Login

जाणवतय आता मला भाग २

प्लॅनिंग नुसार घडले की समाधानी पावते मन.
मागच्या भागात आपण पाहिले कास्य पठारावर जाण्याची नानांची तयारी आपण सर्वांनी पाहिली होती. आता हे सरप्राइज गिफ्ट सर्वांना देण्यासाठी नानांनी एक खेळ घेतला होता त्या खेळामध्ये प्रत्येकाला विशेष बक्षिस असल्याचे जाहिर केले होते.

नानांच्या बालपणी खेळला जाणारा तो खेळ म्हणजे आपली एक इच्छा बोलवून दाखवून प्रत्येकाने ती किती महिन्यात पूर्ण करुन दाखवणार याचा आराखडा कसा आखणार त्यासाठी काय प्रयत्न करणार हे बोलून दाखवत नानांचे मन जिंकायचे होते.

प्रत्येकाने आपल्याला वाटेल ती इच्छा बोलून दाखवली होती. त्याप्रमाणे करण्यात येणारे प्रयत्न देखील सांगत खेळाचा आनंद अनुभवत सरप्राइज गिफ्ट देखील मिळवले होते. महिन्यांचा अवधी ऐकताना मात्र एकेकाची तारांबळ उडत होती. कोणी ६ महिने तर कोणी चक्क ११ महिने सांगितले होते.

खेळ रात्रभर रंगला होता त्यानंतर नानांनी दोन ग्रुप पाडून दमशेराज, गाण्यांच्या भेंड्या सोबत आईसक्रीम चा बेत देखील आखला होता. प्रत्येकाचा आवडीचे फ्लेवर नानांनी आणले होते. खर सरप्राइज तर नानांंनी रात्री १२ वाजता जाहिर केले होते. उद्या सकाळी ८ वाजता आपण कास्य पठाराला भेट द्यायला जाणार आहोत. तिथे आपल्याला मी आज भेट दिलेली कपडे घालून तयार होवून यायचे असे सांगितले होते.

" झोप होईल का नाना तोपर्यंत सगळ्यांची? " श्याम बोलत होता.

" नाना मला आधी कल्पना दिली असती तर मी माझा कॅमेरा घेवून आलो असतो." राम बोलत होता.

" मी ज्वेलरी बनवून आणली असती सगळ्यांना." श्वेता बोलत होती.

" मी इतक्या जवळ राहून कसली कल्पना दिली नाही मला नाना तुम्ही."

" सकाळ झाली की अजून काही सरप्राइज मिळतील." नाना हसत बोलत होते.

आणि सर्वजण उत्सुकतेने पहाटेच उठून तयार होवून खाली येताच ज्वेलरीच पॅकेट पॅक केलेल होत प्रत्येक सूना, मुली आणि नातींकरता. दरवाज्याजवळ एक फोटोग्राफर अंगणातल्या काही झाडांचे फोटो काढत उभा होता.

सर्वांचा आनंद गगनाला भिडला होता. एक मिनी बस देखील दारासमोर दिसत होती.

" दादा हि बस कोणाची आहे आपल्या घरापुढे? "राम बोलत होता.

" हो ना. आपल्याला तर आपल्या गाडीनेच जायचे असेल ना बाहेर जाताना." श्याम बोलत होता.

" नानांनी आता बसचे देखील आयोजन केले आहे का काय?"श्वेता बोलत होती.

" तुम्हांला सगळ्यांना फोटो काढायला नानांनी बोलावले आहे. लवकर या नाहीतर नाना बाहेर जायचा प्लॅन रद्द करणार आहेत." लहान मुल आगगाडी खेळत सर्वांना बोलवून आणत होती.

सर्वजण एकत्र आल्यावर प्रत्येकाचे फॅमिली आणि सगळ्यांन मिळून फोटो काढले होते. फोटो काढत असताना टुमदार घर उठून दिसत होते.

"चला आता आवरत घ्या आपल्याला पुढे जायला उशीर होईल नाहीतर. सर्वांनी त्या बसमधे बसून घ्या."नाना बोलत होते.

" आपल्या गाड्या आहेत की? " श्याम बोलत होता.

" एकत्र सहलीला जाण्याची मजा वेगवेगळ्या गाडीत बसून नाही येणार." माई बोलत होत्या.

" घ्या बसून आता पटकन. " मीना बोलत होती.

सर्वांचा प्रवास गाणी, गप्पा-गोष्टी करत सुरु झाला होता. सोबत माईंनी आणलेल्या शंकरपाळ्या, चकली खात पोर आनंदाने बेभान झाली होती. कोणी खिडकीच्या बाहेर निसर्ग पाहत आपल्या डोळ्यात ती प्रतिमा साठवून ठेवत होते. तर एक चिमकुली नानांची आवडती नात सायली वही पेन घेवून आपण घरी आल्यापासून काय काय मजा केली हे लिहित आज फिरायला आलो आहे हे अचूक प्रसंगासह लिहत होती. सायलीचे असे वहित लिहणे नानांच्या नजरेतून चुकले नव्हते. तीला न‌ दाखवता नानांची नजर मात्र सायली काय लिहते याकडे नक्कीच होती.

आलेल्या ठिकाणी सगळे एकत्र येताच विविध रंगाची रंगबिरंगी फुले, पाण्याचा झरा पाहून मन उल्हसित झाले होते. सर्वजण आता आपल्या पद्धतीने निसर्गाचा हा आस्वाद घेत होते. सोबत फोटोग्राफरला बोलवून घेत होता. फोटोग्राफरची मात्र तारांबळ उडत होती. याच्या मागे जावू की त्याच्याकडे जावू. हे चित्र नाना भरभरुन हसत साठवून ठेवत होते.


दुपारचे जेवण हाॅटेल मधे करुन नानांनी एक मराठी चित्रपटाच्या तिकिटे देखील बुक केली होती. तो चित्रपट देखील धमाल उडवून देणारा होता. रात्री देखील हाॅटेलला जेवण करुन आल्यावर सर्वजण आराम करणार या उद्देशाने घरी यायच्या तयारीत होते. घरी येताच पाहणारे दृश्य लाजवाब होते. घराला संपूर्ण लायटिंग केली होती. दाराचे कुलूप उघडताच गुलाबाच्या पाकळ्यांनी रेड कार्पेट अंथावर तस घरात येताना केले होते. घरामधे सण असल्यासारखे झेंडूच्या फुलांच्या माळा, लायटिंग विलोभनीय वाटत होते.

कामवाल्या मावशी सर्वांची घराबाहेर उभ राहून वाट पाहत होत्या. घरात येताच त्यांनी फ्रिजमधे ठेवलेला केक घेवून आल्या होत्या. पुन्हा आत जावून त्यांनी कॅडबरी आणि चाॅकलेट मुलांकरता आणले होते.

" नक्की काय स्पेशल आहे नाना. एवढी छान ट्रिप, वेगवेगळे सरप्राइज. आम्ही सर्वजण भारावून गेलो आहोत." राम बोलत होता.

" खरतर मोठा मुलगा या नात्याने मी हे सर्व करायला हव होत नाना." श्याम लाजिरवाण्या स्वरात बोलत होता.

" अरे कोणीही काही वाटून घेवू नका. तुम्ही खूश आहात ना? सगळ्यांना एकमेंकासोबत राहायला आवडले ना?" नाना डोळ्यात अश्रूंचे थेंब साठत बोलत होते.

क्रमशः

🎭 Series Post

View all