जीवन एक कादंबरी

How life is a book

जीवन एक कादंबरी

जीवन ही एक कादंबरी,

आपण त्यातील पात्रे पण खरी,

जी आहे देव नावाच्या व्यक्तीची  कारागिरी,

ज्याने केली आहे प्रत्येकात  ऋदयाची किमयागिरी,

ऋदयात असते सर्वांची बाजू दुखरी ,

प्रत्येक सुखामागून असते दुखा:ची वारी,

दुखा: मुळे सुखाची मजाच असते काही न्यारी,

प्रत्येक व्यक्तीची असते वेगळीच दुनियादारी,

संसारात प्रत्येक पतीला असते पत्नीची साथ भारी,

त्यामुळे सुखाची आणि दुखा:ची होते बरोबरी,

जेव्हा माणसाची भरते आत्मज्ञानाची तिजोरी,

तेव्हा तेजाने उजळून निघते दुनिया सारी,

जीवनात जर झाली पंढरिची एकदा जरी वारी,

वाटते सफल झाली आयुष्याची कामगिरी,

पण या सा-या मुळे होते दुनिया जादूगरी,

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या हातात असते आयुष्याची दोरी,

जीवनातील पटावर हालवतो हा पात्रे सारी,

त्याला जसा हवा तसा कादंबरीचा शेवट करी.

रुपाली थोरात