शीर्षक - जावे त्यांच्या वंशा
जलदलेखन विषय - अचानक
©® सौ.हेमा पाटील.
"डाॅक्टर, बघा हो, परत म्हणाल सांगितले नाही." रश्मी म्हणाली.
" काय?" डॉ. सोनल म्हणाली.
"मी काय सांगते, यापूर्वी मी जेवढे पण दात काढलेत ते सगळे तुटून निघालेत. तुम्हाला जमेल ना खरंच? नाही, माझा दात वरुन किडलेला असतो, पण त्याची मुळे खूप भक्कम असतात. सहजासहजी निघत नाही. मग डॉक्टरांना एकतर खूप खटपट करावी लागते, नाही तर दाढ काढण्याचा निर्णय बदलावा लागतो." रश्मी म्हणाली.
" तुम्हाला टेन्शन आले आहे का?" डॉक्टरांनी विचारले.
यावर रश्मी म्हणाली,
"नाही. टेन्शन नाही आले, पण जे काही सत्य आहे, ते तुमच्या कानावर असावे म्हणून सांगितले. मला तर दाढ काढायचीच आहे. माझे टेन्शन बाहेर बसले आहे."
"म्हणजे? समजले नाही." डॉ. सोनल म्हणाल्या.
"अहो, त्या काय सासुबाई बसलेत बाहेर. घरात तर पाठ सोडतच नाहीत, इथे पण आलेत सोबत." रश्मी म्हणाली.
" बरंच आहे ना! दाढ काढल्यावर कुणीतरी सोबत असलेले बरे."
" म्हणजे? तुम्ही खूप दुखवाल का मला?" रश्मीच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली.
डॉ.सोनल यांनी दोन मिनिटे डोळे मिटले. त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे त्यांच्या डेंटल क्लिनिक मध्ये चेअरवर बसलेली रश्मी आली. तिचे थोड्या वेळापूर्वी झालेले बोलणे आठवले. त्यांच्या चेहऱ्यावर निर्धार दिसू लागला. त्यांनी हातमोजे चढवले व असिस्टंटला हाक मारली.
"आपण परत एकदा एक्सरे घेऊया. यात दाढेची आत्ताची ॲक्चुअल कंडिशन समजेल. त्याप्रमाणे मग ठरवता येईल. चालेल ना?" डॉक्टरांनी रश्मीला विचारले.
नाही म्हणून सांगता कोणाला? आता एकदा त्यांच्या स्वाधीन स्वतःला केले आहे, म्हटल्यावर हो म्हणावेच लागते. एक्सरे काढायचा नाही म्हटले तर चालणार आहे थोडेच! एक्सरे काढला तर चालेल का? हे फक्त विचारण्यापुरते असते, तो काढायचाच असतो. त्याप्रमाणे मदतनीस एक्सरेच्या मशीनचा दांडा पुढे सरकवत आली व आ करायला सांगितले. रश्मीने होकार द्यायची पण त्यांनी वाट पाहिली नाही.
नाही म्हणून सांगता कोणाला? आता एकदा त्यांच्या स्वाधीन स्वतःला केले आहे, म्हटल्यावर हो म्हणावेच लागते. एक्सरे काढायचा नाही म्हटले तर चालणार आहे थोडेच! एक्सरे काढला तर चालेल का? हे फक्त विचारण्यापुरते असते, तो काढायचाच असतो. त्याप्रमाणे मदतनीस एक्सरेच्या मशीनचा दांडा पुढे सरकवत आली व आ करायला सांगितले. रश्मीने होकार द्यायची पण त्यांनी वाट पाहिली नाही.
पेशंट असणारी रश्मी बारकाईने डॉक्टरांकडे पाहत होती. ती डाॅक्टरांना म्हणाली,
"डाॅक्टर, तुम्हाला टेन्शन आले आहे का?" खरं तर दोघींनाही मनातून टेन्शन आले होते. रश्मीची दाढ काढायची होती, अन् डाॅक्टर नवीनच होत्या. दवाखान्यात आलेले पहिले-वहिले पेशंट होते. अर्थात काॅलेजमध्ये दाढ काढण्याचे प्रात्यक्षिक अनेकदा केले होते, याचा सरावही होता, पण स्वतःच्या क्लिनिकमधील ही पहिली वेळ होती.
आज क्लिनिकमध्ये आलेला पहिला पेशंट मात्र ताणाखाली आहे हे स्पष्ट दिसत होते. त्याचे मनोधैर्य वाढवायची गरज होती.त्यामुळे डॉ. सोनलने रश्मीला एकदोन प्रश्न विचारले. रश्मीने उत्तरे दिली. तिच्या चेहऱ्यावरचा ताण जरा कमी झाला आहे हे लक्षात येताच डॉ. सोनलनी तिला तोंड उघडायला सांगितले.
जी दाढ काढायची आहे, तिच्या अवतीभवती भूलीचे इंजेक्शन देऊन त्यांनी पेशंटला थोडावेळ तसेच बसवले. बाहेर दुसरा पेशंट नव्हताच, त्यामुळे बाहेर बसा म्हणायची आवश्यकता नव्हती. भूल चढली हे लक्षात येताच डॉ. सोनलनी तोंड उघडायला सांगितले.पुढचा अर्धा- पाऊण तास डॉ. सोनल या विविध हत्यारांचा वापर करून लढा देत होत्या. समोर किडलेली दाढ हे लक्ष्य होते.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
काय होते पुढे? डॉ. सोनल यशस्वी होतात का? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा