अधिकारी साहेबांनी बेल वाजवली आणि गणेश धावत डेस्क जवळ आला.
हे बघ गणेश, आज चार वाजता जिल्हाधिकारी आपल्या विभागाच्या दौऱ्यावर येणार आहेत तेव्हा त्यांना गेस्टहाऊस वर न्यायची आणि पुढचे दोन दिवस दौऱ्याच्या कामापुरते सोबत रहायची जबाबदारी तुझी आहे. अधिकारी साहेबांनी आदेश दिला.
होकार देऊन गणेश आपल्या जागेवर आला.
बरोबर ४ वाजता अधिकारी साहेबांच्या कार्यालयात एक लाल दिव्याची चकचकीत पांढरी कार येऊन थांबली. आकाश साहेब त्यांची बायको नेहा आणि सोबत छोटा २ वर्षाचा राज गाडीतून बाहेर आले.

बॅग घ्यायला पुढे झालेल्या गणेश ला नेहाला पाहून धक्काच बसला. कसंतरी पुढे होऊन त्याने गाडीतून बॅग घेतली आणि त्यांच्या पुढे चालायला लागला.
गेस्ट हाऊसच्या आवारात आल्यावर नेहाने गणेशला काही जुजबी सूचना दिल्या आणि उद्याच्या पाहणी करता वेळेत हजर राहायला सांगितले.
गेस्ट हाऊसच्या आवारात आल्यावर नेहाने गणेशला काही जुजबी सूचना दिल्या आणि उद्याच्या पाहणी करता वेळेत हजर राहायला सांगितले.
मान डोलावत गणेशने विचारले कशी आहेस नेहा? काही फोन पत्ता नाही तुझा?
नेहा अनोळखी नजरेने म्हणाली , तुमचे काही काम नसेल तर आता गेलात तरी चालेल.
घरी जाईपर्यंत गणेश नेहाच्या विचारातच चालला होता . पूर्वीची साधी सुंदर साडीत वावरणारी नेहा आज फर्स्ट क्लास इंग्लिश बोलत आधुनिक पेहरावात वावरत होती. त्यात भरीस भर म्हणून तिचा जिल्हाधिकारी नवरा आकाश तिच्याशी चर्चा करून आत्मविश्वासाने कार्यालयात वावरत होता.
६ वर्षांपुर्वी गणेश आणि नेहाचे अरेंज मॅरेज झालं होतं. कुणा एका मध्यस्थाने लग्न जमवलं. नेहाच्या घरची परिस्थिती फार गरीब . त्यातच आई वडिलांनी मोल मजुरी करून तिला वाढवले ऐपतीप्रमाणे शिक्षण दिलं .नेहाला पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा देण्याची फार इच्छा होती पण गणेश आणि त्याच्या घरच्यांनी तिला लग्नानंतर पुढे शिक्षण सुरू ठेवण्याचे कबूल केले.
सुरवातीच पहिलं वर्ष नवी नवरी म्हणून कौतुक, पाहुणेरावळे, सणवार, घरकाम यातच गेलं. दुसऱ्या वर्षी नेहाने सरकारी नोकरी भरतीच्या परीक्षेचा अर्ज केला. त्यासाठी घरकाम आवरून ती अभ्यासाला बसू लागली. सतत हातात आयते हवे असणाऱ्या तिच्या सासूला नेहाचे हे अभ्यास करणे खूपू लागले. घरकाम झाल्यानंतर गावातील इतरांच्या सुना काहीना काही उद्योग करीत . पापड लोणचे वाळवण दळण कांडप असा त्यांच्या कार्यक्रम चाले . पण नेहा यात कुठेच नव्हती . आपलं काम आवरून ती अधिक वेळ नोट्स लिहत असे वाचन करत असे. नेमकं हेच सासूबाईंना खटकू लागले त्यात भरीस भर म्हणून इतर बायका त्यांना आडून आडून सुनेबद्दल विचारत.
सासूबाई आता हळूहळू मुलाचे कान भरू लागल्या. या वयात माझे पाय खूप दुखतात . मला सारखं उठावं लागतं. तुझी बायको काही कामाची नाही . नुसती घरातली कामं केली म्हणजे होतं नाही. ती दिवसभर खोलीत अभ्यास करत बसलेली मला नाही चालणार. हे काय तिच्या बापाचे घर नाही . सासर आहे म्हणावं. उद्या जास्त शिकली की तुला आणि मला हाताखाली राहावं लागेल तिच्या.

गणेशने सुरुवातीला दुर्लक्ष केले पण आता त्याला आईचे म्हणणे पटू लागले . या वयात बायकोने अभ्यास करावा आणि आईने घरात राबावं . मी कमवावं आणि हिने माझ्या पुढे जाऊन मिजास दाखवावी हेच त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागलं. तसं एका दिवशी रागाच्या भरातच त्याने नेहाला मारहाण केली आणि धमकी दिली पुन्हा जर परीक्षेचे नाव घेतलेस तर कायमची माहेरी पाठवून देईल.
नेहाने त्याला परीक्षेचे, अभ्यासाचे महत्व खूप समजावले की ही स्पर्धा परीक्षा पुढच्या आठवड्यात आहे गेले सहा महिने ती अभ्यास करत आहे . पास झाली तर कशी आपली परिस्थिती सुधारेल समाजोपयोगी कार्य करता येईल.पण गणेश वर याचा काही परिणाम झाला नाही.
परीक्षेच्या दिवशी कोणाला काही न सांगता नेहा घरातून निघून गेली. संध्याकाळी घरी येऊन पाहते तर काय तिच्या सासू आणि नवऱ्याने आकांडतांडव केला. तिच्या आई वडीलांना बोलवून घेतले आणि निघून जाण्यास सांगितले.
पुढे रीतसर घटस्फोट घेऊन गणेशने आईंच्या पसंतीने मालतीशी लग्न केलं . जेमतेम ७ वी पास मालती घरकाम आणि सासूबाईंची नवऱ्याची सेवा करण्यातच व्यस्त असायची. कुठूनतरी त्याला समजले नेहा आणि तिचे आईवडील गाव सोडून निघून गेले. कदाचित नवऱ्याने सोडले म्हणून लोकांच्या बोलण्याला कंटाळून.
दुसऱ्या दिवशी गावाचा दौरा करताना गणेशला दुसरा धक्का बसला जेव्हा त्याला समजले जिल्हाधिकारी आकाश साहेब नसून नेहा आहे. आणि आकाश साहेबदेखील जिल्हानिरीक्षक आहेत. ग्रामपंचायत, तालुका आणि येथील अधिकाऱ्यांशी नेहा प्रचंड आत्मविश्वासाने चर्चा करत होती . ग्रामपंचायतीने ठेवलेल्या सभेत सरकारी योजनेचा गावातील लोकांना कसा लाभ घेता येईल. कोणते प्रकल्प आणि गावाच्या तालुक्याचा गरजा काय आहेत याचे विचार मांडत होती तेव्हा गणेश एका कोपऱ्यात थक्क होऊन आपण काय गमावलं आहे हे पाहत होता. तर दूर गर्दीमध्ये सभेला बसलेली त्याची बायको मालती जोरजोरात टाळ्या वाजवत होती आणि सासूबाई पदराआड तोंड लपवत होत्या.
घरी परतताच मालतीने सांगितलं , अहो तुम्हाला माहीत आहे का या नेहा मॅडम आपल्या गावातील बायकांना लघुउद्योगासाठी मदत करणार आहेत, मजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची सोय करणार आहेत. खरंच माझ्यावेळी जर कोणी अशी मदत करायची तयारी दाखवली असती तर मी पण खूप शिकले असते तुमच्याप्रमाणे घराला हातभार लावला असता. पण असो आपण पण आपल्या सोनीला खूप शिकवायचं. नेहा मॅडम सारखी शिक्षणाच्या जोरावर दुसऱ्यांना मदत करणारी व्यक्ती बनवायचं.
मालतीचं बोलणं ऐकून गणेश आणि सासूबाई एकमेकांच्या नजरेला नजर देऊ शकले नाहीत.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा