ईरा ब्लॉगच्या प्रतिभेचा नमुना म्हणजे चॅम्पियन्स स्पर्धेच्या फेऱ्या. प्रत्येक फेरीत काहीनां काही शिकायला मिळतंय. त्याचबरोबर अनोळखी ते ओळखताहेत एकमेकांना. विविधांगी फेऱ्यांमुळे टीम मधले लेखक, भावनिकरित्या जुळत आहेत. व्यासपीठावर मन मोकळे करत आहेत. अशाच एका फेरीमुळे खरे तर मला तिच्यातील ती दिसली. अंतर्बाह्य कळली. जणू मनाच्या गाभाऱ्यातील मळभ दूर सारले. आता ती व्यासपीठावर खुलली आहे. टीम मध्ये मिसळली आहे. तिच्या मेसेज मधून ती व्यक्त झाल्यासारखी वाटते आहे. नव्हे व्यक्त होत आहे...आपुलकी झळकते आहे. 'संबंध-सेतू' खरेच निर्माण झाला आहे...!
शामल वर्णाची बोलक्या डोळ्यांची आधुनिक नारी. तिची लेखणी जणू बोलते. आधुनिक संवाद साधते. मनामनात पोहोचते. अनामिक हुरहुर लावते. मी पहिल्यांदा तिच्या जलद कथेतील पहिला भाग वाचला. आणि प्रचंड उत्साह वाढला माझा. 'हिच्या लेखणीत जादू आहे...' मनाने पटकन म्हंटले...!
सुरुवातीला आपल्याच कोषात असलेली ती, सावधपणे बोलत होती. जणू सर्वांना चाचपडत होती. थोडा वेळ घेतला पण, अखेर आम्ही तिचा विश्वास जिंकला. म्हणजे ईरा व्यासपीठाने विश्वास जिंकला. आणि तिला बोलते केले. मनाच्या कप्प्यात साचलेला गाळ बाहेर पडला. आणि ती अधिकच जवळ आली. जीवनातील बालमनाला बोचलेले क्षण. जेव्हा जे हवं होतं ते न मिळता जे मिळालं त्यातही ती मनापासून आनंदी होती. जिद्दीने, चिकाटीने आलेल्या प्रत्येक प्रसंगाला न घाबरता ती सामोरी जात राहिली. खितपत न पडता आपली उन्नती कशी करावी? आणि त्यासाठी जमेल ते प्रयत्नं करून तिने मुंबईची खाडी सर केलीच म्हणायचे...!
अभ्यासात अत्यंत हुशार असलेली आमची ''स्नेहा" शिक्षकांमध्ये प्रिय होती. शाळेच्या नावाने पोटात दुखणारी मी...आणि शाळेत आनंदाने जाणारी, खेळण्यापेक्षा पुस्तकांना जवळ करणारी ती. अभ्यासाप्रती वाचण्याप्रती...किती सलगी म्हणावी!
डॉक्टर बनायचे स्वप्नं उराशी बाळगले होते. पण नियतीने ते पूर्ण होऊ दिले नाही. लहान वयातच वाचनाची आवड निर्माण झाली. लेखिका व्हावेसे वाटू लागले. पण मग बालसुलभ इच्छेनुसारचं इंजिनियर बनायचे मनोमन ठरवले.
बारावीनंतर आर्थिक परिस्थितीमुळे इंजिनिअरिंग डिग्रीला अॅडमिशन घेता आली नाही. त्यामुळे डिप्लोमा केला. पण शिक्षणाची आस स्वस्थ बसू देत नव्हती.
परिस्थिती अनुकूल नव्हतीच. लवकरच लग्नं झाले. ती आता, 'स्नेहा प्रकाश' झाली. एकत्र कुटुंबातून पुन्हा एकत्रच कुटुंबात आली. तत्पुर्वी शिक्षणाबद्दलच्या ओढीने तिला, त्याकाळातही धाडसी पाऊल उचलायला भाग पाडून. स्पष्टपणे, होणार्या नवर्यापुढे बोलली. जेव्हा की आधीच्या अनुभवानूसार त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात...शक्यता होती. ह्यावरुन स्नेहातला स्पष्टवक्तेपणा, प्रामाणीकपणा शिकण्याची जिद्द सहजच दृष्टीस येते.
एकत्र कुटुंबात हे सहज शक्य नव्हते. तरी पण कशी बशी पार्ट टाईम डिग्री पूर्ण केली. त्यानंतर उच्च पदवीसाठी सुद्धा अॅडमिशन घेतली. आणि मग अजून एका स्वप्नंपूर्तीच्या दिशेने पाऊल टाकले.
नवऱ्याच्या सहकार्याने स्नेहा लंडनला नोकरी निमित्ताने दीड वर्षे राहिली. वाचनाची प्रचंड आवड असलेल्या स्नेहाची अल्पावधीत लेखणीही बहरली. भारतात आल्या नंतर दोन तीन कादंबरी सुद्धा लिहिल्यात. आणि आताही नोकरी सोबत लेखन सुरूच आहे.
शिक्षणाचे, विचारांचे, माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य मिळविण्या साठी नेहमीच सजग राहून प्रयत्नं करावा. अनंत अडचणी आल्यातं तरी त्यातून मार्ग काढतं ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करावी. स्नेहाच्या जीवनपटावरुन शिकण्यासारखे खुप काही आहे.
स्नेहा तू अशीच व्यक्त हो. मनमोकळी बोल. मला खात्री आहे तू एक कर्तव्यदक्ष, प्रेमळ, जबाबदार आई आणि बायको आहेस!
स्पर्धेच्या निमित्ताने अश्या जिद्दी व्यक्तीमत्वाचे मला सानिध्य मिळाले माझे भाग्य!
स्नेहा, आरोग्यपुर्ण आयुष्य लाभो तुला. तुझी लेखणी अशीच बहरत राहील. लेखनाचा तुझा ठेवा पुस्तक रुपाने आम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध करुन दे. आणि अंतकरणातून बोलतेय. तुझे 'आत्मचरित्र' सुद्धा पुस्तक रुपाने जगासमोर येऊ देत! तसेच, नवीन कल्पना तुझ्या साकार होऊ देत. एकंदरीत सगळी स्वप्नं तुझी प्रत्यक्षात उतरतील. भरभरुन संसार सुख लाभेल तुला. हीच मनापासून अनंत शुभेच्छा!
१२/०८/२३
०००
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा