जरा विसावू या वळणावर ....भाग 3
मागच्या भागात आपण वाचले अभी आणि अनु आपल्या सुरु होणाऱ्या सुखी संसाराची स्वप्न रंगवतात आता पुढे....
"ताई ,दोन महिन्यानंतर ची तारीख चांगली आहे आत्ताच गुरुजींशी बोललो."
मामा वनिता ताईंना फोनवर म्हणाला.
मामा वनिता ताईंना फोनवर म्हणाला.
"बर चालेल पण अनुराधाच्या घरच्यांना विचारले का?"
"हो विचारले ....त्यांनाही चालेल."
"ठीक आहे."...... वनिताताई
"साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी करू असं अनुच्या घरच्यांचं म्हणणं आहे. अभिजीतशी बोलून तुझा निर्णय कळव."
"अरे ठीक आहे.अभिला काय विचारायचे त्यात चालेल सांग त्यांना."
एवढं बोलणं झाल्यावर मामांनी फोन ठेवला.
"अभी मामांचा फोन आला होता. दोन महिन्यानंतर ची तारीख धरतोय आणि साखरपुडा त्याच दिवशी करू. तुला चालेल ना."
वनिताताई अभिला म्हणाल्या
वनिताताई अभिला म्हणाल्या
"तू म्हणशील तसे आई."
"बरं आता तयारीला लागावं लागेल दोन महिने असे पटापट जातील. वेळेवर कुठल्या गोष्टीची घाई नको."
वनिताताई आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीला लागल्या.
वनिताताई आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीला लागल्या.
******
दोन महिन्यानंतर लग्नाचा दिवस...
दोन्ही बाजूंची लग्नाची गडबड चालू होती. आधी साखरपुडा मग हळद आणि मग लग्न. एका मागून एक कार्यक्रम छान पार पडत होता.
मरून कलरच्या पूर्ण वर्क असलेल्या शालू मध्ये अनु खुलून दिसत होती. तर सोनेरी वर्क असलेल्या मोती कलरच्या शेरवानीत अभिजीत रुबाबदार दिसत होता.
आपल्या मुलाला नवरदेवाच्या रूपात पाहण्याचे वनिता ताईंचे स्वप्न पूर्ण होत होते. या क्षणी अभिजीतच्या बाबांच्या आठवणींनी त्यांचे डोळे पाणावले. आपले अश्रू त्यांनी डोळ्यातच अडवले. अभिजीत आणि अनुचे लग्न आता थाटामाटात पार पडले.
अनुने आपल्या घरच्यांना निरोप देताना डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तर अभीच्या घरी पोहोचल्यावर त्याच डोळ्यांमध्ये असंख्य स्वप्न, नव्या आयुष्याच्या सुरुवातीचा आनंदाने डोळे गच्च भरून ठेवले.
वनिता ताईंनी आपल्या लाडक्या सुनेचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. अनु माप ओलांडून आत आली.

*****
लग्नानंतर पूजेचे सगळे कार्यक्रम आटोपल्यावर आलेले सगळे पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेले. अभी आणि अनुच्या ऑफिसच्या सुट्ट्या संपायला अजून थोडा वेळ होता .अनुच्या भावाने लग्नाचे गिफ्ट म्हणून दोघांचे गोव्याचे तिकीट बुक करून ठेवले होते.
दोन-तीन दिवसांसाठी अभि अन् अनु गोव्याला फिरायला गेले होते.
दोन-तीन दिवसांसाठी अभि अन् अनु गोव्याला फिरायला गेले होते.
"अभी माझ्या आयुष्यातील हे दिवस मी कधीच विसरणार नाही."
संध्याकाळच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावरून सनसेट बघत अनु म्हणाली.
संध्याकाळच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावरून सनसेट बघत अनु म्हणाली.
"मी सुद्धा."... अभी
"अभी किती छान संध्याकाळी आहे ना ही. असे वाटते आहे की दूरवर पसरणारे समुद्राचे पाणी त्या सूर्याला पूर्णपणे आपल्यामध्ये सामावून घेत आहे. सूर्यानेही किती छान रंग पसरवलेत आपले आणि आकाश या मिलनाने लाल रंगाची जणू उधळण करत आहे."
" अनु .. ठरलं तर मग या मावळणाऱ्या सूर्याला साक्षी धरून आपण ठरुवू की आजपासून आपल्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण आपण आनंदाने एकमेकांच्या साथीने भरभरून जगायचा.या आयुष्याचा पूर्ण आनंद घ्यायचा.कितीही बिझी झालो तरी आपल्या दोघांसाठी वेळ काढायचा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दरवर्षी छान बाहेर फिरून यायचे ज्यामुळे रोजचे आयुष्य कंटाळवाणे होणार नाही."
" मस्तच ....मलाही फिरायला खूप आवडते. त्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकायला ही मिळतात."
" मग ... प्रॉमिस..."
" प्रॉमिस".....अनु
मावळणाऱ्या सूर्याच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस करून ते घरी परतले.
********
"अभी दोन दिवस मी आईकडे थांबणार आहे पण परत इकडे आल्यावर मी रिक्षाने जाणार नाही हां ऑफिसला तुला सोडावे लागेल."
" जो हुकूम बायको!
आता असं वाटायला लागले की माझं लग्न झालंय.
सरले की काय नव्याचे नऊ दिवस."
आता असं वाटायला लागले की माझं लग्न झालंय.
सरले की काय नव्याचे नऊ दिवस."
"गप्प बस रे चल आता लवकर उशीर होतोय. आई पण कंटाळले असतील मामाकडे."
"ती कशाला कंटाळेल. माहेरपण उपभोगत असेल छान. असेही माझ्या एकट्याचे जेवणाचे हाल नको व्हायला म्हणून तिला मामाकडे कधी राहायला जमत नव्हतं. तिच्यासाठी तर हे दोन-तीन दिवस सगळ्यात आनंदाचे असतील."
****
दोघेही अनुच्या माहेरी पोहोचले. तिथला पाहुणचार घेऊन अभिजीत वनिता ताईंना घेऊन घरी आला.
दोघांचेही ऑफिस आता सुरू झाले होते. दोन दिवस अनु माहेरांहूनच ऑफिसला जात होती. माहेरचं सुख उपभोगून अनु सासरी आली आणि वनिता ताईंनी आपली सगळी जबाबदारी अनु वर सोपवली.

"अनु आता मला या जबाबदारीतून मोकळं व्हायचंय इथून पुढे घरात काय हवं नको ते तूच बघ तुझ्या पद्धतीने. काही लागलं सवरलं तर मी आहेच पण आता सगळे निर्णय तूच घे."
त्यांच्या या बोलन्यामुळे अनुला थोडे अवघडल्यासारखे झाले आणि ती म्हणाली
"पण आई असं का लगेच."
"पण आई असं का लगेच."
"अग मलाच आता थोडा आराम हवा आहे म्हणून डोक्याला ताप देणारे काम तू कर आणि बाकीचं घर काम मी करेल."
"बघा हा सासू सुना जुळवून घ्या उगाच माझं मधी....."
अभी आपल्या मिश्किलशैलीत म्हणाला.
अभी आपल्या मिश्किलशैलीत म्हणाला.
"झाल ....बोललास तू काळजी करू नकोस, आमच्यात नाही होणार भांडण."
अनुनही वनिता ताईंच्या या बोलण्यावर मान डोलावली.
आता खऱ्या अर्थाने अभी - अणुच्या वैवाहिक
आयुष्याला सुरुवात झाली होती.
आयुष्याला सुरुवात झाली होती.
*********
पाहूया पुढे कसे वळण घेईल यांचे आयुष्य.....
*****
क्रमशः
पाहूया पुढे कसे वळण घेईल यांचे आयुष्य.....
*****
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा