Login

जाणवतय आता मला भाग १

एक इच्छा ज्याच प्लॅनिंग सुरु झाले मनात.


अंगाणात खूर्ची टाकून शून्यात नजर लावून बसलेला नाना कोणत्यातरी गहन विचार करत बसले होते. इतक्यात आपले इवले हात नानांच्या डोळ्यावर लावत ओळखलं का मला? मी कोण सांगा बर? नानांच्या शेंडेफळाच पण शेंडफळ स्वरा आपल्या बोबड्या आवाजात बोलत होती. नानांना तीचा हिरमोड करायचा नव्हता. मुद्दामच सगळ्या नातवंडाची नाव घेवून झाल्यावर स्वराच नाव एकदाचे नानांनी घेतल्यावर स्वराला आनंद तर झाला होता. तीची बोलण्यातली चतुराई देखील वाखण्याजोगी होती.

" एवढे बाकीचे आवडते तर मग फोन करुन आईला मला पण घेवून यायला सांगितले. मी येणार हे माहित होत ना? तरीपण मी असेल असं नाही का वाटल तुम्हांला." स्वरा भुवया उंचावत बोलत होती.

" मी तर सगळ्यानांच बोलावून घेतल होते. अजून कोणीच आले नाही. म्हणून सगळ्यांची नाव माझ्या तोंडात येत होती."

" मला नाही बोलायचं आता काही." गाल फुगवून स्वरा आईच्या पदराखाली लपून बसली होती.

" गोड नातीचा रुसवा कसा काढायचा माहिती मला. माझ्या खिशात आणि टोपी खाली तिला आवडणा-या रंगबिरंगी गोळ्या आहेत. मिना तुला यातल्या कोणत्या हव्या ते घे नाहीतर तू. स्वराला नको ना."

" नको नको तीला नको. मला द्या सगळ्या. हसत-हसत स्वराने नानांच्या खिशात हात घातला."

स्वराच्या चेह-यावरचा आनंद आणि हसू पाहून नानांच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले होते.

आता एक-एक करुन सगळी मुले, मुली आणि नातवंडाने घराच गोकुळ पुन्हा एकदा बहरलं गेले होते.

सर्वजण त्या दिवशी प्रवास करुन थकले होते. जेवण करुन झाल्यानंतर गप्पा मारता - मारताच अर्धेजण झोपून गेले होते. नातवंड मात्र आई-बाबांच्या सोबत राहून एकटक नविन जागी आल्यावर कसे एकटक बघत असतात, तसे पूर्ण घर न्याहाळत होती. हे नानांच्या नजरेतून काही सुटले नव्हते.

दुस-या दिवशी मुले आणि मुलींनी नानांना सर्वांना एकत्र बोलावण्याचे प्रयोजन विचारत होते.

" नाना तुम्ही आणि माईने आमच्या सर्वांच्या घरी चक्कर मारायची तर आम्हांलाच का बोलवून घेतले ओ? "
नानांना मोठा मुलगा श्याम बोलत होता.

" मला पण सुट्टी देत नव्हते आधीच. अर्जंट काम आहे महत्वाचे असे सांगून आले मी." नानांची मुलगी श्वेता बोलत होती.

" घरचाच बिजनेस असला तरी दुकानावर हजर राहावं लागते. नाहीतर कोणी पण येवून बिजनेसचा दर्जा बिघडवू शकते. काही दिवस मला पण आता बिजनेस कडे लक्ष देता येणार नाही." नानांचा मधला मुलगा राम बोलत होता.

" सर्वजण एकत्र आलो की नाना आणि माईंना पण आनंद होत असणार. त्यांना आठवण आली की, निसंकोचपणे सर्वांनी एकत्र जमायला हवे." सगळ्यात लहान शेंडेफळ मीना बोलत होती.

नानांच्या धाकट्या मुलाचे एक वर्षापूर्वी अपघातात जीव गेला होता. त्याचा जन्मदिवस जवळ आला होता. पोर लहान असताना परीस्थिती नसताना देखील नाना प्रत्येकाचा वाढदिवस त्यांना आवडणा-या वस्तू देवून साजरे करत होते. नानांच्या पत्नी माई प्रत्येकाच्या आवडीचा खाद्यपदार्थ बनवून देत होत्या. कोणाला शिरा, खीर, लाडू बनवून देत होत्या.

आपल्या गेलेल्या मुलाची आठवण आणि त्याच्या बालपणीतले सर्व भावंडाच्या आठवणी नानांच्या समोर जणू भास म्हणून जाणवत होत्या. सगळ्यांना डोळे भरुन पाहण्याची इच्छा नानांनी व्यक्त केल्यामुळे माईंनी सर्वांना फोन करुन बोलावून घेतले होते.

चार दिवसांची सर्वजण सुट्टी घेवून आले होते. नातवंड आणि मुल यांच्या गदरोळ्यात माई सुखावल्या होत्या.
आजी मला पिझ्झा खायचा. तर कोणी आजी मला पावभाजी खायची म्हणून हट्ट करत आपसांत भांडण करत होते.

हे तर गाव आहे. शहरा सारखी दुकान, तिथले पदार्थ इथे कुठून आणायचे याचा विचार नाना करत होते.

माई तर त्यांच्यापण आई-वडिलांची आई होती. आपल्या नातवंडांना या पदार्थाला घरातल्या साहित्यातून कस प्रदर्शित करायचे याची त्यांना पुरेपूर कल्पना होती.

माईंनी गव्हाच्या पिठाचा गोळा मळला. बटाट्याची भाजी भरुन पराठा बनवला. चिंच-गुळाची चटणी बनवली ती त्यावर पसरवली. डाळीचे पीठ मळून घरच्या घरी बारीक शेव काढली होती. बटर ऐवजी तुपाचा वापर करत पराठा शिजवला होता. कोथिंबीरीने सजवून कांदा-टोमॅटो बारीक चिरुन माईंनी खमंग असा अफलातून पिझ्झा बच्चे कंपनीला खायला दिला होता.

सर्वांनी पिझ्झावर ताव मारत खायला सुरवात केली होती. मोठ्या मुलांनी देखील आईने बनवलेला पदार्थ खायला सुरवात केली होती. माई अशी शक्कल काढत मुलांचे हट्ट पुरवत होत्या. त्यांना देखील आपण बनवलेलं आवडते यातून त्या समाधानी दिसत होत्या.

पहिले दोन दिवस तर असे बोलत-चालत निघून गेले होते. नानांनी जवळच्या प्रसिद्ध असलेल्या कास्य पठाराला भेट देवून परीवारासोबत फोटोग्राॅफीचा बेत आखला होता. सर्वांकरता एकसारखा तागा घेवून मुल आणि नातवंडांना शर्ट शिवले होते. यात माईंची मदत मात्र झाली होती. माईंनी आपल्या पोरांची मापे अचूक आधीच घेवून ठेवली होती. सूना आणि मुलीला देखील हिरव्या‌ रंगाची साडी घेवून यायला सांगितले होते. नानांनी लाल रंगाच्या रेशमी साड्यांवर सोनेरी जरीचे काठ असलेल्या अप्रतिम साड्या खरेदी केल्या होत्या. मुलींना त्याच साडीतून एक परकर आणि ब्लाऊज शिवला होता.

क्रमशः

🎭 Series Post

View all