खूप वर्षांपूर्वी छोट्याशा गावात अरुणा नावाची मुलगी राहत असते. अरुणा आता जाणती झाली आहे. आता तिच्यासाठी मुलगा पाहायला हवा रखमा (अरुणाची आत्या ) म्हणाली. " हो ताई कोणी चांगला मुलगा असेल तर सांगा " शोभा म्हणाली ( शोभा म्हणजे अरुणाची आई ) "आहे एक मुलगा चांगल्या घरातला पण................."
"पण काय झालं ताई ?"
काही नाही बस मुलगा जरा जास्त वयाचा आहे.
म्हणजे त्याचं हे दुसरं लग्न आहे ना म्हणून. पहिल्या बायकोकडून दोन मुली आहेत.
" त्याची पहिली बायको ? " शोभा ने विचारले. पहिली बायको तिसऱ्या बाळंतपणात गेली. "आणि ते बाळ? "
रखमा : ते बाळही त्याच वेळी गेलं.
शोभा : जर अरुणा साठी मुलगा तुम्हाला चांगला वाटत
असेल तर पाहूया आपण .
रखमा : मुलगा चांगला देखणा आहे. शेतीवाडी, घरदार
चांगले आहे.
शोभा : तुमच्या भावाबरोबर बोलून बघा ते काय बोलतात
ते.
रखमा : मी बोलते दादा बरोबर.दादाला शोधत शोधत
रखमा आईला विचारते आई दादा कुठे गेला
आहे?
आई : खाली वावरात ( शेतात ) गेला आहे. पण तुला काय
काम आहे त्याच्याकडे ?
रखमा : हे बघ दादा आलाच दादा हे घे पाणी.
दादा: काय ग रखमा कधी आलीस?
रखमा : थोडा वेळ झाला आली मी.
दादा : सहज आली की काही काम आहे. कारण आता
काही सणवारही नाही म्हणून विचारलं.
रखमा : ते आपल्या अरुणासाठी एक मागणं ( लग्नासाठी
मुलगा ) होता. तुला चांगला वाटला तर पाहू.
दादा : मुलगा कोणत्या गावाचा आहे? आणि काय करतो
मुलगा?
रखमा : माझ्या जास्त ओळखीची नाही माणसं पण
आमच्या आत्या ( रखमाची सासू ) ओळखतात त्यांना.
दादा : तुझे घरचे दाखवतात तर बघू या मुलगा . येत्या
चार-पाच दिवसात बोलवून घे त्यांना.
चार-पाच दिवसांनी अरुणाला पाहायला पाहुणे ( शिरपत नवरा मुलगा) आले.
पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि शिरपत ने लग्नाला होकार दिला.
काही दिवसात लग्नही छान पार पडले. नवीन नवरीचे सर्वजण कौतुक करत होते बघता बघता लग्नाला सहा महिने झाले. सर्व काही छान चालले होते. तेव्हाच एक आनंदाची बातमी समजली अरुणाला दिवस गेले आहेत ते. सर्वजण खूप आनंदी झाले . तेव्हापासून तर तिची खूप जास्त काळजी घ्यायला लागले. बघता बघता महिने सरले आणि तो बाळंतपणाचा दिवस आला. बाळंतपणासाठी अरुणा माहेरी आली होती. अरुणाला एक छान, गोड , नाकीडोळी सुंदर अशी मुलगी झाली होती.
पाचव्या दिवशी पाचवीला अरुणाच्या सासर कडून जास्त लोक आली नव्हती. पण कामाचे दिवस होते म्हणून आली नसतील असा तिने विचार केला . तीन महिन्यांनी जेव्हा अरुणा तिच्या घरी गेली. तेव्हा तिकडचे वातावरण काहीतरी वेगळेच होते. आता अरुणा सोबत कोणी नीट बोलत नव्हते कोणी नीट वागत नव्हते.
कारण नसतानाही तिचा आता छळ होत होता , मारझोड होत होती. उपाशी ठेवले जायचं, तिला समजत नव्हतं हे असे का होत आहे. एक दिवस अशीच ती काम करत असताना कोणाचा तरी कुजबुजण्याचा आवाज तिला आला.
ती त्या दिशेने गेली आणि ऐकते तर काय शिरपत आणि परशु जेवणातून अरुणाला विष देऊन मारून टाकू असे बोलत होते.
शिरपत : वाटलं होतं यावेळी तरी मुलगा होईल. पण अरुणाला पण मुलगी च झाली आधीच दोन मुली होत्या आता त्यात अजून एकीची भर पडली. काल जो बुवा आला होता त्यानेही अरुणाला मुलीच होतील असे सांगितले. आपण अरुणाला मारून टाकू
परशु : तू कालवणात विष टाक आणि दे तिला खायला बघू कशी जिवंत राहते. तुझ्या पहिल्या बायकोला पण आपण असंच तर मारलं होतं.
हे सर्व ऐकून अरुणाच्या पायाखालची जमीनच सरकते तिला काय करावे ते समजत नाही. कोणाला सांगू हे सर्व? इथे राहिले तर जीव जायचा माझा आणि माझ्या मुलीचा. असा विचार करून भीती पोटी अरुणा मुलीला झोळी मधून उचलून तसेच माहेरच्या रस्त्याने निघाली कधी न परतण्यासाठी .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा