जीव वेडावला भाग १

"राज,जवळ नको येऊ प्लिज." वेदाने चेहरा झाकला होता. राज तिच्या अगदी जवळ आला आणि तिच्या
" राज, जवळ नको येऊ. " वेदाने दोन्ही हाताने चेहरा झाकला होता.  राज तरीही पुढे जात होता. वेदाच्या ह्रदयाची धडधड वाढली होती. 
राज वेदाच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला.  त्याने अलगद वेदाचे हात बाजूला काढले.  दोन्ही हात घट्ट पकडून तिला स्वतःकडे ओढले.  वेदाच्या अंगावर शहारा आला होता.  ती मान झुकवून त्याच्या पुढ्यात होती.  त्याने तिच्या गालावर आलेली बट पाठी सारली.  तिच्या डोळ्यात एकटक पाहू लागला. 

ती नजर चोरत होती. त्याने मान झुकवली आणि वेदाला काव्याने गदगदा हलवून उठवले.

"वेदा, लवकर उठ बरं.  ऑफिसला जायला उशीर होईल." काव्या खिडकीचे पडदे बाजूला सारत म्हणाली.

'छे हे स्वप्न होतं वेदा.' मनातच वेदा म्हणाली.

ती अजूनही ते स्वप्न आठवून गालात हसत होती.

"काय गं वेदा? पुन्हा राज आला का स्वप्नात?" काव्याने विचारले.

"हो गं काव्या. राज आला होता स्वप्नात.  तू नको त्या वेळेस मला झोपेतून जागं केलंस.  तू पाच मिनिटं का नाही थांबली?"
काव्याला मिठी मारत ती म्हणाली.

"ओहह! सॉरी हा वेदा मॅडम. तुमच्या गोड क्षणात मी चुकीच्या वेळेस आले.  बाय द वे आज काय म्हणाला राज?  रोमान्स वगैरे तर चालू नव्हता ना?"


काव्याला जर खरं सांगितले, तर ती चिडवत बसेल म्हणून ती फक्त हसली.

बेडवर जाऊन बसली आणि पुन्हा त्या स्वप्नात हरवली.
वेदा बेडवर जाऊन पुन्हा बसली हे पाहून काव्या म्हणाली,
" वेदा, प्लिज लवकर आवर नाही तर उशीर होईल.
राजचा विचार तू जाता जाता देखील करू शकते. "

काव्या बोलत होती आणि वेदाचे तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं.

वेदाचे लक्ष नाही हे पाहून काव्या तिच्याजवळ आली आणि म्हणाली,
"ए माझी परी, स्वप्नांच्या दुनियेतून प्लिज बाहेर ये गं."

वेदाला ती हलवत म्हणाली.
तेव्हा कुठे वेदाचे लक्ष तिच्याकडे गेले.

वेदा एक महत्वकांक्षी मुलगी.  एमबीए करून एका चांगल्या कंपनीत कामाला लागली होती. कामानिमित्त तिच्या मैत्रिणीसोबत काव्यासोबत ती भाड्याने एका फ्लॅटमध्ये राहात होती.
वेदा राजच्या प्रेमात होती.  राज तिच्या ऑफिसमध्येच कामाला होता. वेदा त्याच्या प्रेमात आहे ह्याची राजला जराही कल्पना नव्हती.  राजची पर्सनेलिटी अगदी आकर्षक होती.  उंचपुरा, घारे डोळे, त्याच्या गालावर खळी पडत असे. बोलतांना एक वेगळा आत्मविश्वास झळकायचा.  ऑफिसमधील मुली त्याला चोरून पहात असायच्या. 

वेदा देखील त्याच्या प्रेमात होती.  तो जवळ आला की, तिच्याही ह्रदयाची धडधड वाढत असे.  राजला एकदाचे बोलून मोकळं व्हावं की तू मला आवडतो, हे नेहमी तिला वाटायचे.  मात्र तो जवळ आला की तिला काय व्हायचे माहीत नाही. 

काव्याला वेदाने राजबद्दल सांगितले होते.
काव्यालाही माहीत होतं की वेदाला राज मनापासून आवडतो.

आज चक्क स्वप्नात आला होता.
किती जवळ उभा होता राज.  हे स्वप्न सत्यात कधी उतरते ह्याची ती वाट बघत होती.  राजला पहिल्यांदा पाहिले आणि वाटलं हाच तो माझ्या स्वप्नातला राजकुमार.  घाऱ्या डोळ्यांचा, कॉन्फिडंट.

मनात ती सतत बोलायची, 'आय लव यु राज.' पण मनातलं ओठावर आणायची तिला का भीती वाटत होती माहीत नाही.

आज राजने सुट्टी घेतली होती. ऑफिसला आलाच नव्हता.
वेदाचा मूड ऑफ झाला होता.

घरी गेली तरी नाराजच होती.
तिचा उतरलेला चेहरा पाहून काव्या म्हणाली," काय गं वेदा ऑफिसला जाताना तर अगदी खुश होऊन गेली होती आणि आता असा का चेहरा करून आली बरं?"

"काव्या, आज राज नव्हता आला." चेहरा पाडत ती म्हणाली.

"वाटलंच मला. आज काही काम असेल म्हणून तो आला नसेल." काव्या म्हणाली.

वेदासाठी आज खूप खास दिवस होता.  राज स्वप्नात आला होता. तिला आज त्याला पहायचे होते.  बोलायचे नव्हते; पण डोळे भरून त्याला पहायचे होते.  ती शांतच बसली होती.
"वेदा, अगं मी भिंतीशी नाही बोलत गं. तुझ्याशी बोलते आहे.  बोल काहीतरी."  काव्या.

"काव्या, काय बोलू गं.  मूड ऑफ आहे. मला काहीच बोलायचे नाही."

"वेदा, चल तुझा मूड कसा ठीक करायचा हे मला चांगलं माहीत आहे." काव्या किचनच्या दिशेने जात म्हणाली.

वेदा पुन्हा विचारात हरवली. 'राज आज का आला नाही? त्याची तब्येत तर ठीक असेल ना?'

तोच काव्याने कडक कॉफी करून पुढ्यात ठेवली.

कॉफी म्हणजे वेदाची फेवरेट.
"थँक्स काव्या." कॉफीचा मग उचलत ती म्हणाली.

"आय होप ही कॉफी पाहून तुझा मूड थोडा तरी बदलला असेलच."
तिच्या बाजूला बसत काव्या म्हणाली.

"काव्या, आय एम सो लकी की तू माझी मैत्रीण आहेस.  किती जपतेस गं मला."

"वेदा, पुरे हा मला चण्याच्या झाडावर चढवू नको नाही तर मी खाली पडेल."

"काव्या, खरंच गं प्रत्येक वेळेस तू मला सपोर्ट करते. मी नाराज झाले की मला खुश ठेवायचा प्रयत्न करते." वेदाच्या डोळ्यात पाणी आले होते ते पुसत म्हणाली.

काव्यालाही भरून आले.

तिने वेदाला घट्ट मिठी मारली.

"ओहह नो.. " वेदा.

"काय झालं वेदा?" काव्या.

"अगं, उद्या घरी जायचे आहे. आईचा सकाळीच फोन आला होता. तुला मी सांगायचे विसरलेच. "

"रिलॅक्स माय डिअर वेदा. मला साधना काकूंनी सांगितले होते. म्हणून आपल्या दोघींची बॅग पॅक करून ठेवली आहे." काव्या.

"काव्या, थँक्स राणी. खरंच हल्ली मला काय झालं आहे माहीत नाही सगळंच विसरत चालले आहे." वेदा कॉफीचा मग खाली ठेवत म्हणाली.

"तुझ्या मनात,डोक्यात राज असल्यावर तुला काही लक्षात राहील का?" काव्या तिला चिडवत म्हणाली.

"काव्या यार. जा मी नाही तुझ्याशी बोलणार." वेदा हसतच म्हणाली.

"राजच नाव जरी घेतलं तरी तुझा चेहरा बघ कसा फुलून येतो आहे.
राज खरंच तुझ्या आयुष्यात आला तर मग काही खरं नाही." काव्या.

वेदा हे ऐकून अजूनच लाजत होती.
"वेदा, मी काय म्हणते सांगून टाक ना राजला की तुझं त्याच्यावर प्रेम आहे."

"काव्या मलाही वाटतं की सांगावं त्याला ; पण भीती वाटते. त्याला पाहिले तरी मला ना कसंतरी होतं. माझ्या पोटातच खड्डा पडतो. समजत नाही त्याला कसं सांगू." वेदा.

"हम्म.. पण असं तू किती दिवस वाट बघणार? तुझ्या आधी जर त्याला कोणी प्रपोज केलं तर?" काव्या.

"प्लिज काव्या असं काहीच बोलू नको. राजशिवाय मी माझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. राज फक्त माझा आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम केलं आहे. माझ्या प्रत्येक श्वासात राज आहे. राजच माझं आयुष्य आहे. सर्वस्व आहे."

हे बोलत असतांना वेदा तर रडूच लागली.

काव्याला तिची काळजी वाटू लागली.
'राजवर ही इतकं प्रेम करते. जर त्याच्या आयुष्यात कोणी दुसरी मुलगी आली तर ही सहन करू शकेल का?'

"काव्या, प्लिज पुन्हा असं काही बोलू नको. मला सहन नाही होत." वेदा तिचा हात धरत म्हणाली.

वेदाच्या डोळ्यात ती पहात होती राजविषयी प्रेम जे खोलवर रुजले होते. खरंच वेडी झाली होती ती राजसाठी.

ज्याच्यासाठी वेडी झाली त्याला जरा पण कल्पना नव्हती की वेदा त्याच्यावर इतकं प्रेम करते आहे.

राज वेदाच्या आयुष्यात येईल? आणि जर राज कोणा दुसऱ्या मुलीचा झाला तर ती सहन करू शकेल?

क्रमशः
अश्विनी कुणाल ओगले.

🎭 Series Post

View all