Login

जरा चुकीचे जरा बरोबर भाग २

जरा चुकीचे जरा बरोबर
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
जलद कथालेखन
जरा चुकीचे जरा बरोबर भाग - २

प्रांजल एका दिवशी दुपारी सृष्टी झोपल्यानंतर सहजच गाणे ऐकत होती.

“ जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही “

गाणं ऐकल्यावर सहजच तिच्या मनामध्ये विचार सुरू झाले जर आई तिथे समाधानाने राहत आहे तर आपल्याला आता सुयशला समजवायला पाहिजे . रात्री तिने सुयश घरी आल्यावर त्याच्याशी बोलायच ठरवल.

आज सृष्टी थोडी लवकर झोपली होती त्यामुळे सुयश आणि प्रांजल यांना बोलण्यासाठी निवांत वेळ भेटणार होता.

जेवण झाल्यावर प्रांजल हातांची चुळबुळ करत बसली होती .आपल म्हणण सुयश ला पटत का नाही ? नाहीतर उगाच अबोला धरून बसायचा याच तिला थोड टेन्शन आल होत .

आईच्या विषयावर बोलण खरच कठीण वाटत होत .पण या सर्वातून पुढे जाण्यासाठी बोलण गरजेच होत .

नाण्याच्या दोन बाजू होत्या एक बाजू जर आईना तिथे गावाला राहण्यास आवडत आहे तर आपण त्यांना तिथे प्रेमाने राहू द्यायला पाहिजे नाण्याची दुसरी बाजू होती तुला त्यांना सांभाळायच नाही म्हणून तू अस म्हणते .

सुयश बराच वेळ पासून प्रांजल कडे बघत होता .
तिच मात्र त्याच्याकडे लक्ष नव्हत .

तिच्या चेहऱ्यावर दिसणार टेन्शन बघून आणि हातांची चुळबुळ बघून त्याला एवढ तर नक्की समजल होत की काहीतरी हळवा विषय आज हीला बोलायचा दिसत आहे.

“ प्रांजल कसल एवढ टेन्शन घेतल आहे ? “
प्रांजलला बोलत करण्यासाठी सुयश थोड प्रेमाने बोलत होता.

हे ऐकून प्रांजल ला आता कुठून सुरुवात करावी हे समजत नव्हत.

“ आज काय झाल आहे तुला माझ्याशी बोलताना एवढे टेन्शन का येत आहे ? तू बोल तर खर मला बरोबर वाटत नाही वाटत आपण नंतर बघूया “

प्रांजल बोलत नाही बघून सुयश तिच्या जवळ जाऊन तिच्या हातात हात घेत बोलत होता .


“ ते मला ….

आई विषयी ….

थोड बोलयच ….होत “

अजूनही प्रांजलच्या तोंडातून शब्द निघत नव्हते.

“अग प्रांजल मला तुझ बोलण आवडल नाही तर मी तुला
मारणार आहे का ? दुसर काही करणार आहे का ? मग तू एवढा टेन्शन का घेत आहेस “ सुयश शांत राहून बोलत होता.

‘ हो रे बाबा हो तू मला काही करत नाही पण माझ्याशी बोलण सोडतो तेच माझ्यासाठी फार कठीण होऊन बसत ‘ प्रांजल अजूनही मनामध्येच बोलत होती .

“ आज तुझ मौन व्रत सुटणार आहे का ? “
प्रांजल मनातच विचार करताना बघून सुयश वातावरण थोड हलक करण्यासाठी हसून बोलला.


प्रांजलच मौन व्रत सुटेल का नाही ?

बघूया पुढील भागात

*****