जरा विसावू या वळणावर..... भाग 2
मागच्या भागात आपण वाचले अभिजीत मुलगी बघण्यासाठी तयार झाला होता आता पुढे.....
"अभी लक्षात आहे ना उद्या आपल्याला मामाकडे जायचे आहे.
"मामाकडे कशासाठी? आपल्याला तर मुलगी बघायला जायचे होते ना." वनिता ताईं कडे प्रश्नार्थक नजरेने बघत अभी ने विचारले.
"अरे हो मामांच्या शेजारीच राहते ती."
वनिता ताईंनी उत्तर दिले.
वनिता ताईंनी उत्तर दिले.
"अरेच्या म्हणजे जर लग्न झाले तर प्रत्येक वेळेस सासरवाडीला गेल्यावर मामांचे दर्शन घेऊनच यावे लागेल." अभिजीत हसून म्हणाला.
"तु ना अभी कधी सुधारणार नाही.
एवढे मामा -मामी तुझ्यासाठी जीव ओततात आणि तू असं बोलतोस."
वनिता ताई जरा रागातच म्हणाल्या.
एवढे मामा -मामी तुझ्यासाठी जीव ओततात आणि तू असं बोलतोस."
वनिता ताई जरा रागातच म्हणाल्या.
"चेष्टा केली ग आई."
"बरं उद्याची काय तयारी."....वनिताताई.
"तयारी म्हणजे काय ?परीक्षा घेणार आहे का मुलगी माझी."
"अभी चेष्टा पुरे. मुलगी पसंत पडली तर लगेच सुपारी फोडू म्हणजे मामा असं म्हणत होता."
"आई घाई नको. मुलगी बघायला येतोय ना मी नंतर ठरवू ना बाकीचे."
"बर मग तसं सांगते मामाला."
*******
दुसऱ्या दिवशी वनिताताई आणि अभिजीत मुलगी बघण्यासाठी गेले.
"ओळख करून देतो....
ही माझी बहीण वनिता आणि तिचा मुलगा अभिजीत."
दुसऱ्या दिवशी वनिताताई आणि अभिजीत मुलगी बघण्यासाठी गेले.
"ओळख करून देतो....
ही माझी बहीण वनिता आणि तिचा मुलगा अभिजीत."
" चांगल्या मोठ्या कंपनीत जॉबला आहे हो आमचे अभिजीत ".....मामी मध्येच म्हणाल्या.
हे एकूण अभिजीतला कसेतरी झाले.
"आणि अभिजीत हे मिस्टर अँड मिसेस पाटील अनुराधाचे आई - वडील,हा तिचा मोठा भाऊ अंकित आणि ह्या वहिनी."
मामांनी सर्वांचे ओळख करून दिली.
मामांनी सर्वांचे ओळख करून दिली.
प्रार्थमिक चर्चा झाल्यावर अनुराधाची वहिनी तिला घेऊन आली.
वनिता ताईंना तर अनुराधा पाहिल्याबरोबर आवडली होती.ते त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते.त्यांनी अभिजीत कडे नजर वळवली अभिजीतही अनुकडे एकटक बघत होता.
वनिता ताईंना तर अनुराधा पाहिल्याबरोबर आवडली होती.ते त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते.त्यांनी अभिजीत कडे नजर वळवली अभिजीतही अनुकडे एकटक बघत होता.
"तुम्हाला काही विचारायचे असेल तर विचारा" या अनुच्या वडिलांच्या बोलण्याने अभिजीत भानावर आला.
वनिता ताईंनी शिक्षण जॉब असे काही बेसिक प्रश्न विचारून पुढची जबाबदारी अभिजीत कडे सोपवली.
"मला काही नाही विचारायचे?" अभिजीत म्हणाला.
"अरे आत्ताच विचारून घे परत नंतर एकेक शंका काढशील."मामा हसत म्हणाले.
"एक काम करू, आपण सगळेजण बाहेर गार्डन मध्ये बसू तोपर्यंत हे दोघे बोलून घेतील एकमेकांशी."
अनुची वहिनी म्हणाली.
अनुची वहिनी म्हणाली.
"चालेल,असेही आपल्यासमोर त्यांना अवघडल्यासारखे होईल" वनिताताई म्हणाल्या.
यावर सगळ्यांचे एकमत झाले आणि सर्वजण बाहेर गेले.
आता रूम मध्ये अभिजीत आणि अनुराधा दोघेच होते.
दोघेही एक दोन मिनिट शांत बसले होते. कोणी आणि काय बोलून सुरुवात करायची हे दोघांनाही समजत नव्हते.
दोघेही एक दोन मिनिट शांत बसले होते. कोणी आणि काय बोलून सुरुवात करायची हे दोघांनाही समजत नव्हते.
शेवटी "मला तुम्ही आवडलात. मी लग्नाला तयार आहे तुम्हाला काही विचारायचे असेल तर विचारा." असे एकदम अभिजीत बोलून मोकळा झाला.
यावर अनुला थोडे हसू आले.
"नाही मलाही काही विचारायचे नाही."
एवढे बोलून ती शांत बसली.
एवढे बोलून ती शांत बसली.
आपण तर हो म्हणालो पण अनुचा निर्णय काय आहे हे जाणून घेण्यासाठी अभिजीतला घाई झाली होती म्हणून तो म्हणाला...
"तुम्ही तुमचा निर्णय सावकाश कळवला तरी हरकत नाही."
यानंतर दोघांचेही नजरेला नजर मिळाली आणि दोघेही हसले.
यानंतर दोघांचेही नजरेला नजर मिळाली आणि दोघेही हसले.
यामुळे अभिजीतला थोडेसे मोकळे वाटले तो पुढे म्हणाला..
"आमच्या घरात मी आणि आई आम्ही दोघेच असतो. बाबा मी कॉलेजला असतानाच गेले. तुम्ही माझ्या आयुष्यात आला तर माझे आयुष्य आनंदाने भरून जाईल."
अभिजीत अनुच्या डोळ्यात बघत म्हणाला.
"आमच्या घरात मी आणि आई आम्ही दोघेच असतो. बाबा मी कॉलेजला असतानाच गेले. तुम्ही माझ्या आयुष्यात आला तर माझे आयुष्य आनंदाने भरून जाईल."
अभिजीत अनुच्या डोळ्यात बघत म्हणाला.
अनुचे डोळे बोलके होते तिच्या डोळ्यातून त्याला होकार जाणवत होता पण तोच तिच्या ओठातून समजला म्हणजे लग्नावर शिक्का मोर्तब होईल असे त्याला वाटत होते. त्यामुळे तो तिच्याकडे उत्तराच्या अपेक्षेने बघत होता.
त्याची ही प्रतीक्षा संपली आणि अनु आपल्या नाजूक आवाजात म्हणाली
"मला ही आवडेल तुमच्या या आयुष्याचा भाग व्हायला."
हे एकूण अभिजीतच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
"मला ही आवडेल तुमच्या या आयुष्याचा भाग व्हायला."
हे एकूण अभिजीतच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
सकाळी आईला सुपारीसाठी हो म्हणालो असतो तर बरं झालं असतं असा विचारही त्याच्या डोक्यात चमकून गेला.
दोघांनीही आपला निर्णय बाकीच्यांना सांगितला. दोघांचाही होकार आहे म्हटल्यावर मामा त्यांच्या कर्तव्यापासून थोडीच दूर सरकणार होते. जरी ताई नको म्हणाली असली तरी मामाने आपली जबाबदारी चोख पार पाडली.
"तुमची काही हरकत नसेल तर आत्ताच आपण सुपारी फोडून घेऊ". मामा अनु च्या बाबांना म्हणाला.
अनुराधाच्या बाबांनी आणि भावाने चर्चा करून लगेच त्याला संमती दर्शवली.
दोन्ही बाजूंच्या लोकांनी लगेचच तयारी करून अभिजीत आणि अनुराधा च्या लग्नाची सुपारी फोडली.
वनिता ताईंचा आनंद तर गगनात मावत नव्हता आणि सकाळी लगेच होकार द्यायला नको यावर ठाम असणारा अभिजीत मात्र मामा मुळे लगेच सुपारी फुटली याबद्दल मनातल्या मनात मामांचे आभार मानत होता.

घरी निघताना अभिजीत अनुचा फोन नंबर घ्यायला विसरला नाही. परत एकदा भेटून बोलू असेही अभिजीतने संधी बघून अनुला सांगितले.
अभिजीत आणि अनुराधा त्या दिवशी रात्री आपल्या येणाऱ्या आयुष्य रंगवण्यात कडून गेले होते.
अभिजीत आणि अनुराधा त्या दिवशी रात्री आपल्या येणाऱ्या आयुष्य रंगवण्यात कडून गेले होते.
*******
दोन-तीन दिवसांनी अभिजीतने अनुला फोन करून भेटण्यासाठी एका गार्डनमध्ये बोलवले होते.
अभिजीत अणुच्या आधी गार्डन मध्ये पोहोचला होता. बँकेतले आपले काम आटपून अनुही निघणार तोच साने मॅडमनी तिला विचारले
दोन-तीन दिवसांनी अभिजीतने अनुला फोन करून भेटण्यासाठी एका गार्डनमध्ये बोलवले होते.
अभिजीत अणुच्या आधी गार्डन मध्ये पोहोचला होता. बँकेतले आपले काम आटपून अनुही निघणार तोच साने मॅडमनी तिला विचारले
"काय आज लवकर निघालीस? कशाची एवढी घाई? बाहेर जायचे आहे का कुठे?"
"हो ते माझं जरा काम होतं."
अनुने अडखळतच उत्तर दिल.
अनुने अडखळतच उत्तर दिल.
"अग आम्हाला वाटलं तुमच्याकडून बातमी समजेल पण तुम्ही तर काही सांगत नाहीत तर आम्हीच विचारतो मिस्टर गिरी म्हणाले..
"काय ते?"
"अहो लग्न जमलं ना तुमचं.खरं आहे का"
"हो ....ते मी तारीख फिक्स झाली की सांगणारच होते."
बँकेतील सहकाऱ्यांचे प्रश्न काही संपत नव्हते. आणि अनुला तर निघण्याची घाई झाली होती. पहिल्यांदाच अभिजीतला भेटायला जायचे आहे आणि एवढा उशीर तिचे सगळे लक्ष घड्याळाकडे जात होते.
शेवटी "मला उशीर होतय आपण उद्या बोलु "असे म्हणून तिने तिथून काढता पाय घेतला.
शेवटी "मला उशीर होतय आपण उद्या बोलु "असे म्हणून तिने तिथून काढता पाय घेतला.
इकडे अभिजीत वाट बघत बसला होता अनुराधा गार्डन मध्ये पोहोचली.अभिजीतला पाहून म्हणाली
"सॉरी मला जरा यायला उशीर झाला?"
"काहीच हरकत नाही मी पण थोड्या वेळापूर्वीच आलो आहे."
"या ना बसा"
तिथे असणाऱ्या बँच कडे हात करत अभिजीत म्हणाला.
"या ना बसा"
तिथे असणाऱ्या बँच कडे हात करत अभिजीत म्हणाला.
अनु आणि अभिजीत एका बेंचवर शेजारी बसले.
"कशासाठी बोलावले मला इथे काय बोलायचं होतं?" अनुने काहीतरी बोलायला सुरुवात करायची म्हणून विचारले.
"ते म्हटलं लग्नाची तारीख फिक्स करून टाकू"
अभिजीत हे उत्तर ऐकून दोघेही एकमेकांकडे बघून हसले.
अभिजीत हे उत्तर ऐकून दोघेही एकमेकांकडे बघून हसले.
"तुमचा विनोदी स्वभाव आवडला मला."
अनु हसत म्हणाली.
अनु हसत म्हणाली.
"चला म्हणजे काहीतरी तर आवडले तुम्हाला."
"या ड्रेस मध्ये तुम्ही छान दिसताय"......
अभिजीतच्या या बोलण्यावर प्रश्नार्थक नजरेने बघून अनु म्हणाली
अभिजीतच्या या बोलण्यावर प्रश्नार्थक नजरेने बघून अनु म्हणाली
"फॉर्मलिटी म्हणून बोलू नका. एक तर दिवसभर बँकेत काम करून मी तशीच इकडे आली आहे त्यामुळे मी किती छान दिसते आणि माझा ड्रेस कसा आहे ना ते मला माहित आहे.उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नका."
"ठीक आहे. मला वाटले मुलींना असे भेटल्यावर तू छान दिसतेस असे म्हटलेले आवडते म्हणून म्हणालो.
"पुरे".....अनु
"ओके ओके ...आता खरंच मलाही तुमचा स्पष्टवक्ता स्वभाव आवडला. फॉरमॅलिटी नाही खरंच.
त्यानंतर दोघांनीही एक दोन तास छान गप्पा मारल्या. आपल्या नवीन सुरू होणाऱ्या सुखी संसाराची स्वप्ने रंगविली .त्या दिवशी दोघांचीही पक्की खात्री पटली की आपण निवडलेला जोडीदार एकदम योग्य आहे.
********
क्रमशः
*********
अभी आणि अनुने बघितलेले सुखी संसाराची स्वप्न कशी पूर्ण होतात वाचू पुढच्या भागात.....