Login

जगा वेगळं सासर भाग - 7

कथा एका आगळ्या वेगळ्या सासरची. जी तुम्हाला विचार करायला भाग पाडेल..


जगा वेगळं सासर भाग - 7

सगळे स्पर्धेसाठी जमले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा त्यात जग भरातून अनेक मुलं सहभागी व्हायला आली होती. एवढा मोठ्ठा मंच आणि एवढे लोकं बघून ती क्षणभर घाबरली.

" आई भीती वाटते आहे मला. "

"अरे मेरा स्ट्रॉंग बच्चा. तुमको तो सब आता हैं ना"

"हम्म, आता जरा तिचा स्वर खाली पडला होता.

"ये लाडो असं घाबरून बिबरून चालणार नाही बरं का? बिनधास्त नायचं. बघ तूच जिंकशील."

आई आणि आजीच्या बोलण्याने तिला थोडं बरं वाटलं पण मागे वळून प्रेक्षकांकडे बघितलं तर ती बिचकायची. पूर्णाच्या आईला कळलं होतं... ती हळूच तिच्या जवळ गेली... तिचा हात हातात घेतला....
"नानी मुझे बहोत डर लग राहा हैं|".
"मैं समझ सकती हू लाडो... एक बात बताऊं... तुम्हारी अम्मा जब छोटी थी ना तुम्हारे जैसेही बहोत अच्छा डान्स करती थी| एक दिन आपके जैसे उसके भी स्कुल मैं कॉम्पिटिशन थी | वो बिलकुल नहीं घबराई इतना सुंदर डान्स किया की सब लोग ताली बजाने लगे और पहिला नंबर भी आया| अपनी अम्मा के जैसे आपभी स्ट्रॉंग बनो|"

"नानी अम्मा भी डान्स करती थी? उन्होने कभी बताया नहीं|"

"हां बहोत अच्छा| उसने तो बहोत सारे कॉम्पिटिशन मैं भाग लेती थी और जीत के भी आती थी|"

"नानी देखना अब मैं भी बहोत अच्छा डान्स करुंगी और जितुंगी भी|"

"ये हुई ना बात " हाय फाय करतं दोघी हसू लागल्या...

आता मात्र लक्ष्मीच्या मनात आत्मविश्वास जागा झाला होता... आपली आई करू शकते तर आपण का नाही? खूप कॉन्फिडन्स ती स्टेजवर गेली. अप्रतिम नृत्य सादर केल. एका मागून एक अनेको परफॉर्मन्स झालेत. आता वाट होती निकालाची. आपण छान परफॉर्मन्स दिलं म्हणून लक्ष्मी खूप आनंदी होती. निकाल काहीही येवो तिला काही फरक नव्हता पडणार पण तिच्या आजी आणि नानीला मात्र जाम टेन्शन वाटतं होतं. आपली लक्ष्मी जिकंलीच पाहिजे. सगळीच मुलं छान नाचली होती. दुसऱ्या फेरीसाठी कोणाची निवड होईल कोणालाच माहिती नव्हतं.
निकालाची वेळ आली. जजेस मंचावर आले. एकूण 10 मुलांची निवड द्वितीय फेरीसाठी होणार होती. हळूहळू निवड झालेल्या मुलांची नावे घेत होते. सगळ्यांना धडधड वाटतं होतं. आजी आणि नानी तर अक्षरशः देवाचं नामस्मरण करीत होत्या.
आणि शेवटची विजेती आहे.... लक्ष्मी मंदार देशमुख... नावं ऐकतचा लक्ष्मी आनंदाने उड्या मारायला लागली. लक्ष्मी सोबत तिची आजी व नानीही जिकंली होती आज. दोघीही मटमट पप्प्या घेऊ लागल्या तिच्या. पूर्णाचे डोळे डबडबून आले. जणू तिचंच नावं घेतलं होतं की काय...
प्रत्येक आई आपल्या अंशात आपलं लहानपण शोधत असते. ती नवीन लग्न करून जेव्हा घरी आली होती तेव्हा कसलं वातावरण होतं. काय ते नियम असायचे सासूबाईंचे आणि काय त्यांचा तोरा होता. त्यांच्या मना विरुद्ध कोणतंही कामं करायची कुणाची हिम्मत नव्हती. पूर्णाचा आणि पूर्णाच्या माहेरच्या लोकांचा किती रागराग करायच्या त्या. कसे दिवस पालटले पूर्णाला कळलंच नाही. किती त्या लहानश्या जीवात सकारात्मक ऊर्जा होती.
पहिली फेरी लक्ष्मीने उत्तमरित्या पास केली होती. आता होती दुसरी फेरी. एका छोट्याश्या ब्रेक नंतर दुसऱ्या फेरीच्या आव्हानाची घोषणा होणार होती. सगळे लक्ष देऊन ऐकत होते.

" प्रथम फेरी उत्तम रित्या संपन्न झाली. पण द्वितीय फेरीत फुल ऑफ सप्राईज असणार आहे. आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप आतुरतेने आव्हानाची वाट बघतात आहे. काय असेल बरं? सगळ्यांच प्रश्न पडलेला असेल. तर तुम्ही सगळे तयार आहात? "

सगळे " होsssssss" म्हणूं ओरडलेत....
सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोचली होती.

"द्वितीय फेरीत तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत डान्स करायचा आहे."
सगळीकडे पिन ड्रॉप सायलेंट होतं. कान आणि नजरा आवाजाकडे तक लावून होत्या...
" ती पार्टनर असणार आहे तुमची आई. "
चोहीकडे टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला...
ऐकताचं...
" वॉव आई, मला तुझ्यासोबत डान्स करायला मिळेल."
सगळीकडे टाळ्या वाजत होत्या पण लक्ष्मीच्या कुटुंबातील सगळे शांत होते. सासूबाईंच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. पूर्णाचा चेहरा पडला होता. अचानक आभाळ कोसळ्या सारखं वाटतं होतं तिला. मंदारला काय रिऍकशन द्यावं समजेनास झालं होतं. लक्ष्मीला मात्र काही कळेना सगळे शांत का झाले?
"आई आता काय मज्जा येईल. तू बघ आता तर आपण नक्की जिंकू", ती मोठ्या उत्साहाने बोलत होती.
तिला काय उत्तर द्यावं?, कसं बोलावं? पूर्णाच्या कंठ सोकू लागला होता.
मंदारने लक्ष्मीचा हात धरला आणि सगळे मागोमाग हॉलच्या बाहेर निघालेत. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. सगळे चुपचाप मंदार आणि तिच्या मागे मागे चालतं होते . पूर्णा सगळ्यात मागे होती. अश्रू गिळायचा प्रयत्न तिचा सतत सुरु होता पण राहून राहून ते गालावर सरसायचे आणि ती पुसायची. सगळे गाडीत बसले.
निरव शांतता होती.
"आई बोल ना तू डान्स करशील ना माझ्यासोबत. काय गंमत झाली ना बाबा. नानी आजच सांगत होती मला की आई खूप छान डान्स करते. बाबा तुम्हाला माहिती आहे तिने खूप साऱ्या कॉम्पिटिशन पण जिंकल्या आहे", ती आपली सतत उत्साहित होऊन बोलत होती. त्या चिमुकलीला काय कळणार होतं. आपली आई आपल्यासोबत डान्स करणार म्हणून ती खूप आंनदी होती.
तिचं सतत सतत बोलणं ऐकून पूर्णा रागावली तिच्यावर...
"गप्प बसते काय? क्या बकबक लगा रखी हैं?"
लक्ष्मीला कळलंच नाही. आता पर्यंत आनंद व्यक्त करणारे सगळेच कसे एका क्षणात शांत झाले. काय झालं असावं. तिच्या इवल्याशा मनावर दडपण आल्यासारखं वाटलं. ती गप्प बसली. गाडीत कोणीच कोणाशी बोललं नाही. येतांना तर सगळे इतके बोलत होते. तिला वारंवार समजवतं होते सगळं तिच्या समजण्या पलीकडंच होतं.
घरी पोहोचताच सगळे आपापल्या खोलीत गेले. लक्ष्मीचे कपडे बदलवून पूर्णाने तिला झोपवून दिलं. खूप दमली होती बिचारी. न बोलताच झोपी गेली. तिला कुशीत घेऊन पूर्णा उमसूउमसू रडू लागली. मंदारचेही डोळे पाणावले.
" इस नन्हींसी जान को कैसे समझायेंगे मंदार | "
"हम्म्म्म... किती हिरमूसला होता बिचारीचा चेहरा."
"बहोत दया येतं होती रे मला"
" आईचा चेहरा खूप चिंतेत दिसला मला. उद्या काय होईल माहिती नाही. "
" मंदार आई कभी नहीं मानेंगी और लक्ष्मी कॉम्पिटिशन मधून बाहेर होईल |", रडक्या स्वरात ती म्हणाली.
"इतका विचार नको करू ग", तिचे अश्रू पुसत तो म्हणाला.

सकाळी तिच्या अरिक्त प्रश्नांची काय उत्तरे द्यावी याच विचारात पूर्णाची रात्र ओझरली .
तिकडे सासूबाईं आपल्या विचारात होत्या. एके काळी आपण आपल्या तत्व, परंपरा , प्रतिष्ठा, समाजाला आड घालून
एका दुसऱ्या धर्माच्या पोरीवर बंधने लादली. जेव्हा की त्या बिचारीची काहीही एक चूक नव्हती. किती निरागस मनाची होती ती बिचारी. नेहमी माझा विचार करून वागायची. खूप कौतुक वाटायचं मला तिचं पण तेव्हाही नुसतं समाजातील जातीतीतलं लोकं काय म्हणतील म्हणून मी कठोर वागत गेले तिच्याशी आणि आता परत तोच प्रसंग उभा ठाकला.. किती कठोर असावं आपलं मन.
त्या इवल्याश्या लाडोला उद्या कळेल की मी तिच्या आईशी असे वागले होते तर काय विचार करेल ती माझ्याबद्दल? मला बॅड आजी म्हणेल? नको नको असं अजिबात व्हायला नको?
------------------------------------------------------------------------------

क्रमशः

दोघींच्याही मनातं विचत्र उलाढाल सुरु होती. कसं आहे परिस्थितीवश काही गोष्टी आपल्या हातून घडतात. पूर्णा आणि तिच्या सासूबाईंच्या बाबतीतही असंच घडलं होतं.
केलेल्या चुकीचा सासूबाईंना पश्चाताप येतं होता तर परत त्याचं चुकीची पुनरावृत्ती न व्हावी म्हणून पूर्णा आपल्या परीने हवे ते प्रयत्न करायला तयार होती....
पुढे काय होईल? बघूया पुढच्या भागात.

सौ. अश्विनी रोशन दुरगकर.