Login

जरा चुकीचे जरा बरोबर भाग १

जरा चुकीचे जर बरोबर
ईरा चॅम्पियन ट्रॉफी 2025
जलद कथालेखन

शीर्षक - जरा चुकीचे जरा बरोबर भाग १

सुयश चे वडील वारल्यानंतर तो नेहमी त्याच्या आईची सरीता ताईंची काळजी करत होता. सरीता ताई गावाला एकट्या राहत होता.

सुयश हा नोकरी निमित्ताने शहरांमध्ये राहत होता .त्याचा स्वतःचा फ्लॅट एका मोठ्या सोसायटीमध्ये होता. तिथे ते तिघ (सुयश ,पत्नी प्रांजल आणि लहानी सृष्टी ) रहात होते.

आज सुयश रात्री घरी आला तेव्हा खूप चिडचिड करत होता. आता जवळपास हे नेहमीच होत.

“ सुयश अरे जरा हळू बोल सृष्टी आताच झोपली आहे . काय झाले आहे एवढी चिडचिड करायला “

प्रांजल थोडी काळजीने विचारत होती.

“ अग आईला किती समजावून सांगितले तरी आई इथे येऊन राहण्यास तयार नाही . “ सुयश वैतागून बोलत होता .

“ तू त्यांना व्यवस्थित समजावून सांगितले का ? तिथे त्या एकट्या राहतात .उगाच आपल्याला काळजी लागून राहते . “
प्रांजल

“ आईचे म्हणणे आहे तुम्ही फ्लॅट मधे राहतात . तिथे दरवाजा बंद करून बसतात .सोबत बोलायला सकाळी चालायला कोणीच नाही .इथे मोकळी जागा ,आपल्या बागेतल्या झाडांभोवती बराच वेळ जातो . शिवाय नातेवाईकांकडे येणं जाणं असते. इथे माझा दिवस कसा निघून जातो समजत नाही. “

सुयश आणि सरिता ताईंच आजच फोनवर बोलण झालेल तो सांगत होता.

हे नेहमीच असल्याने प्रांजलला विशेष काही वाटल नाही..

सुयश आणि सरिता ताई यांच्या वादिमुळे तो घरातही फारस लक्ष देत नव्हता. बाबांच्या गेल्याने आणि सरिता ताई त्यांच्या जवळ राहण्यास येत नसल्याने त्याला अपराधी असल्यासारख वाटत होत.

आपण आपल्या आईकडे व्यवस्थितपणे लक्ष देऊ शकत नाही ही भावना मनाला खात होती . गावाला जाऊन राहिल तर त्याला नोकरीच ठिकाण खूप दूर पडणार होत आणि घरी आल्यावर फार थोडा वेळ तो घरच्यांसाठी देऊ शकणार होता.

या सगळ्यातून कसा मार्ग काढावा हे समजत नव्हत त्यामुळे तो मनातून खचत चालला होता. आणि अर्थातच याचे परिणाम प्रांजल आणि लहान सृष्टीवरही होत होते.

सुयश आणि प्रांजल सुट्टीच्या दिवशी नेहमी गावाला जात होते. गावाला जाताना आईला लागणार सामान नेहमी सोबत घेऊन जात होते .जे जवळपास भेटत नाही ते आँनलाईन प्रांजल मागवून घेत होती . गावाला गेल्यावर सरिता ताई सृष्टीचे खूप लाड करत होत्या .

सोबत येण्यास मात्र त्यांचा नकार होता .

प्रांजल यासगळ्या मधून कसा मार्ग काढेल ?
बघूया पुढील भागात

****