जरा विसावू या वळणावर भाग- 6
मागच्या भागात आपण वाचले अभि अनुला स्वतः साठी ही वेळ काढायला सांगतो.अनुने मात्र स्वतः ला कामात पूर्ण गुरफटून घेतले होते. आता पुढे....
"अनु चल ना ....दोनच दिवसांचा तर प्रश्न आहे. तू असलीस की अजून मज्जा येईल."
प्रिया ,अनु ची मैत्रीण तिला पिकनिक ला येण्यासाठी आग्रह करत होती.
"नको ग प्रिया...आत्ता नको.चार महिन्यानंतर अभि येईल त्यानंतर परत जाऊ आपण. यावेळेस तुम्ही जाऊन या.मस्त एन्जॉय करा."
एवढं बोलून अनुने फोन ठेवला.
आणि स्वतः च मनात विचार करू लागली
आणि स्वतः च मनात विचार करू लागली
" आत्ता कुठे जायचं.विनाकारण तिकडे जाऊन मुलाचं टेन्शन. आईनाही सगळं काम करायला जमत नाही. फिरायला काय नंतरही जाता येईल."
स्वतः ची समजूत काढून अनु तिच्या कामाला लागली.
दिवसामागून दिवस उलटले. दोन वर्षानंतर अभि घरी
येणार होता.सगळेच तो येणार म्हणून आनंदात होते.
येणार होता.सगळेच तो येणार म्हणून आनंदात होते.
वनिता ताईंची प्रतीक्षा संपली. दोन वर्षानंतर आपल्या मुलाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. अमित आणि मयुरी आपले पार्सल बघण्यात मग्न झाले. अभि ला बघून अनुला आता खूप रिलॅक्स वाटत होते. त्याला बघून मनोमन ती सुखावली होती. अभि ही घरी आल्याने खुश होता. दोन - तीन दिवस सगळ्यांशी गप्पा मारण्याचा दोन वर्षाचा कोटा त्याने पूर्ण केला आणि तिसऱ्या दिवसापासून आपल्या कामावर रुजू झाला.
तो आल्यावर ठरल्याप्रमाणे वानिताताईंच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले. पाहुणेरावळ्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. आल्यापासून त्याला अनुशी खूप काही बोलायचे होते पण अनु मात्र निवांत वेळ मिळत नव्हता.
तो आल्यावर ठरल्याप्रमाणे वानिताताईंच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले. पाहुणेरावळ्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. आल्यापासून त्याला अनुशी खूप काही बोलायचे होते पण अनु मात्र निवांत वेळ मिळत नव्हता.
" अभि अरे बरेच दिवसांपासून माझ्या डोक्यात विचार चालू आहे पण तुझ्याशी बोलायचे राहूनच जाते".
झोपण्याच्या तयारीत असणाऱ्या अभि ला अनु म्हणाली.
यावर तिच्याकडे आश्चर्याने बघत
"अरे वा ! चला तुला माझ्याशी बोलायला तर वेळ मिळाला."
" काय रे अभि "
"बोल ना काय बोलायचे होते तुला."
" अभि, आपल्याला आता मोठं घर घ्यायला हवं. बघ ना मुलं आता मोठे झालेत. मयु लाही आता तिची स्वतंत्र रूम पाहिजे आणि मलाही वाटतंय की, आपलं छान बैठ्ठ घर असावं.समोर मस्त गार्डन, त्यामध्ये वेगवेगळ्या फुलांची झाडं, एका साईड ला छान चौपाळा नाहीतर झुला.किती छान वाटेल त्यावर बसायला.तिथे बसले की सगळा थकवा निघून जाईल.हो ना.तुला काय वाटते."
" हो बरोबर आहे तुझे, तिथे बसले की सगळा थकवा निघून जाईन पण तिथे तू खरंच बसणार का. नाही म्हणजे तुला वेळ मिळेल का बसायला."
अभि च्या बोलण्याचा रोख अनु ला समजला होता.त्याच्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली.
" अभि, मी माझं स्वप्न सांगितलं. बाकी तुझी इच्छा, नको असेल तर राहू इथेच."
अनु च्या आवाजातील उत्साह मावळला होता.
तिच्या चेहऱ्यावरची नाराजी लक्षात घेऊन अभि म्हणाला
" अनु किती दिवसांनी तू इथे बसून अस उत्साहात माझ्याशी बोलतेय कळतंय का तुला."
"अभि, ...मी घराविषयी बोलतेय."
"घेऊ....तू मला काही सांगितले आणि मी त्याला नाही म्हणालो अस कधी झालंय का?"
"खरचं?" अनु आनंदाने म्हणाली.
"हो ...उद्या पासूनच जागा शोधायला सुरुवात करतो. नाहीतर असे करायचे का, माझ्या ऑफिसच्या जवळच एक बंगल्याची स्कीम चालू आहे तिथे एकदा बघून यायचे का ? "
"हो ... चालेल. उद्याच जाऊ"
अनु च्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलेले पाहून अभिलाही आनंद झाला.
*******
दुसऱ्या दिवशी अनु - अभि घर बघून आले .त्यांना आवडलेला बंगला त्यांनी फायनल केला.पैशांची जुळवाजुळव करून दोन - तीन वर्षात ते त्यांच्या बंगल्यात राहायला गेले.मधल्या काळात काही चांगले तर काही वाईट असे बरेच प्रसंग त्यांच्या जीवनात घडून गेले. वनिता ताई आता थकल्या होत्या.त्यांचा बराच वेळ त्या देवघरात जप करण्यात घालवत होत्या.अमितने इंजिनियरिंग पूर्ण करून एका कंपनीत जॉब ही मिळवला होता. मयुरी एम. बी. बी. एस. च्या शेवटच्या वर्षाला होती.

अनुला आपल्या दोन्ही मुलांचा खूप अभिमान होता.
अनु च्या म्हण्यानुसार अभि ने गार्डन मध्ये एक चौपाळा ही ठेवला होता.
अनु च्या म्हण्यानुसार अभि ने गार्डन मध्ये एक चौपाळा ही ठेवला होता.
एका संध्याकाळी अभि तिथे निवांत बसला होता.
पण तिथे राहिल्या गेल्यापासून अजून पर्यंत एकही दिवसही अनु त्याला निवांत चौपाळावर बसलेली दिसली नव्हती. हे आठवून त्याला हसू आले आणि त्याने लगेचच अनुला आवाज दिला....
"अनु, अनु ये ना इकडे"
पण तिथे राहिल्या गेल्यापासून अजून पर्यंत एकही दिवसही अनु त्याला निवांत चौपाळावर बसलेली दिसली नव्हती. हे आठवून त्याला हसू आले आणि त्याने लगेचच अनुला आवाज दिला....
"अनु, अनु ये ना इकडे"
"काय रे काय पाहिजे आहे तुला."
"अग ये ना थोडावेळ इथे बसू निवांत गप्पा मारत."
"आत्ता .. आत्ता गप्पा मारायला वेळ नाही रे.अमित चा फोन आला होता, तो त्याच्या मित्रांना घरी जेवायला घेऊन येतोय."
"अग ऐक तरी किती छान गाणं चालू आहे.
"कोणतं गाणं? मला नाही येत ऐकायला." असे म्हणून अनु आत गेली.
" शांत बसून ऐकलंस तर येईन ऐकायला." अभि स्वतःशीच म्हणाला.
*********
एकीकडे अभि आयुष्यात निवांत पणा शोधत होता तर दुसरीकडे अनु ला आपल्या लाडक्या चिरंजीवांच्या लग्नाचे वेध लागले होते.तिने अभिजीत कडे अमितच्या लग्नाचा विषय काढला.
" अभि अमित आता जॉब मध्ये चांगला सेटल झाला आहे . आता त्याच्या लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे."
" नको ग इतक्यात. त्याच्याजवळ तर लग्नाचा विषय पण काढू नकोस."
" नको ग इतक्यात. त्याच्याजवळ तर लग्नाचा विषय पण काढू नकोस."
" अरे पण लग्नं वेळेत झाले म्हणजे बरे ना."
" अग हे आजकालचे मुलं आपल्यासारखे आहेत का. त्याने मुलगी पाहून ठेवली असली म्हणजे."
"अरे मग त्याला आवडणारी मुलगी बघायला जाऊ आपण."
ती पुढे म्हणाली
"तू म्हणतोस पण मला नाही वाटत अमितने मुलगी बघून ठेवली असेल.नाहीतर तो एकदा तरी मला म्हणाला असता.ठीक आहे मला नाही तर कमीतकमी तुमच्या चिमणीला तरी याची कुणकुण लागली असती ना."
"तू म्हणतोस पण मला नाही वाटत अमितने मुलगी बघून ठेवली असेल.नाहीतर तो एकदा तरी मला म्हणाला असता.ठीक आहे मला नाही तर कमीतकमी तुमच्या चिमणीला तरी याची कुणकुण लागली असती ना."
"कसली कुणकुण?"
शेवटचे वाक्य कानावर पडलेल्या मयुरी ने बाबांजवळ येत विचारले.
"काय ग झाला का अभ्यास?"...... अनु
"काय ग झाला का अभ्यास?"...... अनु
" हो झाला. खूप कंटाळा आला आहे.आई कॉफी दे ना प्लिज"
"हो ...हो देते. अभि तू ही घेणार का?"
"हो ..चालेल"
तेवढ्यात दारावरची बेल वाजली
मयुरी ने दार उघडले
समोरचे दृश्य पाहून थोडावेळ मयुरी स्तब्ध झाली. दुसऱ्याच क्षणी ती मोठ्याने म्हणाली
मयुरी ने दार उघडले
समोरचे दृश्य पाहून थोडावेळ मयुरी स्तब्ध झाली. दुसऱ्याच क्षणी ती मोठ्याने म्हणाली
दादू तू ....आई , बाबा...
"दादू तू लग्न केलं?"
मयुरीचे हे शब्द आत बसलेल्या अभि आणि अनु च्या कानावर पडले. त्यांनी दरवाज्याच्या दिशेने धाव घेतली.
क्रमशः
*********
अचानक समोर आलेल्या या प्रसंगावर अभि -अनुची काय रिएक्शन असेल वाचू पुढील भागात.
*********
अचानक समोर आलेल्या या प्रसंगावर अभि -अनुची काय रिएक्शन असेल वाचू पुढील भागात.