Login

जाणवतय आता मला अंतिम भाग ३

मनातली टोचणी व्यक्त झाल्यावर राहिलेल आयुष्य समाधानाने जगता आले.
मागच्या भागात आपण पाहिले की, नानांनी आयोजित केलेली सहल सर्वांनी आनंदाने उपभोगले होती. नानांनी दिलेले सरप्राईज गिफ्ट आणि सोबतीला दिलेली फोटोग्राफर करून फोटो काढण्याची हौस लाजवाब होती. असे आगळे वेगळे फोटोशूट करून कायमस्वरूपी आठवणीत राहील अशी गोड भेट नानांनी सर्वांनाच दिली होती.

" नाना तुमच्या डोळ्यातले अश्रू आम्ही पाहू शकत नाही. काय झाले तुम्हाला नक्की सांगाल का मला." सर्व मुलं आणि मुली नानां भोवती जमा होऊन विचारत होते.

" उद्या तुम्ही सर्वजण आपापल्या घरी जाणार. आपल्या व्यवहारात व्यस्त होणार, मुलं देखील शाळा, कॉलेज आणि अभ्यासात मग्न होतील. या आपण एकत्र घालवलेल्या आठवणीच आमच्याकरता संजीवनीच नक्कीच काम करेल." नाना बोलत होते.

" नाना, पण असे तुटक का बोलत आहात तुम्ही. तुम्ही आम्हा मुलांकडे प्रत्येकाकडे येऊन राहू शकता. किंवा तुम्ही बोलावल्यानंतर आम्ही सर्वजणच तुम्हाला भेटायला कधीही येऊ हे आम्ही सर्वजण नक्कीच तुम्हाला प्रॉमिस करतो आहोत. मला माहित आहे तुम्ही राकेशच्या जाण्याने खूप हळवे झाले आहात. त्याचे असे आपल्या मधून निघून जाणं खरंतर कोणीच अजून विसरलेले नाही. तो आजही आपल्याबरोबर आहे असेच प्रत्येकाला वाटत आहे." श्याम बोलत होता.

" नियतीने दाखवलेला हा खेळ खरं तर मला मंजूर नाही. पण त्यातून देखील मार्ग काढत आपलं आयुष्य सुंदर कसं बनवता येईल, त्याचा आनंद कसा उपभोक्ता येईल या दृष्टीनेच मी जगण्याचा प्रयत्न करत आहे." नाना बोलत होते.

" खरं तर मला देखील खूप खचायला झालं होतं. मागच्या दोन महिन्यात झालेला त्रास पाहिला आहे. नानांनी, माझ्या उशाशी दिवस-रात्र नाना बसून होते. तेव्हाच, आयुष्य आनंदाने कसे जगता येईल याचा विचार त्यांनी केला असावा." माई बोलत होत्या.

" अगं पण त्याबद्दल तर मी काहीच म्हणत नाही. माझ्या मनात चार महिन्यापूर्वीच अंगणात खुर्चीवर बसत असताना एक विचार मनात सारखाच रुंजी घालत होता. मला आम्हा सर्व भावंडांचे लहानपणीचे दिवस आठवले होते. एकमेकांशी केलेली भांडण, प्रेम
आठवत होते. तुमच्या सर्वांसारखंच आम्ही देखील असंच एकत्र येऊन सण उत्सव साजरे करत होतो. नंतर कुटुंब प्रत्येकाचेच वाढत गेले. जो तो आपल्या मुलांच्या आणि नातवंडांच्या भोवती गुंडाळला गेला होता. आधी एकत्र येण्यासाठी कामावरून सुट्टी घेऊन एकत्र येत होतो. नंतर माझी जशी रिटायरमेंट जवळ आली होती. तसे प्रत्येक भावाने माझ्याशी नातं तोडल्यासारखं वागत होते. मी आता कमवत नाही. हतबल झालो आहे की काय अशी भावना त्यांनीच माझ्या मनात निर्माण केली होती. त्यांनी त्यानंतर माझे त्यांच्या घरी येण्या-जाण्याचे मार्ग देखील बंद केले होते. त्यांना भेटायची इच्छा असून देखील भेटता येत नव्हते. माझ्यासाठी तुम्ही मुलेच जगण्याचा दृष्टिकोन आहे हे मी विसरून गेलो होतो. तुमच्यामध्येच माझा आनंद जपला आहे. आणि तो कसा साजरा करता येईल यावर मी गेले काही महिने विचार करत होतो. जसे मी ठरवले होते त्याचं इच्छित फळ मला आज मिळाले होते. आनंद जरी तुम्हाला झाला असला तरी त्याचा समाधान आणि माझ्या उर्वरित आयुष्याची पुंजी तुम्हीच सर्वजण आहात." नाना बोलत होते.
" तुम्ही इतके विचार करत होते परंतु एका शब्दांना देखील आम्हाला बोलला नाहीत. आम्ही तुमचीच मुले होतो ना तेव्हा सांगितलं असतं तर आम्ही त्यांच्याशी संवाद साधला असता." राम बोलत होता.

" वादाने वाद वाढत जातो. तसेही कोणाशी वाद घालत बसण्याची ताकद उरली नाही. जे आहे त्यात गोड मानून लांबून का होईना एकमेकांच अस्तित्व जपायचं आहे." नाना बोलत होते.

" तू देखील आमच्याशी या विषयावर बोलले नाही. मला सांगितलं असतं तर मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केले असते." मीना माईशी बोलत होती.

" मला शपथ घातल्यावर मी कोणाशी काय संवाद साधणार होते मला सांगा तुम्ही." माई बोलत होती.

" माझे सर्वांनाच एक सांगणं आहे की माझी बाजू घेऊन कोणीही कोणाला काही बोलणार नाही." नाना आपल्या मुल आणि मुलींना सांगत होते.

" ते सगळे जाऊ द्यात. आम्ही सर्वजण एकमताने तुम्हाला एक वचन देतो आम्ही सर्वजण वेळात वेळ काढून तुम्हाला भेटायला येऊन तुम्ही ठरवलं असंच पद्धतीने कधी सहलीचे, कधी कोणाकडे सण साजरा करायचा याचे नियोजन नक्की करुन , आपण सर्वांनी एकजुटीने राहायचं." श्याम बोलत होता.

" सगळ्यांचा जाऊ द्या नाना, मी मात्र महिन्याच्या महिन्याला तुम्हाला येऊन नक्की भेटणार." मीना बोलत होती.

" तुझ्या बरोबर आई, मी पण येणार नानांना भेटायला." स्वरा हसत बोलत होती.

" माझं तुमच्या सर्वांना एकच सांगणं आहे की जी वेळ आज माझ्यावर आली. ती उद्या तुम्ही स्वतःवर येऊ देऊ नका. तुमचा देखील पुढे जाऊन संसार वाढेल. तेव्हा आपल्या रक्ताच्या नात्यांना मागे ठेवून फक्त पुढच्या पिढीचा विचार करण्यामध्ये व्यस्त होऊ नका. लहानपणापासून एकत्र असणारे आपले भाऊ जेव्हा आपल्या उतार त्या वयात आपल्याशी बोलत नाहीत तेव्हा वाटायला येणारे दुःख काय असते हे जाणून घेणे आहेत का दुर्दैवी तो मीच आहे. अशावेळी प्रत्येक गोष्ट आपण आपल्या मित्राशी मनमोकळेपणाने बोलतो खरं. रक्ताची ओढ मात्र त्या भावनिक नात्यात गुरफटली गेली आहे. मित्र हे आपल्या टप्प्याप्रमाणे बदलत जातात. आपली भावंडे आपल्या जन्मापासून आपल्या सोबतीला असतात. मी उगाच आनंदावर विरझण तर घालत नाही ना? मनात खूप वर्षापासून टोचणी लागलेली होती. ती आज तुम्हा सर्वांशी बोलून दूर करायची होती. सर्वांनी असेच आपल्या मनातल्या भावना, सुख-दुख वाटून घेत चला. पुन्हा असेच आपण छोटेसे गेट टुगेदर नक्कीच करत राहू. नाना भरभरुन बोलत होते.

🎭 Series Post

View all