Login

जिवलगा❤️

जिवलगा

जिवलगा❤️


अबोल तु अस्तव्यस्त मी
अक्षर तु शब्द मी....

समोर तु आनंद मी
सोबत तु आनंद मी....

साथ तुझी हवी मला
अपयश यश नंतर ठरेल....

हात तुझा मार्ग माझा
मरणापर्यंत प्रवास करेल...

शब्द तुझे ओठ माझे
भावना आपली एक असेल...

आत्मा तुझी शरीर माझे
प्राण एकमेकांत शेवटपर्यंत असेल....

आठवण नको तुझी साथ हवी
तुझ्या प्रेमाची वाट हवी..

रंग ओल्या भावनांचा
नकलत विरघळले मनी..

गंध तुझा सोबतीचा
चाहुल देई तुझी..

सांजवेळी उमटती रंग सोनेरी
बेधुंद दरवळतो चाफा गंधात तुझा न्हाऊनी.....