भाग १
“ कनिष्का, गुरुजींनी एक छान स्थळ सुचवले आहे. मुलगा काही वर्ष बाहेर देशात होता, आताच परतला आहे. मोकळ्या विचारांचा वाटतो.” तिचे बाबा म्हणाले.
“हम्म.” कनिष्का ऑफीसला जाण्याची तयारी करत म्हणाली.
“ अगं खरंच मुलगा छान आहे. बघ..” आई तिला मोबाईल मधील फोटो दाखवण्यासाठी मोबाईल पुढे करत म्हणाली.
“ओके.” ती फोटो न बघताच म्हणाली.
“तुझा होकार असेल तर गोष्ट पुढे नेऊ?” आईने विचारले.
“माझ्या होकराचा प्रश्नच कुठेय आई? त्यांनी होकार द्यायला हवा.” ती म्हणाली.
“का नाही होकार देणार? माझी इतकी सोन्यासारखी मुलगी, काय कमी आहे?” आई म्हणाली.
त्यावर ती भुवया उंचावत आईकडे बघत होती.
त्यावर ती भुवया उंचावत आईकडे बघत होती.
“आई, तोंडावर नकार देऊन जातात.” ती काहीशी हसत म्हणाली. पण तिच्या हसण्यामागे एक उदासीनता होती.
“किहू, बाळा आलेल्या पाहुण्यांना सगळंच सांगायची गरज नाही. “ आई थोडे चाचपडत म्हणाली.
कनिष्काने बाबांकडे बघितले, आईच्या बोलण्यात त्यांचीही संमती दिसत होती.
कनिष्काने बाबांकडे बघितले, आईच्या बोलण्यात त्यांचीही संमती दिसत होती.
“मी परत तेच सांगतेय, माझा लग्नाला नकार नाहीये. लग्न म्हणजे आयुष्याची नवी सुरूवात आणि मला नवी सुरूवात खोटेपणाने आणि काही लपवून करायची नाही. ” ती समजावत म्हणाली.
तिला मुलगा बघायला आला की ती नेहमी त्यांना सगळे स्पष्ट सांगत होती. त्यामुळे तिच्या भोवती नकाराचे धुके तयार झाले होते. आईवडिलांना तिचे म्हणणे पटत होते पण तरी तिच्या काळजीपोटी ते तिला समजावत असे.
“तुम्ही त्यांना बोलवा. पुढले पुढे बघू.” ती नेहमीप्रमाणे हसत म्हणाली. आईवडिलांचे उतरलेले चेहरे बघून तिला वाईट वाटले होते. तिच्या हसण्याने त्यांचे चेहरे सुद्धा उमलले.
***
किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
किसी का दर्द मिल सके तो ले उधार
किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है….
श्रेयस गाणे गुणगुणत ऑफीसला जाण्याची तयारी करत होता. कालची संध्याकाळ त्याच्या डोळ्यांपुढून जातच नव्हती.
किसी का दर्द मिल सके तो ले उधार
किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है….
श्रेयस गाणे गुणगुणत ऑफीसला जाण्याची तयारी करत होता. कालची संध्याकाळ त्याच्या डोळ्यांपुढून जातच नव्हती.
“ओह मिस्टरीयस गर्ल..” डोळे बंद करत तो स्वतःशीच हसला.
“मी लाजतोय का?” आरशात बघत तो स्वतःशीच बोलत स्वतःला निरखून बघत होता.
काल संध्याकाळी अवकाळी असा मुसळधार पाऊस पडत होता. त्याचे ऑफिस सुटले आणि तो घरी जायला निघाला होता. पाऊस, खड्डे अन् पाणी भरलेले रस्ते, त्यात ट्रॅफिक जाम, तो पार वैतागला होता. सगळ्यातून वाट काढत तो पुढे जात होताच की त्याने करकचून गाडीचा ब्रेक मारला.
“यू इडियट, बघून चालता येत नाही का?” तो बडबडतच होता की त्याच्या गाडीसमोर आलेल्या मुलीने घाबरून चेहऱ्यावर दाबून धरलेला हात हळूहळू खाली केला आणि काही सेकंदासाठी तिने त्याच्याकडे बघितले.
“सॉरी.” ती म्हणाली.
त्याला तर काही ऐकू आले नव्हते, पण तो तिच्या ओठांच्या हालचालीवरून त्याला समजले आणि तिच्याकडे बघत एकदम स्तब्ध झाला.
त्याला तर काही ऐकू आले नव्हते, पण तो तिच्या ओठांच्या हालचालीवरून त्याला समजले आणि तिच्याकडे बघत एकदम स्तब्ध झाला.
सॉरी बोलून तिने तिच्या हातातील खाली पडलेले पुडके उचलले, आपल्या कंबरेशी पर्सजवळ दाबून धरले आणि पळतच रस्त्याच्या कडेने गेली. ते बघून त्याला जरा वेगळे वाटले म्हणून तो तिच्या पाठीमागे जाऊ लागला. एका झाडाच्या आडोशाला लपून त्याने पुढे बघितले तर आडोश्याला भिजलेल्या गरीब मुलांना ती खाऊ घालत होती.
“यात आणखी थोडा खाऊ आहे, तिकडे अडकलेल्या तुमच्या मित्रांना दे. आणि हो, कचरा इथे फेकायचा नाही हा; कचरापेटीत टाकायचा.” ती त्या मुलांना सूचना देत होती.
ते बघून वैतागलेल्या त्याच्या चेहऱ्यावर छान हसू पसरले. तिचा आवाज तसा काहीच गोड नव्हता, जरा जाडसरच होता पण त्याला फारच गोड वाटून गेला.
“दीदी, पोट भरले.” त्या मुलांतील एकजण म्हणाला. त्या मुलांच्या चेहऱ्यावर पोट भरल्यामुळे तृप्ततेचे एक गोड हसू उमटले होते. ते बघून ती जराशी हसली.
“बरं, पाऊस खूप वाढतोय, सुरक्षित जागी बसा आणि एकमेकांचा हात धरून रहा.” ती ओढणीने आपले डोके झाकत म्हणाली.
“हो दीदी.” एकमेकांचे हात घट्ट पकडत मुलांनी होकारार्थी मान हलवली. ती पण मान तूकवत बस स्टॉपवर जाऊन उभी राहिली.
इकडे श्रेयस पण आपल्या कारमध्ये येऊन बसला. तो पावसाने पूर्ण भिजला होता; मात्र तो भिजला आहे, हे त्याला सुद्धा जाणवत नव्हते. तो गाडी सुरू करून घरी जाणार तोच त्याला पुढे ती बसची वाट बघत उभी दिसली आणि का कोणास ठाऊक त्याची सुरू झालेली गाडी बंद झाली.
“तिला बस मधून जाऊ दे, नंतर आपण निघुया.” उगीच त्याच्या मनाने, ती घरी सुरक्षित पोहचावी, ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असा कौल दिला आणि तो तिथेच थांबला.
सगळीकडे काळोख पसरला होता. रस्त्यांवरिल लाईट नसल्यासारखेच होते. अधूनमधून येणाऱ्या गाड्यांचाच काय तो प्रकाश पसरला होता. इकडेतिकडे बघत त्याची नजर तिच्यावर स्थिरावली. डोळे आणि ओठ तर त्याने आधीच बघितले होते, आता तो तिची हालचाल टिपत होता.
उंच, सडपातळ बांध्याची ती पावसाने पूर्णपणे भिजली होती. कपडे अंगाला चिकटले होते. वारंवार ओढणी डोक्यावरून सावरत अंगाभोवती नीट गुंडाळत, घट्ट पकडून ठेवत होती; जणू सगळ्यांच्या नजरेपासून आपले ओले झालेले अंग लपवत होती. चेहऱ्यावर ओघळणारे पावसाचे पाणी एका हाताने मागे घेत, बसची वाट बघत होती.
किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
किसी का दर्द मिल सके तो ले उधार
किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है….
किसी का दर्द मिल सके तो ले उधार
किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है….
एफ. एम.वर गाणे सुरू होते आणि त्याच्या डोक्यात ती.
तिची बस आली, तसे ती त्यात चढली आणि ती बस निघून गेली.
तिची बस आली, तसे ती त्यात चढली आणि ती बस निघून गेली.
“जिना इसी का नाम है….. परफेक्ट सुट फॉर हर..” तो गुणगुणत होताच की मागून गाड्यांचे हॉर्न ऐकू आले आणि इकडे त्याच्या फोनची घंटी वाजली आणि तो त्याच्या स्वप्नवत जगातून बाहेर आला. त्याने फोन हातात घेऊन बघितले तर व्हॉट्सअँपवर काही मेसेज आले होते.
“ही चारूआत्या पण ना, यावर्षी माझं लग्न आणि पुढल्या वर्षी मला मुल करवूनच दम घेणार दिसतेय.” चारुलताने पाठवलेला मुलीचा बायोडेटा आणि फोटो डाऊनलोड करत वैतागून श्रेयस स्वतःशीच बोलत होता.
तेव्हाच इकडे बैठकीत चारूआत्या आणि रश्मी वहिनीचे व्हॉटसॲप व्हिडिओ कॉलवर बोलणे सुरू होते.
“रश्मी वहिनी, तुम्हाला मुलीचा बायोडेटा आणि फोटो व्हॉटसॲप केला आहे. मुलीने एम बी ए डिस्टांस लर्निग केले आहे आणि एका प्रायव्हेट बँकेत जॉब करते.” चारुलता म्हणाली.
*******
क्रमशः
क्रमशः
©️®️ मेघा अमोल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा