कथा-जय हो!
आज रेडेकर गुरुजींना शाळेत पोहोचायला जरा उशीरच झाला. रोज अत्यंत काटेकोरपणे शाळेच्या वेळेच्या एक तास आधी पोहोचणारे गुरुजी, आज प्रार्थना आटोपली तरी आले कसे नाहीत? याचे इतर शिक्षक व मुख्याध्यापकांना आश्चर्यच वाटले. आणि काळजी सुद्धा. कारण त्यांनी ना रजा दिली होती, ना उशिरा येण्याची साधी चिट्ठी. सर्वजण संभ्रमात होते.
गुरुजींना उशीर झाला, त्याचे कारणही तसेच. रेडेकर गुरुजी दररोज सायकलने शाळेत ये -जा करीत. दररोज त्यांना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झोपडपट्टी मधील मुलं खेळतांना दिसत. त्यात लहानग्यां पासून 14 15 वर्षापर्यंतची मुलं असत.कष्टकरी जमात ती! आई नसणारी, किंवा आईबाप नसणारी, किंवा एखाद्या आजीने सांभाळलेली .अशी विस्थापित असणारी ती मुलं... ना कोणतं वर्तमान ना कोणतं भविष्य. आई-वडिलांच्या अपघाती चुकांमुळे धरतीवर अवतरलेली...
गुरुजींना दररोज ये जा करतांना त्या मुलांकडे पाहून सतत काळजी वाटे. शिक्षण क्षेत्रात त्यांच्यासाठी शब्द आहे 'शाळाबाह्य' मुले... ही शाळाबाह्य मुले त्याच प्रभागातील शाळेतील शिक्षकांनी शाळेत दर्ज करून घ्यावी. शाळेतील विद्यार्थी संख्या वाढवावी...?
या मुलांच्या काय समस्या आहेत, यांना सुद्धा मन आहे, जाणीवा आहेत, याचे तेथून जाणाऱ्या येणाऱ्यांना काहीही सोयरसुतक नव्हते. रेडेकर गुरुजी दररोज तेथील एका मुलाचे जाता येता निरीक्षण करीत.
जवळपास बारा वर्षाचा असेल तो! त्यांच्या समूहातील सर्व मुलांचं नेतृत्व करायचा. कोलांट उड्या मारणे, बांबूच्या काड्यांचे धनुष्य करून तीर लावणे, अशा प्रकारचे खेळ तो लीलया करीत असे. त्याच्या वयाच्या मानाने राकट असलेला त्याचा चेहरा, दारिद्र्यात पिचलेला, पण कणखर असा मुलगा गुरुजींना खूप भावला.
जवळपास बारा वर्षाचा असेल तो! त्यांच्या समूहातील सर्व मुलांचं नेतृत्व करायचा. कोलांट उड्या मारणे, बांबूच्या काड्यांचे धनुष्य करून तीर लावणे, अशा प्रकारचे खेळ तो लीलया करीत असे. त्याच्या वयाच्या मानाने राकट असलेला त्याचा चेहरा, दारिद्र्यात पिचलेला, पण कणखर असा मुलगा गुरुजींना खूप भावला.
गुरुजींनी या आधी त्याची तीन-चारदा भेट घेतलेली होती. शाळेतून परत येतांना ते तिथे थांबत. त्या मुलाची चौकशी करीत .त्याला शिक्षणाची ओढ आहे हे त्याच्या बोलण्यातून, विचारातून त्यांना कळले होते. आज त्यांनी त्याला सोबत घेण्याचे ठरविले होतेच.
"आरं सूऱ्या! कुठं चालला? ये नं! मनकर्णा बुढीनं पाह्य आपल्यासाठी जांभूय आनले". गुरुजींनी त्याला आदल्याच दिवशी सोबत येण्या विषयी सांगितले होते. त्याला सुद्धा उत्सुकता होती गुरुजी सोबत जाण्याची. तो सवंगड्यांचे काहीही न ऐकता गुरुजींच्या सायकलच्या मागील बाजूस बसला.
गुरुजी त्याला घेऊन शाळेत पोहोचलेले पाहून सर्व शिक्षकांचा संभ्रम दूर झाला. शिक्षक आपल्या वर्गातून डोकावून पहात होते. सर्व वर्गातील विद्यार्थी, हा कोणता बावळट दिसणारा मुलगा शाळेत आला म्हणून आश्चर्याने बघत असताना... गुरुजी सूऱ्याला म्हणजे सुरेशला घेऊन कार्यालयात पोहोचले. मुख्याध्यापकांशी चर्चा करून त्याला वयानुसार कोणत्या वर्गात बसवावे हे ठरविले. त्याचे हमीपत्र गुरुजींनी घेतले. त्याला त्याच्या आजीनेच वाढविलेले असल्यामुळे आजीचे संमती पत्र घेऊन वर्ग पाच मध्ये बसविण्याचे ठरले.
तो वर्ग पाच मध्ये दाखल झाला खरा, परंतु त्याच्या येण्याने त्या वर्गातील मुलांनी तोंडे वाकडी केलीत. वर्ग शिक्षकांनी विचारले, "काय रे नाव तुझं"? "सूऱ्या"! सगळा वर्ग खळखळून हसला. त्याचे डोळे भरून आले ."अरे! हे काय नाव"? "मले सूऱ्याच म्हनतेत सारे"... "बरं बरं... 'सुरेश' असेल ते". शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गप्प केलं.
वयाने थोराड वाटणारा सुरेश मागील बाकावर बसला. थोडासा गांगरला. संकोचाने इतरांकडे पहात, सर्वांची नजर चुकवत कसा बसा सुट्टीची वाट पाहत होता. गुरुजींनी त्याची शाळेतून दप्तर, पुस्तक, पेन, पेन्सिलची सोय केलेली होती. पेन्सिल, रबर हातात घेऊन तो वहीवर रेषा ओढू लागला. वयानुसार त्याचा बुद्ध्यांक वाढलेला होताच. दररोज शाळेत पोहोचविणे व आणण्याची जबाबदारी गुरुजींनी घेतलेली होतीच.
"काय रे सूऱ्या? आज कसा काय गेलता शायेत? आपण मस्त खेयत होतो... तुया बिगर काय मज्जा नाही आली आज." मुलांच्या घोळक्यापासून त्याने त्याचं दप्तर लपविलं. अन् म्हणाला, "अरे लेका सुन्या! ते गुरुजी मले रोज नेणार हाय, त्यायच्या सायकलीवर बसून". "मी पाह्यतो पहिले शायेत काय असते ते... मंग तुम्हाले समद्यांले तिथं नेईन.
त्याच्या सवंगड्यांना वाटले, "खरंच नेईन का हा सूऱ्या आपल्याले शायेत"?
त्याच्या सवंगड्यांना वाटले, "खरंच नेईन का हा सूऱ्या आपल्याले शायेत"?
दुसऱ्या दिवशी तो शाळेत जायला तयार होताच. त्याने त्याचे केस न्हाव्या कडून कापून आणून व्यवस्थित केले होते. मळका शर्ट पॅन्ट स्वच्छ धुतला.
"चल सुरेश !बस सायकलवर". प्रार्थनेला जमलेली मुले त्याच्याकडेच बघत होती. सर्व विद्यार्थी एकाग्रतेने प्रार्थना म्हणत. ही सवय रेडेकर गुरुजींनीच त्यांना लावलेली होती. दररोज ते, प्रार्थना का म्हणायची? याविषयी विस्तृत मार्गदर्शन करीत.
ते म्हणत, प्रार्थनेत शब्दांपेक्षा भाव महत्त्वाचा असतो. 'जेथे भाव तेथे देव असतो'. अशी भावपूर्ण प्रार्थना ही रेडियम प्रमाणे तेजःपुंज असते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणायला सुरवात केली.
'इतनी शक्ती हमे देना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना|
हम चले नेक रस्ते पे हमसे
भूल कर भी कोई भूल हो ना'|
"चल सुरेश !बस सायकलवर". प्रार्थनेला जमलेली मुले त्याच्याकडेच बघत होती. सर्व विद्यार्थी एकाग्रतेने प्रार्थना म्हणत. ही सवय रेडेकर गुरुजींनीच त्यांना लावलेली होती. दररोज ते, प्रार्थना का म्हणायची? याविषयी विस्तृत मार्गदर्शन करीत.
ते म्हणत, प्रार्थनेत शब्दांपेक्षा भाव महत्त्वाचा असतो. 'जेथे भाव तेथे देव असतो'. अशी भावपूर्ण प्रार्थना ही रेडियम प्रमाणे तेजःपुंज असते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणायला सुरवात केली.
'इतनी शक्ती हमे देना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना|
हम चले नेक रस्ते पे हमसे
भूल कर भी कोई भूल हो ना'|
सुरेश ला कुतुहल वाटले. आणि आनंद सुद्धा झाला. वा! काय मस्त वातावरण आहे इथलं...
मुलांनो! आपल्याला या महिन्यात खेळांची तयारी करायची आहे. 'खेळ' हा शब्द कानावर पडला, आणि सूऱ्याने कान टवकारले. तसेही रेडेकर गुरुजींनाही याच क्रीडा महोत्सवात त्याला खेळण्याची संधी द्यायची होती. त्यांनी त्याचे खेळातले प्राविण्य आधीच हेरले होते.
"चला आता... सांघिक व वैयक्तिक खेळांची तयारी करूया". सुरेशला तर ही संधी चालून आलेली होती. कबड्डी या सांघिक खेळात, तो चपळ असल्यामुळे त्याच्याच नावाचा सगळीकडे जयघोष सुरू झाला.
सूऱ्या, जय हो! सगळे मैदान सूऱ्या, जय हो! च्या निनादाने भारावून गेले. वैयक्तिक स्पर्धेमध्ये तर, त्याने प्रत्येक खेळात बाजी मारली. लांब उडी, उंच उडी, मध्ये संपूर्ण टीम मधून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले. शाळेचे नाव उज्ज्वल केले.
सूऱ्या, जय हो! सगळे मैदान सूऱ्या, जय हो! च्या निनादाने भारावून गेले. वैयक्तिक स्पर्धेमध्ये तर, त्याने प्रत्येक खेळात बाजी मारली. लांब उडी, उंच उडी, मध्ये संपूर्ण टीम मधून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले. शाळेचे नाव उज्ज्वल केले.
गुरुजींनी बरोब्बर हिरा शोधला होता. त्याला विभागीय स्पर्धेत व पुढे राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली. तो आपल्या सवंगड्यां सोबत जे धनुष्यबाण चालवायचा, तेच कसब त्याने भालाफेक मध्ये वापरले.
आता तो ऑलिंपिक मध्ये खेळण्याची तयारी करीत आहे. त्याने आपल्या खेळातून मिळविलेल्या मिळकतीतून, आपण स्वतः राहत असलेल्या झोपड्यांची नवी वस्ती तयार केली. आपल्या सवंगड्यांना त्याने शाळेचे महत्त्व पटवून दिले.
प्रत्येक मुलांचे रंग रूप वेगळे असते. उंची, आकार, आवाज वेगळा असतो. काही मुले चपळ असतात. तर कांहीं मध्ये ती चपळता नसते. गुरुजींनी सुरेश मधली चपळता, धीटपणा, त्याची खेळात असणारी अभिरुची ओळखली होती. त्यामुळेच झोपडीतला 'सूऱ्या 'आज खेळ जगतात नावाजल्या गेला.
छाया राऊत बर्वे
अमरावती
८३९००८६९१७
अमरावती
८३९००८६९१७
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा