Login

जाऊबाईंचा थाट. भाग - २

जाऊबाई दुसरी बहिणच असते.
जाऊबाईंचा थाट. भाग - २

दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक वेगळीच गडबड सुरू होती. दिपाला दिवस गेले आहेत ही बातमी  आता शेजारी पाजारी असलेल्यांना पण समजली. दिपाच्या माहेरी ही ही बातमी सांगायची होती. मग यमुनाबाईंनी ठरवलं. "ही गोड बातमी आपल्या तोंडून किंवा दिपाच्या तोंडून नाही तर ती  भारतीच्या तोंडूनच त्यांना कळायला हवी. शेवटी पहिल्यांदा तिलाच संशय आला होता." हा विचार करून त्यांनीच भारतीला दिपाच्या आईला फोन करायला सांगितले. भारतीनेही आनंदाने हसत हसत फोन केला आणि ही बातमी त्यांना सांगितली.

दिपाला तीन महिने पुर्ण झाल्यावर तिची चोर ओटी भरायची होती पण त्यावेळी भारती उगाचच नटूनथटून बसली होती. छान काठापदराची साडी नेसली होती आणि केसात गजरा माळला होता. दिपालाही तिने छान तयार केलं होतं. भारती तयार होऊन बाहेर आली तसं त्यांच्या शेजारी राहत असलेल्या शांता काकू तिथे आल्या आणि भारतीला एवढं तयार झालेलं बघून विचारू लागल्या.

"काय गं, एवढा नट्टापट्टा करून कुठे चालली आहे तू?" त्यांनी विचारल्यावर भारती हसून त्यांच्याकडे बघू लागली.

"काकू sss आमच्या दिपाला दिवस गेलेत! तिची चोर ओटी भरायची आहे म्हणून हा नट्टापट्टा केलाय." भारतीचा उत्साह बघून त्या ही हसू लागल्या.

"अरे व्वा... किती छान! पण बरं झालं तू सांगितलंस. नाहीतर यमुनाबाईंच्या तोंडून आम्हाला कधीच हे कळलं नसतं." शांता काकुंच बोलणं ऐकून भारतीचा थाट अजूनच वाढला.

"हो ना काकू, मला माझ्या दिपाची काळजी आहे म्हणूनच मी लगेच तुम्हाला सांगितलं." भारती पण हसत हसत म्हणाली आणि परत आत येऊन चोर ओटीची सगळी तयारी तिने केली.

दिपाचे आई बाबा पण चोर ओटीसाठी घरी आले. त्यांनी मिठाई आणि फळंही आणली होती. दिपा आपल्या आई बाबांना भेटली. नंतर चोर ओटी भरायला बसली. यमुनाबाई तिच्या मागे उभ्या होत्या, पण भारती मात्र सगळं काही एकटीच करत होती आणि थाटात मिरवत होती.

भारतीचा उत्साह बघून दिपा मनोमन खूष होती. भारतीचा आनंद बघून तिला पण बरं वाटत होतं. दिपाच्या चोर ओटीचा कार्यक्रम अतिशय आनंदात साजरा झाला.

तीन महिने पुर्ण झाल्यावर डाॅक्परांनी दिपाची नीट काळजी घ्यायला सांगितली होती. त्यामुळे भारती पण तिची छान काळजी घेत होती. तिला काय हवं ते सगळं पाहत होती. घरात कुठल्याही कामाला तिला हात लावू देत नव्हती. पुर्ण नववा महिना लागेपर्यंत तिने दिपाची नीट काळजी घेतली.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all