जिवलगा
भाग 4 अंतिम
दिया ला सम्या चा कॉल येतो तो खुप रडत असतो ती काही बोलणार ह्या आधी तो तिला एका दमात सांगतो...." आपला जय गेला ग..." त्या पेक्षा जास्त तो बोलू शकत नाही आणि दिया च्या ही मेंदु ने काम करणे बंद केलेल असते....
दिया घरी एकटी असते...तिला विश्वास च बसत नसतो....आत्ता काही क्षणा पुर्वी जो आपला जिवलग असा मित्र आपल्या शी बोलत होता....तो आता ह्या जगात नहिये ज्याला आपण कधि सांगू शकणार नाही त्या प्रेमाची कबुली दिली होती काही क्षणा पुर्वी....
ती मानसिक रित्या पूर्ण पणे कोसळून जाते...आणि 2 दिवसां नंतर जेव्हा ती सम्या ला जाऊन भेटते तेव्हा तिला कळत जय तिच्या सोबत बोलत असतांनाच त्याचा हार्ट फैल झाले आणि तो जागे वरच गेला
आणि सम्या तिला जय चे तिच्य वर खुप प्रेम होते हे ही सांगतो....तिला खुप मोठा धक्का बसतो....पण त्या ही पेक्षा जास्त ती फक्त इतकेच बोलते " माझ्या मुळे गेला तो" सारखे तेच बोलत राहते....
सम्या तिला गदागदा हलवतो, तिच्या काना खाली पण मरतो असे नहिये पण तरी ती " माझ्या मुळे गेला तो".....इतकेच बोलत राहते....सम्या ला तिची ही स्थिती बघवत नाही....तो तिला नीट घरी सोडतो...
ह्या गोष्टीला आज 2 महीने पूर्ण होतात पण दिया मनाला जे सल लावुन घेते की तो तिच्या मुळे गेला हे काही केल्या कमी होत नसते....सम्या चे सर्व प्रयत्न संपले असतात...ती वर वर जरी नॉर्मल वागत असली तरी तिने स्वताचे अस्तित्त्व हरवले असते ह्या अपराधी पणा च्या जाणीव मुळे.
आज 2 महिने झाले दिया घरात एकटीच सतत तोच विचार करत बसली असते....तितक्यात डोर बेल वाजते...आत्ता दुपारी कोणी येत नाही आणि तिचा नवरा रात्री 11 च्या कधि येत नसे....तसे काही भिती चे कारण नव्हते पण तरी कोण आले म्हणून बघायला ती तिच्या रुम च्या बाहेर आली..तर समोर...
जय ची आई...शालिनी काकू तुम्ही...त्यांना बघताच ती त्यांच्या गळ्यात पड्ली आणि तिने मनसोक्त रडून घेतले
त्यानी ही तिला अडवले नाही मोकळे हौऊ दिले....बर्याच वेळाने तिचे रडणे कमी झाले...मग त्या दोघी जुजबी काही तरी बोलल्या..
दिया अचानक हिम्मत करुन काकूं च्या जवळ गेली...आणि त्यांच्या मांडी वर डोक ठेवत त्यांचा हाथ पकडून बोलली "माझ्या मुळे गेला तो" मी जाबबदार आहे ह्या सर्व गोष्टी ला....आणि परत रडु लागली....
काकूंच्या डोळ्यात पाणी आले, त्यानी प्रेमाने तिला कुरवाळत उठवले आणि म्हणाल्या..." आज बोलली परत हा शब्द काढू नकोस... तू मुक्ती दिलीस त्याला, तुझे लग्ना चे समजल्या पासुन जगण्याची इछा संपली होती त्याची, त्याला असे तडफड जगताना मला असंख्य वेदना होत होत्या....पण आज जय ची आई तुला स्वता सांगतेय जिने त्याला जन्म दिला...त्याला तू मृत्यू देऊन उपकार केलेस माझ्या वर, तुमचे काय बोलणे झाले माहित नाही मला पण जातांना तो समधाना ने गेला इतकेच सांगीन मी तुला"
असे बोलून काकू निघुन गेल्या....
पण तिने मात्र तिचा "जिवलगा
" कायमचा गमावला होता...आणि तो ही तिच्या मुळेच हे सर्व तिच्या मनाला आयुष्य भर असंख्य वेदना देणार होते.....
पण तिला पर्याय नव्हता...तिला मात्र ह्या "जिवलगा
" शिवाय च जगावे लागणार होते....आणि ही जाणिव घेऊनच..." तो माझ्या मुळे गेला"
------ समाप्त------
प्रेम हे असे ही असू शकते...पण त्या जाणारा निघुन गेला....पण आपल्या मुळे कोणी तरी ह्या जगात नाही ह्या जाणिवे सोबत जगणे ह्या पेक्षा मोठी नरक यातना ह्या जगात नाही
@हेमांगी सुर्यवंशी@
प्रकाशनाचे सर्व हक्क राखीव...गैर वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा