प्रेम करेल अस मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, तुम्ही माझं आयुष्य बदलून टाकलंत.
तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं करत आहात पण मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही आणि करू शकेल की नाही हेही माहीत नाही. प्लिज तुम्ही माझ्यासाठी काही करत जाऊ नका. नका करू इतकं प्रेम माझ्यावर. तुमचं प्रेम मला मिळावं एवढी पात्रता माझी आहे की नाही मलाही माहित नाही, कुठे होते मी? कशी होते? आणि आज तुम्ही मला अगदी माणसात घेऊन आलात. नका करू इतकं प्रेम माझ्यावर. इतक सुख नका देऊ मला. एवढ्या सगळ्याची सवय नाहीये मला. पुन्हा जर त्याच खाईत पडले तर नाही जगू शकणार नाही मी."
तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं करत आहात पण मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही आणि करू शकेल की नाही हेही माहीत नाही. प्लिज तुम्ही माझ्यासाठी काही करत जाऊ नका. नका करू इतकं प्रेम माझ्यावर. तुमचं प्रेम मला मिळावं एवढी पात्रता माझी आहे की नाही मलाही माहित नाही, कुठे होते मी? कशी होते? आणि आज तुम्ही मला अगदी माणसात घेऊन आलात. नका करू इतकं प्रेम माझ्यावर. इतक सुख नका देऊ मला. एवढ्या सगळ्याची सवय नाहीये मला. पुन्हा जर त्याच खाईत पडले तर नाही जगू शकणार नाही मी."
"सायली अग तू काय बोलतेस?"
"तुमचा लळा लागेल मला आणि मग सोडवणार नाही. तुमच्या पासून दूर मी नाही राहू शकणार."
"कुणीही तुला माझ्यापासून दूर नेणार नाहीये आणि मी तुझा हात कधीही सोडणार नाहीये. तू फक्त माझी आणि मी तुझा. आयुष्यभर तुझी साथ देईल वचन देतो आज मी तुला. तुझा हात कधीही सोडणार नाही, परिस्थिती कशीही असली तरी."
"पण हे वादळ माझ्या आयुष्यात येऊ पाहतंय त्याचं काय करू मी?"
"ते वादळ मी तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही, त्या वादळाला तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधी माझ्याशी लढावं लागेल. त्या वनव्याची तुला झळही लागू देणार नाही मी."
त्याने तिला मिठीत घेतलं, बराच वेळ दोघेही तसेच बसून होते.
विक्रांतला कॉल आला आणि तो त्याच्या कामात व्यस्त झाला.
"सायली मला काही वेळासाठी ऑफिसला जावं लागेल, तू तुझी काळजी घे मी जाऊन येतो. मी येईपर्यंत पूजा असेल तुझ्याजवळ. काही लागलं तर तिला सांग आणि पुष्पाताई आहेच मदतीला, ठीक आहे." त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो त्याच्या कामाला निघून गेला.
थोड्यावेळाने पूजा खोलीत आली.
"कसं वाटतंय वहिनी तुला आता?"
"बरी आहे मी. काय ग काय म्हणाली मुलाकडची लोकं?"
"काही नाही त्यांना मी पसंत आहे म्हणाले, जर तुमचा होकार असेल तर कळवा आम्ही मुहूर्त काढतो असे बोलून गेले ते."
"मग त्यांचा काही फोन आलेला का?"
"नाही ग इतक्या लवकर नाही करणार ते फोन. दादा म्हणाला की आपण दोन-तीन दिवसांनी त्यांना कळवू. आधी पूर्ण चौकशी करू आणि मगच काय ते बघू, घाई करायची नाही."
"काय करतो ग मुलगा?"
"सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, फॅमिली पण चांगली आहे म्हणजे प्रतिष्ठित वाटत होते कारण त्यांच्या घरचे सगळेच लोक एज्युकेटेड आहेत."
पूजा बोलत होती आणि सायली तिच ऐकत होती.
सायलीच्या डोक्यात विचार चक्र सुरू होते.
'फॅमिली एवढी वेल एज्युकेटेड आहे तर मग तिथे ती काय करत होती, तिचा आणि त्या फॅमिलीचा काय संबंध? मी जसा विचार करते तसच तर घडणार नाही ना? की मी चुकीचा विचार करत आहे. पण ती तीच होती का? अजून कुणी हे आधी माहीत करायला हवं, पण मला हे कसं कळेल. मला काहीतरी करावंच लागेल, तिला भेटण्यासाठी काहीतरी धडपड करावी लागेल. पण काय करू यांच्या मदतीशिवाय मी काहीच करू शकत नाही आणि हे माझ्यासोबत तिथे यायला तयार होणार नाहीत."
"वहिनी काय विचार करतेस? वहिनी कोणत्या विचार गुंतलीस?"
"काही नाही ग, तू सांग तुला मुलगा आवडला का?"
"हो मुलगा छान आहे."
"पण त्याचा स्वभावही आपल्याला कळायला हवा. तो कसा आहे कुठे जॉब करतो खरच तर तिथे जॉब करतो का? बॅकग्राउंड काय आहे सगळं बघायला हवं."
"हो दादा बोलला सगळी चौकशी करायची. तुला माहिती नसेल तू आता नवीन आहेस. पण माझ्या लग्नासाठी ना खूप प्रॉब्लेम झालेत म्हणून आईला ना माझं लग्न लवकर झालेलं बघायचंय. म्हणजे मुले मला बघायला यायचे आणि नकार द्यायचे, काहींना आई नकार द्यायची."
"पण ते नकार का द्यायचे तुला?"
"माझं शिक्षण नाही आहे, मी बघायला इतकी चांगली नाहीये म्हणून."
"फक्त एकच कारण होतं तुला नकार मिळत होता."
"हो मग."
"आता तुला एक गोष्ट विचार करण्यासारखी नाही वाटत का?"
"कुठली?"
"एक सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगा तुला पसंत का करेल? तो ही त्याच्या लेवलची मुलगी बघेल ना?"
"हो वहिनी तुझं बरोबर आहे."
"मग तो तुला होकार का देतोय, ते लोक या लग्नासाठी घाई का करताय हे बघायला हवं ना? तू तुझ्या दादाला समजाव आणि नीट चौकशी करायला सांग. मी बोलले तरी ते माझं नाही ऐकणार."
"हो वहिनी मी बोलते दादाशी."
विचार करतच पूजा खोलीतून बाहेर गेली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा