अर्चना एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती, आई-बाबा एक लहान भाऊ हेच तिचे छोटेसे जग होते,
आईला घरकामात मदत करून ती कॉलेज व अभ्यास हे सगळं मॅनेज करत असे. छोट्याश्या जगात हे चौघेजण फार खूष होते.त्यात बाबांचा स्वभाव खूपच मोकळा होता, आई तर जणू अर्चना ची मैत्रीणच होती. लहान भाऊ तर तिचा जीव की प्राण होता.
अर्चना ज्या कॉलेजमध्ये शिकत होती त्या कॉलेजमध्ये तिच्यासोबत राहुल राजे हा मुलगा शिकत होता,तसंच तिची बाल मैत्रीण रुपाली पण त्याच कॉलेजमध्ये होती, शाळा-कॉलेज पूर्वीपासून ती तिच्या सोबत होती. अर्चनाचा साधेपणा व मोकळेपणा, सगळ्यांची प्रेमाने वागणे हे राहुलला कुठेतरी अर्चना कडे खेचत होते आणि हे सारे रूपातील माहिती होतं. गेली दोन वर्ष अर्चना आणि राहुल एका कॉलेजात शिकत होते तेव्हापासून अर्चना राहुल खूप आवडू लागली होती. अन कुठेतरी अर्चनाच्या ह्रुदयाच्या कोपऱ्यात राहुल होता, पण तिला भीती पण होती कि राहुल आणि तीन गेली दोन वर्षे फक्त मित्र आणि मैत्रीण इतकेच होते, राहुलचे बोलणं वागणं अर्चना भावून गेल होत, राहुल दिसायला खूप छान होता, इतर सगळ्या मुलींनाही तो आवडायचा तसं अर्चनाला सुद्धा. पण तूर्तास अर्चनाला तिचे कॉलेज शिक्षण पूर्ण करायचे होते तिचे एक स्वप्न होते आपल्या पायावर उभे राहण्याचे, नोकरी करण्याचे, एक साध सरळ स्वप्न होतं आपल्या आई बाबांसाठी.......
राहुल अर्चना तसेच रूपाली एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि राहुलचे अर्चना वर प्रेम होते पण व्यक्त करू शकत नव्हता कारण त्याला अर्चनाला गमावून बसू हि भीती वाटत होती,एके दिवशी कॉलेजमध्ये रोज डे होता, अर्चनाला माहित होतं की आज राहुल काहीतरी करून तिच्याशी मनातील भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करेल म्हणूनच की काय पण आज कधी उशिरा येणारी अर्चना आज कॉलेजला उशिरा आली, राहुल अर्चनाच्या वाटेकडे डोळे लावून होता. त्याने अर्चनाला पाहिलं हलकी स्माईल दिली, सोबत आणले लाल कलरचे गुलाबाचे फुल अर्चनाला दिले व तिला म्हणाला तू माझी मैत्रीण तर आहेस पण माझीअशी इच्छा आहे की माझ्या मैत्रिणीला मी माझ्या आयुष्याची जीवनसाथी बनवावे. तुझ्यावर कोणत्याही प्रकारची बळजबरी नाही कारण मी तुझा मनापासून आदर करतो अन तू जो निर्णय मला देशील तो मला मान्य आहे.
अर्चनाला राहुलच्या हृदयातील आर्त हाक ऐकू येत होती कुठेतरी अर्चनाच्या मनात राहुलसाठी एक प्रेमभाव होता पण तिलाही भीती होती त्याला जरा आपला होकार दिला तर बाबांना काय वाटेल........ आईच विश्वास आपण गमावून बसू ही भीती अर्चनाच्या मनात आली आणि तिने राहुलला सांगितले कि आपण सध्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू, स्वतःच्या पायावर उभे राहू मग बघू आपले हे नाते किती व कस टिकवू शकतो ते?
राहुलला अर्चनाचे म्हणणे पटले, त्या नुसार त्या दोघांनी आपले लक्ष्य अभ्यासाकडे केंदित केले, दोघांनी कॉलेज शिक्षण संपवले, रिझल्ट चांगला लागला, अर्चना, राहुल, रुपाली छान मार्कांनी पास झाले, आता त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून नोकरी करून स्वतःला सिद्ध करायचे. अन मग आपल्या घरच्यांना या नात्या विषयी सांगायचे, जर त्यांची संमती असेल तर नात पुढे ठेवायचे, नाहीतर फक्त मैत्री ठेवायची.
असेच दिवस सरत होते, त्या दोघांना चांगली नोकरी लागली, राहुल एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनी मध्ये जाऊ लागला, अन अर्चना एका मोठ्या कंपनी मध्ये लागली.
अजूनही दोघांचे प्रेम अव्यक्त होते, राहुल ने मग ठरवले, पुढच्या महिन्यात अर्चनाचा वाढदिवस होता तेव्हा तिला पुन्हा लग्नासाठी मागणी घालावी........त्याने एक प्रेम पत्र लिहिले....
माझी प्रिय अर्चना,
हवी तुझी साथ मला
चान्दणराती जागताना
पिठुर शुभ्र चान्दण्यात
मनसोक्त फिरताना
हवी तुझी साथ मला
धुवाधार पाउस बरसताना
अन्गणात पडलेल्या गारा
ओन्जळीत वेचून घेताना
हवी तुझी साथ मला
शब्द शब्द बान्धताना
अक्षरान्ची गुम्फुन माला
सुरेल गीत छेडताना
हवी तुझी साथ मला
जीवनगाणी गाताना
एकेक पदर आयुष्याचा
हलकेच पलटून टाकताना
तुझा राहुल????
अस पत्र लिहून त्याने जवळ ठेवले व मनोमन अर्चनाचा विचार करून तिच्या आठवणीत गुंग झाला,अन त्या क्षणाची वाट पाहू लागला????
आता बघू पुढे काय होत...
क्रमशः
कसा वाटला लेख?अभिप्राय द्या!
©®श्रावणी देशपांडे
गोष्टी मनातल्या❤️
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा