Login

जरा समजून घे न तिला ही भाग दोन

जरा नाही खूप बदलायला हवा आहे
जरा समजून घेन तिला ही
भाग दोन

भाग दोन

बघआई,” माझे लग्न झाल तेव्हा मी पण अवनी सारखीच होते, त्या वयात मलाही सर्वच कळत होतं असं नाही.”

हो बाई ,मी आले होते तुझ्या घरी तेव्हा मला सारख वाटायचं तू नीट काम करते की नाही ?नाहीतर तुझी सासू म्हणेल हिला काहीच कसं येत नाही !”
हो आई सुरुवातीला मला पण समजत नसे , करावे की नाही करू? पण मग सासूबाईंनी स्वतः विचारलं की मी कुठली कामे करू इच्छिते? मला काय जमेल!”
हो का?
हो आई माझं चुकलं तर त्या बोलायच्या आणि समजावून सांगायच्या पण् एकट्या मध्ये सर्वांसमोर नाही!”

म्हणजे काय?

सुरुवातीलाच लग्न झाल्यावर त्या म्हणाल्या सुषमा पाहुणेआहे तोपर्यंत सात पर्यंत उठून खाली यायचे
पाहुणे गेले त्यानंतर त्या म्हणाल्या आरामात ऊठ झोप पूर्ण करून, तुम्हा मुलींना दुपारी आराम नसतो .

“अग पण त्या लवकर उठतात.”

हो आई ती त्यांची सवय आहे, आणि दुपारी झोपतात, म्हणत होत्या या वयात झोप कमी येते मग पडून राहून अंग दुखायला लागतं .”

हो खरं आहे !

आई अवनी खूप साधी आहे तिला नसेल समजत ,तू हे असे “शालजोडीतले टोमणे मारलेले” तिला लागत असतील पण आपलं काय चुकतंय काय करावे हे नाही उमजत, अशाने तिचा उरला सुरला उत्साही संपेल!

हो पण दरवेळी सांगायची काय गरज? लहान आहे कां? स्वतःच स्वतःला नको का करायला?

बरोबर आहे तुझं म्हणणं, पण इतक्या दिवसात तुझ्या लक्षात आलं ना कि तिला उमजत नाही ,किंवा करायची भीती वाटत असेल तर तू सांग स्वतःहून -. मोकळे पणाने .
मनातल्या मनात कुढत बसण्यापेक्षा बोलाव, त्यांनी गैरसमज दूर होतील ..

पुढे अवनी नौकरी करु लागली तर अजून कमी वेळ ती घरी असेल तेव्हा काय करशील?


पाहते ग जमतं का, माझाही स्वभाव जरा—

जर्रा नाही आई, खूप बदलायला हवा आहे तुला आपला स्वभाव! हे मी माझ्या सासूबाईंना पाहून सांगते !”------
हो बाई कर कौतुक त्यांचं,मी काय आता परकीच ना तुझ्यासाठी?

" तसं नाही ग मम्मूडी माझी, म्हणत सुषमाने गळ्यात पडून आईच्या गालावर किस करत "तरी मला आवडते ग तूच..."

पुरे- पुरे --चला आता जेवायला म्हणून सुगंधाताई हात धुवायला गेल्या.

आज रविवार असल्याने आशिष ला सुट्टी आहे पाहून नाश्ता ,आरामात गप्पा मारत पार पडला.
त्या नंतर आशीष ला काॅफी प्यायची इच्छा झाली
" अवनी करतेस तू?"
अवनी ने आई कडे पहात करू विचारले?
"अग कर बिंधास्त यात काय विचारायचे" सुषमा म्हणाली.
काॅफी खूप च मस्त बनली होती
छान केली हो“सर्वानी तारीफ केली.


दोन दिवसांनी सुषमा परत जाणार म्हणून त्यांनी बाजारात जायचं नक्की केलं .संध्याकाळी यायला उशीर होणार स्वयंपाकाचे काय करावे?

निघताना, “अवनी– आम्हाला यायला उशीर झाला तर भाजी कर व कणिक भिजवून ठेव , आल्यावर गरम पोळ्या करू.”सुगंधाताई म्हणाल्या..

‘भाजी कोणती करू?’

तू ठरव, तुला जी आवडेल ती कर ,तुझ्या स्टाईल ची” म्हणत त्या सुषमाकडे पाहत हसल्या.

घरी परतल्या तो भाजीचा मस्त वास घरभर दरवळत होता नी टेबलावर सर्व जेवण तयार होतं.

अग बाई तू सर्व केलं? “


काय काय खरेदी झाली बॅगा अगदी भरलेल्या दिसतात आहे?दाखवा कि —आशिषम्हणाला.
सुषमा ने कौतुकाने सर्व खरेदी दाखवली .हा एक सूटपीस अवनी तुला,
अय्या माझ्या आवडीचा रंग,ताई तुम्हाला —
अग आई ने पसंत केला. .
जेवायचं आहे का? कि हे पाहूनच तुमचं पोट भरलं,मला मात्र खूप भूक लागली आहे.आशिष म्हणाला.
थांब पोळ्या –
झाल्या.
अग बाई तू पोळ्या पण?
वाह मस्त झाली भाजी, तोंडात घास घेताच सर्व बोलले.
पोळ्या मला तितक्या नाही जमत अवनी लाजत म्हणाली
रोज थोड्या कर येतील.सुषमा म्हणाली.
करू आई मी चालेल? अवनी ने विचारले.
हो –”माझी गुणाची ग “म्हणत त्यांनी अवनीला जवळ घेतल, तशी मी पण--- म्हणत सुषमाही दोघींमध्ये शिरली.
हो बाई तू तर आहेस च - म्हणत सुगंधा बाईंनी तिलाही जवळ घेतल…