इरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
जलद कथालेखन
जरा चुकीचे जरा बरोबर भाग 3 ( अंतिम भाग )
जलद कथालेखन
जरा चुकीचे जरा बरोबर भाग 3 ( अंतिम भाग )
“ आई गावाला एकट्या राहतात पण जर त्यांच मन तिथे रमत
तर त्यांना तिथे राहू द्यायला पाहिजे आणि काही लागल तर आपण आहोतच . आपण सुट्टी असली की ,सणवार ला जात असतो . का हव ते आपण सर्व बघत जाऊ. शिवाय त्यांच्या मैत्रीणी, आपले नातेवाईक आहेतच .”
प्रांजल एकादमात बोलून जाते आणि शांत बसते .आता मात्र तिला हुरहूर लागते सुशय काय बोलेल त्याची….
“ ठिक आहे मी विचार करतो .” काही विचार करतच सुयश बोलून तिथून उठून जायला लागला.
“ सुयश थांब ना ऐकून तर घे थोड “
प्रांजल थोडी घाबरत हिम्मत करून बोलत होती.
प्रांजल थोडी घाबरत हिम्मत करून बोलत होती.
तसा सुयश तिथे थांबतो .
“ तिथे गावाला आपल खालच घर आहे. शेजारी येत जात असतात ,दिसत असतात वरचे बोलण सुरू असत.
आपली बागही खूप मोठी आहे . तिथे बागेमध्येही आईंचा खूप वेळ जात असतो. मी बघितले आहे बागेमध्ये असताना आई खूप छान आनंदी असतात .आईच्या मेहनतीमुळेच आपली बाग खूप छान आहे. “
“ ठीक आहे आपण उद्या बोलू “
काहीतरी विचार करूनच प्रांजल एवढ बोलली असेल बघून सुयश या विषयावर थोडा विचार करायच ठरवतो आणि तिला उद्या बोलू म्हणून सांगतो .
दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने प्रांजल सरिता ताईंकडे जाण्याची तयारी सुरू होती .
छोट्या सृष्टीला लागणारे वस्तू ,थोडे खेळणे घेत तयारी करत होती .
सरिता ताईंनी सांगितलेल्या काही वस्तू ,औषधी आठवणीने ती बॅगमध्ये भरत होती.
“ मी जगदीश मधून फुलवडी आणि खाकरे आणायला जात आहे . आपल्यासाठी काही आणायच आहे का ? “ सुयश तयारी करत प्रांजलला विचारत होता.
“ थोडे पेढे आणि चिवडा घेऊन या . आज देवीच्या मंदिरात जाऊ तिथे प्रसादाला पेढे नेऊ. “
प्रांजल शांत राहात सांगत होती.
“ ठिक आहे .” म्हणत सुयश बाहेर जातो .
‘ जगदीश मधली फुलवडी आणि खाकरे आईना आवडतात.
रात्रीच बोलण पटलेल वाटत आहे . चला अस झाले तर देव पावेल .‘
रात्रीच बोलण पटलेल वाटत आहे . चला अस झाले तर देव पावेल .‘
प्रांजल मनात विचार करत होती.
सुयश घरी आल्यावर तयारी करून गावाला सरिता ताईकडे गेले.
नेहमी चिडचिड करणारा सुयश असून आनंदी वाटत होता .
थोडा वेळ घरी थांबल्यावर ते सर्व जवळच असलेल्या देवीच्या मंदिरात गेले होते.
सुयश सृष्टीला घेऊन तिथे जवळच असलेल्या तलावाजवळ फिरत होता .
मागे सरिता ताई आणि प्रांजल दोघी बोलत होत्या.
“ काय मग आज स्वारी बऱ्याच दिवसांनी इथे आल्यावर आनंदी दिसत आहे. “
सरिताताई प्रांजल ला विचारत होत्या .
“ पहिले तर मलाही तुमच एकट राहण आवडत नव्हते .थोडा
विचार केल्यावर मलाही तुमच बरोबर वाटल. थोड समजावून बघितल तेव्हा त्यांना थोड बरोबर वाटत आहे. “
प्रांजल सांगत होती
विचार केल्यावर मलाही तुमच बरोबर वाटल. थोड समजावून बघितल तेव्हा त्यांना थोड बरोबर वाटत आहे. “
प्रांजल सांगत होती
“ चला हे एक चांगले झाले .
देवच पावला ….
नाहीतर कधीपासून फोन केल्यावरही नुसती चिडचिडच करत होता आणि त्याला बघून मला टेन्शन येत होत.
चला तर ही छान सुरुवात झाली . “
दोघीच बोलण सुरू होत.
आज खूप दिवसांनी आज खऱ्या अर्थाने देवी आईच दर्शन झाल्यावर सगळे आनंदी होते.
आज खूप दिवसांनी सुयशच्या मनातली अपराधी भावना थोडी फार का होईना कमी झालेली होती .
काही गोष्टी थोड्या चुकीच्या वाटत असल्या तरी त्या कुठेतरी बरोबरही असतातच आणि आपण त्या स्वीकारून पुढे जायला पाहिजे.
******
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा